नितीन राऊत अॅक्शन मोडमध्ये, नागपुरात कोरोनाबाधितांचा आकडा कमी करण्यासाठी दहा सूचना

मनपा आणि जिल्हा प्रशासनाला आराखड्यावर कामकाज करण्याचे निर्देश नितीन राऊतांनी दिले आहेत. (Nagpur Nitin Raut Corona Lockdown)

नितीन राऊत अॅक्शन मोडमध्ये, नागपुरात कोरोनाबाधितांचा आकडा कमी करण्यासाठी दहा सूचना
nitin raut
Follow us
| Updated on: Mar 22, 2021 | 9:10 AM

नागपूर : नागपूरमधील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी करुन लसीकरण वाढवणे, हा महापालिका आणि जिल्हा प्रशासनाचा एकच अजेंडा आहे. नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी ठोस कृती आराखडा मांडला आहे. मनपा आणि जिल्हा प्रशासनाला आराखड्यावर कामकाज करण्याचे निर्देश राऊतांनी दिले आहेत. (Nagpur Guardian Minister Nitin Raut on Nagpur Corona Lockdown)

पालकमंत्री नितीन राऊत यांचा ठोस कृती आराखडा

उच्चभ्रू वस्तीतील चाचण्या वाढवा हॉटस्पॉट भागांचे सूक्ष्म निरीक्षण गर्दीच्या ठिकाणी अँटीजन टेस्ट मेयो-मेडिकल खाटांचे व्यवस्थापन होम क्वारंटाईनवर सूक्ष्म नजर लसीकरण दिवसाला 40 हजार बेड-रिडन रुग्णांचे लसीकरण घरी मास्क न वापरणाऱ्यावर कडक कारवाई बाजारात कोविड प्रोटोकॉलचे पालन खासगी रुग्णालयाच्या बिलींगवर लक्ष

22 ते 31 मार्च या कालावधीत नागपूर शहर आणि परिसरात कडक निर्बंध लावले आहेत. अचानक नागपूर शहरात वाढत असलेले रुग्ण कमी करणे हाच मुख्य उद्देश आहे. त्यासाठी आगामी काळामध्ये नागपूर महानगर पालिका प्रशासन आणि जिल्हा प्रशासन यांनी निश्चित कृती आराखडयावर वाटचाल करावी, असे आवाहन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले आहे.

नागपुरातील लॉकडाऊन 31 मार्चपर्यंत

नागपुरातील लागू करण्यात आलेला आठवड्याभराचा लॉकडाऊन आता 31 मार्चपर्यंत लागू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रुग्णांचा ग्राफ सातत्याने वाढत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पालकमंत्री आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दोन दिवसांपूर्वी दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. या बैठकीनंतर 31 मार्चपर्यंत कठोर निर्णय लागू राहणार असल्याची माहिती नितीन राऊत यांनी दिली. (Nagpur Guardian Minister Nitin Raut on Nagpur Corona Lockdown)

दिवसाला 40 हजार लसीकरणाचा बेत

नागपुरात कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर कोरोना चाचण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढवलं जाणार आहे. निर्बंध लावताना नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाईल, असं राऊत यांनी सांगितलं. त्याचबरोबर लसीकरण केंद्रही वाढवले जाणार आहेत. सध्या दिवसाला 20 हजार लोकांचं लसीकरण केलं जातं. ते 40 हजारावर नेण्याचं लक्ष्य असल्याचं राऊत म्हणाले. शहरात कठोर निर्बंध लावण्याबाबत लोकप्रतिनिधींची मदत घेतली जाणार असल्याचं राऊत यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या :

नागपूरमध्ये आता 31 मार्चपर्यंत कडक निर्बंध, पालकमंत्र्यांची घोषणा

काही राज्यात निवडणुका, तरीही तिथे रुग्णसंख्या कमी, महाराष्ट्रात संथ लसीकरण : देवेंद्र फडणवीस

(Nagpur Guardian Minister Nitin Raut on Nagpur Corona Lockdown)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.