AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गडचिरोलीत वनविभागाची मोठी कारवाई; बैलबंडींसह मोठ्या प्रमाणात लाकूड जप्त

गडचिरोली जिल्ह्यात वन विभागाची मोठी कारवाई केली. आठ लाख 50 हजार रुपयांचे सागवान जप्त करण्यात आलेत. लाकडासह 6 बैलगाड्या असे साहित्य वनविभागाने जप्त केले आहे. यंदाची ही सर्वात मोठी कारवाई आहे.

गडचिरोलीत वनविभागाची मोठी कारवाई; बैलबंडींसह मोठ्या प्रमाणात लाकूड जप्त
गडचिरोलीतील लाकूड तस्कर.
| Edited By: | Updated on: Feb 02, 2022 | 5:45 PM
Share

गडचिरोली : जिल्हा वनसंपत्तीने नटलेला आहे. गडचिरोली जिल्ह्यात उच्च जातीचे सागवान उत्पादित होते. सागवानाच्या सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात वन विभागाचे कर्मचारी (Forest Department staff) तैनात असतात. परंतु या कर्मचाऱ्यांना शह देत तस्कर वन तस्करी मोठ्या प्रमाणात करतात. तेलंगणा राज्यात ही तस्करी केली जाते. गडचिरोलीच्या जंगलातून (From the forest of Gadchiroli) लाकडं तोडायची आणि तेलंगणात न्यायची, असा हा प्रकार उघडकीस आला. ही घटना काल रात्रीच्या सुमारास घडली. तस्करांनी अल्लापल्ली वनपरिक्षेत्र अंतर्गत झिमेला जंगल परिसरात तस्करी (Smuggling in Jhimela forest area) करत असल्याची घटना उघडकीस आली. मोठ्या प्रमाणात सागवान वृक्षांची कत्तल करण्यात आली. जंगलातून अवैद्य सागवान तस्करी करीत असताना वनविभागाने कारवाई केली.

साडेआठ लाखांचे साहित्य जप्त

आलापल्ली वन परिक्षेत्र अधिकारी योगेश शेरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक गस्तीवर होता. या पथकाने वन तस्करांवर जंगलातच धडक कारवाई करण्यात आली. सागवान लाकडे जप्त करण्यात आलीत. बैलांना तसेच आरोपीला अटक करण्यात आली. यात आठ लाख 50 हजार रुपयांचे सागवान लाकडे होती. सहा बैलगाड्या हाकणारे बारा बैलांना अटक करण्यात आली. या वर्षाची ही सर्वात मोठी कारवाई आहे.

काही आरोपी फरार

या कारवाईचे नेतृत्व वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश शेरेकर यांनी केले. या प्रकरणातील अजून काही आरोपी फरार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या फरार असलेल्या आरोपींचा शोध घेतला जात आहे. लवकरच आरोपी वन विभागाच्या ताब्यात असतील. एका मोठ्या अवैध तस्करीला आळा घालण्यात आम्ही यशस्वी झाल्याची माहिती शेरेकर यांनी दिली. गडचिरोली जिल्हा म्हणजे ऑक्सिजन हब आहे. जंगल असल्यानं त्याठिकाणी तस्करही सक्रिय असतात. प्रत्येकवेळी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना ते सापडतीलच असं नाही. कर्मचाऱ्यांच्या हातावर तुरी देऊन ते पसार होतात. यावेळी मात्र तस्कर वनविभागाच्या जाळ्यात सापडलेत. तरी काही आरोपी पसार होण्यात यशस्वी ठरलेत.

नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळला, पोलिसांच्या कारवाईबाबत भाजप-शिवसेना नेते आमनेसामने

Hindusthani Bhau : हिंदुस्थानी भाऊच्या सुटकेसाठी मुलांना एकत्रित जमण्याचे आवाहन, ऑडिओ क्लिप व्हायरल

Breaking : वारीस पठाण यांना इंदुरमध्ये काळं फासलं? पठाण यांनी दावा फेटाळला, मग नेमकं काय घडलं?

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.