नागपुरातल्या प्रभागरचनेचा कुणाला फायदा, कुणाला फटका? एका क्लिकवर नवी प्रभागरचना

| Updated on: Feb 02, 2022 | 7:49 PM

नागपुरात 15 वर्ष सत्तेत असलेल्या भाजप ने महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारने आपल्या सोयीनुसार रचना केल्याचा आरोप केला आहे, तर अभ्यास करून आक्षेप नोंदविणार असल्याचंही सांगितलं आहे.

नागपुरातल्या प्रभागरचनेचा कुणाला फायदा, कुणाला फटका? एका क्लिकवर नवी प्रभागरचना
नागपुरात नवी प्रभागरचना जाहीर
Follow us on

नागपूर : नागपूर महापालिकेची प्रभाग रचना (Nagpur Ward Structure) जाहीर झाली आणि निवडणुकीचे (Municipal Elections) वारे वाहायला सुरवात झाली.15 वर्ष सत्तेत असलेल्या भाजप ने महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारने आपल्या सोयीनुसार रचना केल्याचा आरोप केला आहे, तर अभ्यास करून आक्षेप नोंदविणार असल्याचंही सांगितलं आहे. तसेच येती निवडणुकही आम्हीच जिंकू असे म्हणत महाविकास आघाडीला खुलं आव्हान दिलं आहे. मात्र ही प्रभाग रचना दोन्ही पक्षासाठी फायद्याची असल्याचं नागपुरातले जेष्ठ पत्रकार सांगतात. नागपूर महापालिका निवडणूक भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षासाठी प्रतिष्ठेची आहे, भाजपला आपली 15 वर्ष पासून असलेली महापालिकेतील सत्ता अबाधित ठेवायची आहे, तर काँग्रेसला सत्ता मिळवायची आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष कामाला लागले आहेत. नागपुरातलं भाजपचं वर्चस्व संपुष्ता काढून काँग्रेस मास्टरस्ट्रोक मारणार की भाजप गड राखणार? याची प्रतिक्षा सर्वांना आहे.

यावेळी प्रभाग रचना करत असताना महाविकास आघाडी सरकारने आपल्या पद्धतीने फायद्याची ठरेल अशी केली आहे, आमचे बूथ प्रमुख त्यावर अभ्यास करून आक्षेप नोंदवतील, असे महापौर दया शंकर तिवारी यांनी सांगितलं. मात्र यावेळी सुद्धा निवडणूक आम्हीच जिंकणार असून नागपूरचा विकास भाजपनेच केल्याचं त्यांनी सांगितलं, आहे. नागपुरात प्रभाग रचना 3 चा प्रभाग या पद्धतीने झाली असून 2002 साली असलेल्या प्रभाग रचना पद्धती प्रमाणे आहे. त्यामुळे याचा फायदा काँग्रेसला सुद्धा होण्याची जास्त शक्यता आहे. मात्र या सगळ्यात निवडणूक कोण कोणत्या पद्धतीने लढणार यावर सुद्धा सगळं अवलंबून असल्याचं महापालिकेच राजकारण जवळून बघणारे पत्रकार सांगता.

नागपूर महापालिकेची प्रभाग रचना कोणाला फायद्याची ठरेल हे निवडणुकीत दिसून येईलच, मात्र आता यावर किती आणि कोणते? आक्षेप येतात हे पाहावे लागणार आहे. येत्या काही दिवसात नागपूरसह अनेक महापालिकांच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष जोमाने कामाला लागले आहे. येत्या निवडणुकीत कुणाचा बोलबाला राहतो आणि कुणाचा गड ढासळतो, हे निवणुकीनंतरच कळेल. फक्त नागपूरच नाही तर मुंबई, पुणे, औरंगाबादसारख्या मोठ्या महानगरपालिकांच्या निवडणुकाही येत्या काही दिवसात पार पडणार आहेत. तसेच अनेक जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचेही बिगुल वाजणार आहे.

Nagpur Crime | पोलीस असल्याची बतावणी करणाऱ्याने वृद्धास लुटले; आरोपी सीसीटीव्हीत कैद

गडचिरोलीत वनविभागाची मोठी कारवाई; बैलबंडींसह मोठ्या प्रमाणात लाकूड जप्त

Nagpur Crime : पगार न देणाऱ्या मालकाच्या घरी नोकराने केली चोरी; नागपुरात अल्पवयीन मुलाने असा घेतला बदला