स्वयंघोषित विश्वगुरुसोबत असतानाही…; खडसेंच्या घरवापसीच्या चर्चांवरून नाना पटोलेंचा भाजपला टोला

Nana Patole on Eknath Khadse Narendra Modi and BJP : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी घटना घडते आहे. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे पुन्हा भाजपत जाणार?; यावर काँग्रेसची प्रतिक्रिया समोर येत आहे. नाना पटोले यांचा भाजपला टोला, काय म्हणाले? वाचा सविस्तर...

स्वयंघोषित विश्वगुरुसोबत असतानाही...; खडसेंच्या घरवापसीच्या चर्चांवरून नाना पटोलेंचा भाजपला टोला
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
Follow us
| Updated on: Apr 07, 2024 | 11:33 AM

राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे पुन्हा एकदा भाजपमध्ये जाणार आहेत. यावर काँग्रेसची प्रतिक्रिया समोर आली आहे. एकनाथ खडसे पुन्हा भाजपमध्ये जातील मला वाटत नाही. भाजपने एकनाथ खडसे यांचा छळ केला होता. त्यामुळे ते जाईल असं मला वाटत आहे हे माझं मत आहे. भाजपकडे बलाढ्य नेता असताना त्यांना इतर पक्षातील लोकांची गरज का पडते? स्वयंघोषित विश्वगुरु सोबत असताना त्यांना इतर पक्षातील लोकांची गरज का पडते? भ्रष्टाचार करणारे लोक त्यांनी जमा केले देशाची संपत्ती लुटण्याच काम सुरू केलं. ते देशाच्या प्रश्नावर बोलत नाही. त्यामुळे एकनाथ खडसे भाजपमध्ये जाणार नाहीत, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणालेत. ते नागपुरात बोलत होते.

सांगलीच्या जागेवरून वाद

सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेस विरूद्ध शिवसेना ठाकरे गट असा संघर्ष उभा राहिलेला आहे. या सांगली लोकसभा मतदारसंघातील जागेवर ठाकरे गटाने उमेदवार दिलेला आहे. मात्र सांगलीची जागा आमची आहे, असं म्हणत काँग्रेसकडून दावा करण्यात आला आहे. त्यामुळे ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये संघर्ष सुरु आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी काल काँग्रेसला इशारा दिला आहे. यावर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नाना पटोलेंचा राऊतांना सल्ला

संजय राऊत यांनी आपली नौटंकी बंद करावी. ते शिवसेनेचे नेते आहे त्यांनी सांभाळून बोलावं. वरिष्ठ पातळीवर तो तिढा एक दोन दिवसात पूर्ण होईल. सामोपचाराने हा तिढा सोडवू. संजय राऊत यांनी लहान कार्यकर्त्या प्रमाणे बोलू नये, असं नाना पटोले म्हणाले.

काँग्रेसचा जाहीरनामा

काँग्रेस पक्षाने या देशातील जनतेला आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अनेक वर्षांपासून आंदोलन केली आहेत. भाजपपासून सावध राहावे असे आवाहन ओबीसी समाज करतो आहे. आपलं सरकार महाराष्ट्रात आलं तर जुनी पेन्शन लागु करू, केंद्रातील निवडणूक असल्याने ते जाहीर नाम्यात नाही, असं नाना पटोलेंनी सांगितलं आहे.

Non Stop LIVE Update
एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन एकत्र आले तर... पाटलांचं वक्तव्य नेमकं काय?
एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन एकत्र आले तर... पाटलांचं वक्तव्य नेमकं काय?.
काय कमावल अन काय गमावल हे 13 जुलैला...जरांगे पाटलांचा नेमका इशारा काय?
काय कमावल अन काय गमावल हे 13 जुलैला...जरांगे पाटलांचा नेमका इशारा काय?.
गायब असलेला पाऊस 'या' दिवशी पुन्हा करणार कमबॅक, IMD चं मोठं अपडेट
गायब असलेला पाऊस 'या' दिवशी पुन्हा करणार कमबॅक, IMD चं मोठं अपडेट.
जरांगे पाटलांना रेड कार्पेट आणि आमची दखलही नाही? ओबीसी नेता आक्रमक
जरांगे पाटलांना रेड कार्पेट आणि आमची दखलही नाही? ओबीसी नेता आक्रमक.
तोडीबाज नेता, ब्लॅकमेलिंग आणि वसुलीत नंबर वन काम; बच्चू कडूंवर टीका
तोडीबाज नेता, ब्लॅकमेलिंग आणि वसुलीत नंबर वन काम; बच्चू कडूंवर टीका.
शरद पवार यांचं मुख्यमंत्र्यांना थेट पत्र अन् केली महत्त्वाची मागणी
शरद पवार यांचं मुख्यमंत्र्यांना थेट पत्र अन् केली महत्त्वाची मागणी.
मरतुकडी म्हैस ध्यानीमनी नसताना गाभण राहावी तसा राणेंचा...सामनातून टीका
मरतुकडी म्हैस ध्यानीमनी नसताना गाभण राहावी तसा राणेंचा...सामनातून टीका.
Elon Musk याच्या दाव्यानंतर निवडणूक आयोगानं फटकारलं, नेमकं काय प्रकरण?
Elon Musk याच्या दाव्यानंतर निवडणूक आयोगानं फटकारलं, नेमकं काय प्रकरण?.
लालपरीने शाळेत जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, विद्यार्थ्यांना आता शाळेत
लालपरीने शाळेत जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, विद्यार्थ्यांना आता शाळेत.
Monsoon रखडला..आगेकूच मंदावली, विदर्भ प्रतिक्षेत तर कोकण, मराठवाड्यात
Monsoon रखडला..आगेकूच मंदावली, विदर्भ प्रतिक्षेत तर कोकण, मराठवाड्यात.