Nagpur Lockdown update : नागपूरमध्ये आता 31 मार्चपर्यंत कडक निर्बंध, पालकमंत्र्यांची घोषणा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते.

Nagpur Lockdown update : नागपूरमध्ये आता 31 मार्चपर्यंत कडक निर्बंध, पालकमंत्र्यांची घोषणा
नितीन राऊत
Follow us
| Updated on: Mar 20, 2021 | 10:51 PM

नागपूर : नागपुरातील लागू करण्यात आलेला आठवड्याभराचा लॉकडाऊन आता 31 मार्चपर्यंत लागू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रुग्णांचा ग्राफ सातत्याने वाढत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पालकमंत्री आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. या बैठकीनंतर 31 मार्चपर्यंत कठोर निर्णय लागू राहणार असल्याची माहिती नितीन राऊत यांनी दिली आहे.(Strict restrictions will remain in place in Nagpur till March 31 to prevent corona outbreak)

नागपुरात कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर कोरोना चाचण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढवलं जाणार आहे. निर्बंध लावताना नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाईल, असं राऊत यांनी सांगितलं. त्याचबरोबर लसीकरण केंद्रही वाढवले जाणार आहेत. सध्या दिवसाला 20 हजार लोकांचं लसीकरण केलं जातं. ते 40 हजारावर नेण्याचं लक्ष्य असल्याचं राऊत म्हणाले. शहरात कठोर निर्बंध लावण्याबाबत लोकप्रतिनिधींची मदत घेतली जाणार असल्याचं राऊत यांनी सांगितलं.

नागपुरात कशावर मर्यादा?

नागपुरात भाजीपाल्याची विक्री 4 वाजेपर्यंत सुरु राहणार आहे.

बाजारपेठा आणि अन्य ठिकाणी गर्दी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

शाळा पूर्णपणे बंद राहतील

जीवनावश्यक वस्तूंची कमतरता भासणार नाही

सर्व परीक्षा कोरोना नियमांचं पालन करुन होतील

बाजारपेठा बंद, फक्त जीवनावश्यक वस्तुंचीच दुकानं सुरु राहतील.

काही निर्णय महापालिकेनं घ्यायचे आहेत.

देवेंद्र फडणवीस यांच्या प्रशासनाला सूचना

कोरोना रुग्णालये आणि बेड वाढवा, स्वतंत्र कोव्हिड रुग्णालये राखीव ठेवा

कोव्हिड वॉर्ड बंद झाले आहेत, ते पुन्हा सुरु करा

बिलांवर देखरेखीसाठी ऑडिटर सुरु करा

हळू काम सुरु आहे, त्याचा वेग वाढवा

सर्वाधिक मृत्यू नागपुरात होत आहेत, 50 पैकी 30-32 मृत्यू नागपूरमध्ये

होमक्वारंटाईन लोक रस्त्यावर फिरतायत, त्यांना सरळ उचलून क्वारंटाईन सेंटरमध्ये न्या, त्यांच्यावर कारवाई करा

आयुक्तांनी फेस रेकग्नेशनबाबतची माहिती दिली, बाहेर फिरणाऱ्या लोकांना कॅमेरे ओळखतील

कार्यालये बुकिंग आहेत, ते रद्द केल्यामुळे पैसे मिळत नाहीत, SOP ठरवा

आम्ही सोबत आहोत, जे निर्णय घेतील त्याची अंमलबजावणी करा

पूर्ण लॉकडाऊनऐवजी, निर्बंध लागू करण्याचा मुद्दा समोर आला, तो योग्य आहे

संबंधित बातम्या :

Nagpur Lockdown Update : काही राज्यात निवडणुका, तरीही तिथे रुग्णसंख्या कमी, महाराष्ट्रात संथ लसीकरण : देवेंद्र फडणवीस

फडणवीसांना जे जमलं नाही, ते राऊतांनी करून दाखवलं; नागपूर अग्निशमन दलात होणार मेगा भरती!

Strict restrictions will remain in place in Nagpur till March 31 to prevent corona outbreak

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.