दुचाकीवर निघालेल्या बहीण-भावाला डंपरनं चिरडलं…; भावंडांचा चेंदामेंदा… जागीच मृत्यू

Nagpur Dumper Accident Brother and Sister Death : भाऊ-बहीण दुचाकीवरून जात होते, इतक्यात डंपरनं धडक दिली. दोघं भावंडं खाली पडली. डंपरने त्यांना चिरडलं. दोघांचा जागीच मृत्यू... यानंतर संतप्त झालेल्या जमावाने डंपर पेटवला. आता या डंपरच्या चालकाची चौकशी केली जात आहे. वाचा सविस्तर...

दुचाकीवर निघालेल्या बहीण-भावाला डंपरनं चिरडलं...; भावंडांचा चेंदामेंदा... जागीच मृत्यू
Follow us
| Updated on: Dec 30, 2023 | 8:12 AM

सुनील ढगे, प्रतिनिधी – टीव्ही 9 मराठी, नागपूर | 30 डिसेंबर 2023 : बातमी आहे उपराजधानी नागपूरमधून… डंपरने दोघा भावंडांना चिरडल्याची घटनी समोर आली आहे. नागपूरच्या सीमावरती भागात असलेल्या बिडगावमध्ये कचऱ्याच्या डंपरने भावंडांना चिरडलं आहे. दोघं भावंडं दुचाकीवर जात होते. या बहीण भावाला डंपरची धडक लागली.हे दोघे खाली पडले. नंतर त्यांच्यावरून डंपर गेला. या दोघांना चिरडलं.या दोघा भावंडांचा चेंदामेंदा झाला. या अपघातात या भांवडांटा जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे नागपूरकर हळहळले. भावंडांचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात शोकाकूल वातावरण आहे.

डंपरने भावंडांना चिरडलं…

नागपूरच्या बिडगावमध्ये डंपरने दोघा भावंडांना चिरडलं. या दोघांचाही त्यामुळे परिसरातील नागरिकांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला. संतप्त झालेल्या नागरिकांनी डंपर पेटवून दिला आणि रस्ता बंद केला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी आले. पोलीस या ठिकाणी पोहोचल्यानंतर परिसरातील गर्दी कमी करण्यात आली. मात्र नागरिकांमध्ये या घटनेवरून मोठा रोष व्यक्त केला आहे.

बिडगावमध्ये वारंवार अपघाताच्या घटना

जवळच असलेल्या डम्पिंग यार्डमधील कचऱ्याचे डंपर मोठ्या प्रमाणात या ठिकाणावरून जातात. नेहमीच अशा प्रकारच्या अपघाताच्या घटना या ठिकाणी होत असल्याने नागरिकांनी या रोडवरील डंपर बंद करण्याची मागणी केली. पोलिसांचे सर्व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळावर दाखल झाले. त्यांना या घटनेची संपूर्ण माहिती घेतली. यासंदर्भात योग्य ती कारवाई करण्याचं आश्वासन पोलिसांकडून देण्यात आलं आहे.

चालकाची चौकशी

पोलिसांनी डंपर चालकाला ताब्यात घेतलं असून तो मद्यधुंद अवस्थेत होता का? याची तपासणी सुद्धा केली जात आहे. अपघातानंतर नागरिकांनी या ठिकाणी रोष व्यक्त करत त्या डंपरला पेटवून दिलं त्यानंतर पोलिसांचा मोठा फौज फाटा या ठिकाणी लावण्यात आला. नागपूरचे डीसीपी व्ही सागर यांनी या घटनेची माहिती दिली.

दरम्यान असाच अपघात पुण्यातील कात्रज परिसरातही झाला होता. आईच्या डोळ्यासमोर डंपरने चिमुकल्याला चिरडलं होतं. मंतरवाडी कात्रज बायपास रस्त्यावर भरधाव वेगाने येणा-या डंपरने अॅक्टीव्हा गाडीला धडक दिली. त्यावर असणारा लहान मुलगा शौर्य सागर आव्हाळे वय वर्षे 8 रस्त्यावर पडला. या लहानग्याला आईसमोरच मुलाला डंपरने चिरडलं. यात शौरेयचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संतप्त जमावाने डंपर पेटवून दिला होता.

Non Stop LIVE Update
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले...
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले....
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स.
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात.
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर.
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?.
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती.
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं.
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान.
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा.
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?.