IIM Nagpur | IIM नागपूरचे विद्यार्थी नोकरी शोधणारे नव्हे देणारे असावेत; राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची कॅम्पसच्या लोकार्पणाप्रसंगी अपेक्षा

शैक्षणिक संस्था या केवळ शिकण्यासाठी नसतात. त्या संस्थांमध्ये टॅलेंट लपलेलं असतं. स्टार्ट अप हे आपल्या देशाचं गेम चेंजर ठरू शकते. यातून नोकऱ्या तयार झाल्या पाहिजे. आयआयएम नागपूरने सात एक्सलेन्स सेंटर सुरू केले आहेत. यातून उद्योजक तयार होतील, अशी मला अपेक्षा आहेत.

IIM Nagpur | IIM नागपूरचे विद्यार्थी नोकरी शोधणारे नव्हे देणारे असावेत; राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची कॅम्पसच्या लोकार्पणाप्रसंगी अपेक्षा
आयआयएम नागपूरच्या लोकार्पणाप्रसंगी बोलताना राष्ट्रपती रामनाथ कोविंद. Image Credit source: t v 9
Follow us
| Updated on: May 08, 2022 | 1:16 PM

नागपूर : राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले, IIM नागपूरचं उद्घाटन करताना आनंद होतोय. 132 एकरांत कॅम्पस तयार झालंय. शैक्षणिक संस्था (Educational Institutions) फक्त शिक्षण घेण्याची जागा नाही तर, उद्योजक घडवण्याचं आणि रोजगार देण्याचा हा काळ आहे. आतापर्यंत दुर्लक्षित असलेल्या क्षेत्रात उद्योगाची मोठी संधी (Great Opportunities for Industry) आहे. IIM नागपूरमधून शिक्षणारे विद्यार्थी नोकरी देणारे असावे? नोकरी शोधणारे नाही, असंही राष्ट्रपती म्हणाले. सावित्रीबाई फुले आणि आनंदीबाई जोशी यांच्या भूमित त्यांना ही खरी श्रद्धांजली आहे. त्यांनी शिक्षण क्षेत्रात मोठं योगदान दिलंय. कॅम्पसमध्ये या भागातील इतिहास आणि माहिती पोर्टेट करण्यात आलीय. बाबासाहेब आंबेडकर (Babasaheb Ambedkar) यांनी याच नागपूरच्या भूमित सामाजिक क्रांतीची बीज रोवलीत. नागपूर झिरो माईल आहे, असं राष्ट्रपती म्हणाले.

ज्ञानाचं शेअरिंग झालं पाहिजे

शैक्षणिक संस्था या केवळ शिकण्यासाठी नसतात. त्या संस्थांमध्ये टॅलेंट लपलेलं असतं. स्टार्ट अप हे आपल्या देशाचं गेम चेंजर ठरू शकते. यातून नोकऱ्या तयार झाल्या पाहिजे. आयआयएम नागपूरने सात एक्सलेन्स सेंटर सुरू केले आहेत. यातून उद्योजक तयार होतील, अशी मला अपेक्षा आहेत. त्यातून स्टार्ट अप सारखे उद्योग ते सुरू करतील, असं मला वाटतं. असे प्रोग्राम महिला सक्षमीकरणासाठी मदत करतात. नावीन्याला आयआयटी नागपूरनं प्राधान्य दिलं. यातून आत्मनिर्भर भारत बनन्यास मदत होणार आहे. ज्ञानाच्या शेअरिंगवर आपला भर आहे. जे ज्ञान तुम्ही इथं आत्मसात कराल, ते शेअर केलं पाहिजे, असं ते विद्यार्थ्यांना म्हणालेत. आयआयएम अहमदाबादनं नागपूरच्या आयआयएमची मेंटारशीप स्वीकारली असल्याचं त्यांनी सांगितलं.

पाच हजार कोटी खर्च

पाच हजार कोटी रुपये या कॅम्पसवर खर्च झालेत. भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारचं मी अभिनंदन करतो. कारण त्यांनी एका चांगला उपक्रमाला सुरुवात केली आहे. या कॅम्पसच्या निर्माणामध्ये मदत केलेल्या प्रत्यकाचे आभार व्यक्त करत असल्याचं राष्ट्रपती म्हणाले. शैक्षणिक संस्थांमधून धोरण ठरवली जावीत. फूड डिलिव्हरीच्या क्षेत्रात स्टार्ट अप तयार झालेत. तसंच शिक्षण, आरोग्य या क्षेत्रातही स्टार्ट अप तयार व्हावेत. नवीन उद्योजक अशा शैक्षणिक संस्थांमधून घडले पाहिजेत, असंही राष्ट्रपतींनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.