Nagpur Crime : पगार न देणाऱ्या मालकाच्या घरी नोकराने केली चोरी; नागपुरात अल्पवयीन मुलाने असा घेतला बदला

घरात कोणी नसल्याची संधी साधून मुलाने घराचा कुलूप तोडला. रोख रक्कम व दागिन्यांवर हात साफ केला. दुकानातून घरी परत आल्यावर मालकाला धक्का बसला. चोरी कशी झाली याचा तो विचार करू लागला.

Nagpur Crime : पगार न देणाऱ्या मालकाच्या घरी नोकराने केली चोरी; नागपुरात अल्पवयीन मुलाने असा घेतला बदला
सांकेतिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Feb 02, 2022 | 3:19 PM

नागपूर : ही घटना आहे कपीलनगर पोलीस (Kapilnagar Police) ठाण्या अंतर्गतची. शिवचरण यादव यांचे चहा, नाश्त्याचे दुकान आहे. या दुकानात एक पंधरा वर्षांचा मुलगा काम करत होता. या मुलाचे यादवच्या घरी जाणे होते. मुलगा हा व्यवस्थित काम करत होता. पण, त्याच्या मालकाला काही समाधान (Some satisfaction to the owner) नव्हते. मुलाने महिन्याभरानंतर शिवचरणला पगार मागितला. नंतर बघून म्हणून मालकाने टाळाटाळ केली. दोन महिने झाले. पण, पगार काही मिळेना. त्यामुळं मुलगा नाराज झाला. आता केलेल्या कामाचा मोबदला (Remuneration for work) कसा काढणार, असा प्रश्न त्याच्या मनात निर्माण झाला. मुलाचे त्याच्या घरू जाणे-येणे होते. त्यामुळं घराबद्दल पूर्ण माहिती त्याला होती. मालकाच्या घरी चोरी करण्याचा बेत त्याने आखला. सव्वीस जानेवारीला मालक कुटुंबासह दुकानात आले होते. घरात कोणी नसल्याची संधी साधून मुलाने घराचा कुलूप तोडला. रोख रक्कम व दागिन्यांवर हात साफ केला. दुकानातून घरी परत आल्यावर मालकाला धक्का बसला. चोरी कशी झाली याचा तो विचार करू लागला.

सीसीटीव्ही तपासातून चोर सापडला

सीसीटीव्ही चेक करण्यात आले. त्यामध्ये या संशयित मुलगा दिसला. पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून अठ्ठावीस हजार रुपये रोख रक्कम वसूल करण्यात आली. तसेच सव्वा लाख रुपयांच्या दागिन्यांवर त्याने हात साफ केले होते. ही कारवाई डीसीपी मनीष कलवानिया यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अमोल देशमुख यांच्या मार्गदर्शनात शुभांगी वानखेडे, पीएआय भरत जाधव, संजय वानखेडे, अरविंद काळबांडे, आशीष सातपुते, गणेश साहुरसाखडे व अश्विन जाधव यांनी केली.

लग्नाच्या आमिषाने अत्याचार

प्रतापनगर पोलीस ठाणे हद्दीत तेवीस वर्षीय मुलीवर अत्याचाराची घटना घडली. भंडारा येथून नागपुरात आलेल्या आरोपीने मुलीला प्रेमाचा जाळ्यात ओढले. लग्नाचे आमिष दाखवत वारंवार अत्याचार केले. त्यानंतर तिच्याशी लग्नास नकार दिला. पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. अभिषेक देशमुख हा कामानिमित्त नागपूर शहरात राहत होता. तो राहत असलेल्या वस्तीत पीडिता वास्तव्याला होती. त्यांच्यात आधी मैत्री झाली आणि नंतर मैत्रीचे रूपांतरण प्रेमात झाले. गेल्या तीन वर्षांपासून ते एकमेकांच्या प्रेमात होते. आरोपीने पीडितेसोबत चांगले वर्तन करून तिचा विश्‍वास संपादन केला. त्यानंतर तिचा गैरफायदा घेतल्याची तक्रार करण्यात आली आहे.

नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळला, पोलिसांच्या कारवाईबाबत भाजप-शिवसेना नेते आमनेसामने

Hindusthani Bhau : हिंदुस्थानी भाऊच्या सुटकेसाठी मुलांना एकत्रित जमण्याचे आवाहन, ऑडिओ क्लिप व्हायरल

Breaking : वारीस पठाण यांना इंदुरमध्ये काळं फासलं? पठाण यांनी दावा फेटाळला, मग नेमकं काय घडलं?

Non Stop LIVE Update
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.