Devendra Fadnavis | IIM मुळे नागपूर जगाच्या नकाशावर, देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास; शिक्षणाचं हब होतेय

| Updated on: May 08, 2022 | 1:30 PM

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करून ही संस्था नागपूरला व्हावी, यासाठी चर्चा केली. त्यातून ही संस्था उभी राहिली. नागपुरात आयआयएमला सुरुवात झाली. जमीन उपलब्ध करून दिलं. पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन झालं. बिल्डिंग तयार झाली. आता लोकार्पण होत आहे, असंही फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis | IIM मुळे नागपूर जगाच्या नकाशावर, देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास; शिक्षणाचं हब होतेय
नागपूर आयआयएमच्या लोकार्पणाप्रसंगी बोलताना देवेंद्र फडणवीस.
Image Credit source: tv 9
Follow us on

नागपूर : IIM नागपूर कॅम्पस उद्घाटन सोहळा नागपुरात पार पडला. यानिमित्त विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी देशातील मोठ्या शैक्षणिक संस्थांचा विस्तार केला. त्यातूनच नागपुरात आयआयएम साकार झालंय. आयआयएम नागपूरला मंजूर झाल्यानंतर वाद झाला. कुणी म्हटलं औरंगाबाद आणि नाशिक आयआयएमचा प्रस्ताव होता. पण प्रस्ताव फक्त नागपूरचा होता. मिहानमध्ये (Mihan) 150 एकर जमीन दिलीय. प्रधानमंत्री यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. आज लोकार्पण होतेय. नागपुरात एम्स आणलं. ट्रीपल आयआयटी, लॉ स्कूल यासारख्या मोठ्या संस्था नागपुरात आणल्या. आज नागपूर शिक्षणाचं हब (hub of education) बनलंय. जिथं मानव संसाधन असेल तिथेच उद्योग येतात. आयआयएमने जागतिक स्तरावरचे ह्युमन रिसोर्सेस तयार केलेत. आयआयएममुळे लवकरंच नागपूर जगाच्या नकाशावर आपले नाव कोरणार आहे, असंही फडणवीस म्हणालेत.

शैक्षणिक संस्थांचा विस्तार

देवेंद्र फडणवीस म्हणाले, नॅशनल लॅा युनिव्हर्सिटीला 600 कोटी रुपये आम्ही दिले. जागा पण दिली. पण त्यांनी नॅशनल लॅा युनिव्हर्सिटीच्या भूमिपूजनाला बोलावलं नाही. उद्घाटनाला बोलावलं नाही, अशी खंत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. परंतु, आयआयएमनं आम्हाला बोलावलं असल्याबद्दल त्यांनी त्यांचे आभार व्यक्त केले. आयआयएमचं कॅम्पास हे खूप सुंदर आहे. राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला. देशाचे पंतप्रधान सात वर्षांपूर्वी एक स्वप्न पाहीलं. युवकांना संधी मिळावी, यासाठी देशातील शैक्षणिक संस्थांच्या विस्ताराची योजना आखली. तत्कालीन मानव संसाधन मंत्री स्मृती इराणी यांनी नागपूरला ही संस्था दिली. त्यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करून ही संस्था नागपूरला व्हावी, यासाठी चर्चा केली. त्यातून ही संस्था उभी राहिली. नागपुरात आयआयएमला सुरुवात झाली. जमीन उपलब्ध करून दिलं. पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन झालं. बिल्डिंग तयार झाली. आता लोकार्पण होत आहे, असंही फडणवीस म्हणाले.

नागपूर शैक्षणिक हब

शिक्षण संस्था नागपुरात आणण्याचं काम आम्ही केलं. खासगी क्षेत्रातील गुंतवणूकही आम्ही केली. नागपूर शैक्षणिक हब झालंय. मानव संसाधन हे स्पर्धात्मक युगात वैश्विक स्तरावर करावं लागेल. गुणवत्तापूर्ण शिक्षण येथे मिळत आहे. कमीतकमी वेळात नागपूर आयआयएमनं कित्तेक मैलाचे दगड पार पाडले आहेत. विदर्भासाठी गौरवशाली बाबी या कॅम्पसमधून निघेल, अशी अपेक्षा देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

हे सुद्धा वाचा