चंद्रपूरची जागा…; लोकसभेच्या उमेदवारीवर विजय वडेट्टीवार काय म्हणाले?

| Updated on: Mar 24, 2024 | 4:27 PM

Vijay Wadettiwar on Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणूक सध्या देशात होत आहे. अशात राजकीय नेते दावे- प्रतिदावे करत आहेत. काँग्रेसचे नेते, विजय वडेट्टीवार यांनी लोकसभा निवडणूक आणि उमेदवारीवर भाष्य केलं आहे. वंचिलासोबत घेण्यावरही वडेट्टीवार यांनी भाष्य केलं आहे. वाचा...

चंद्रपूरची जागा...; लोकसभेच्या उमेदवारीवर विजय वडेट्टीवार काय म्हणाले?
विजय वडेट्टीवार
Image Credit source: Social Media
Follow us on

चंद्रपूरमधून लोकसभा निवडणूक लढण्यासाठी विजय वडेट्टीवार इच्छूक होते. मात्र नंतर त्यांनी त्यांची मुलगा शिवानी वडेट्टीवार यांचं नाव पुढे केलं. या जागेवर कोण निवडणूक लढणार हे अद्याप स्पष्ट नाही. यावर विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिलीय. विदर्भातील जागा घोषित केली आहे.चंद्रपूरची जागा अजून बाकी आहे. रंगो की होळी मनाने के बाद होईल. हायकमांडला वाटलं असेल जागा घोषित करण्याचा चंद्रपूरचा जागेचा निर्णय काँग्रेसला जिंकण्यासाठी पाऊल टाकत आहे, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

चंद्रपूरची जागा काँग्रेस जिंकणार- वडेट्टीवार

चंद्रपूर ही 100 टक्के ही जागा जिंकणारी आहे. पूर्वी काँग्रेसचा एक खासदार होता. आता 20 खासदार निवडून येईल. त्याची सुरवात चंद्रपुरातून होईल. हायकमांडला अपेक्षित असा निर्णय होईल. राज्यात की दिल्लीत माझी गरज असेल तर तसा निर्णय होईल. वडेट्टीवार दिल्लीत जावे पण कोण असेल ते कळेल, असं वडेट्टीवार म्हणाले.

ती जागा काँग्रेस मिळवेल- वडेट्टीवार

नितीन गडकरी यांच्या उमेदवारीवर वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिलीय. प्रत्येकाला पाच लाखाचा आकडा कुठून येतो कळत नाही. आमचा नागपुरातील उमेदवार तो मातीतील आणि मॅटवरील पैलवान उमेदवार दिला आहे. लढण्याचे डावपेच असलेला उमेदवार आहे. नागपूरची जागा परत कॉंग्रेस मिळवेल, असा विश्वास विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला आहे.

वंचितला सोबत घेणार का?

वंचितसोबत घेण्यावर विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिलीय. वंचितने सोबत एकत्र लढावे अशी इच्छा होती. सगळ्या नेत्यांनी त्यासाठी प्रयत्न केले. राज ठाकरेंवर एकतरी जागा द्या हो, अशी म्हणायची वेळ आली आहे. प्रकाश आंबेडकर मोठे नेते आहे, एक अभ्यासू आणि हुशार नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे बघतात. चार जागेचा विचार करावा असं म्हणणं होते. आज प्रकाश आंबेडकरांसारखे नेते दिसत नाहीत. त्यांनी मल्लिकार्जुन खरगे याना पत्र देऊन उमेदवारला पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. शाहू फुले आंबेडकरचा वसा घेण्याचं काम सुरू आहे, असंही वडेट्टीवार म्हणालेत.

रामटेकची जागा काँग्रेस जिंकणार आहे. समोर उमेदवार कोणीही असू दे. धक्कादायक निकाल असेल. घाबरून अपेक्षित जागा मिळत नसल्याने त्यामुळे उमेदवारावर निर्णय होत नाही. भाजपच्या अधिपतानाची सुरवात महाराष्ट्रमधून होईल, असंही वडेट्टीवार म्हणाले.