उत्तर नागपुरात चार दिवसांपासून पाणीपुरवठा नाही, ओसीडब्ल्यूने नळजोडणी कापल्याचा आरोप

उत्तर नागपुरात गेल्या चार दिवसांपासून नळाच्या पाण्याचा पुरवठा झाला नाही. नळजोडणी अवैध असल्याचं कारण देऊन ओसीडब्ल्यूनं नळजोडणी कापली. याविरोधात नगरसेविका स्नेहा निकोसे यांच्या नेतृत्त्वात नागरिकांनी शनिवारी तीन तास ओसीडब्ल्यूच्या कार्यालयापुढे जलत्याग आंदोलन करण्यात आले.

उत्तर नागपुरात चार दिवसांपासून पाणीपुरवठा नाही, ओसीडब्ल्यूने नळजोडणी कापल्याचा आरोप
पाणीकपात
Follow us
| Updated on: Nov 14, 2021 | 4:38 PM

नागपूर : उत्तर नागपुरात गेल्या चार दिवसांपासून नळाच्या पाण्याचा पुरवठा झाला नाही. नळजोडणी अवैध असल्याचं कारण देऊन ओसीडब्ल्यूनं नळजोडणी कापली. याविरोधात नगरसेविका स्नेहा निकोसे यांच्या नेतृत्त्वात नागरिकांनी शनिवारी तीन तास ओसीडब्ल्यूच्या कार्यालयापुढे जलत्याग आंदोलन करण्यात आले.

उत्तर नागपुरातील बेझनबाग, इंदोरा, सुदर्शन कॉलनी येथे चार दिवसांपूर्वी जुन्या नळजोडण्या कापण्यात आल्या. या नळजोडण्या अवैध असल्याचं कारण ओसीडब्ल्यूनं यासाठी दिलंय. नागपूर मनपानं शहरात पाणीपुरवठ्याची जबाबदारी ऑरेंज सिटी वॉटर प्रायव्हेट लिमिटेड (ओसीडब्ल्यू) यांच्याकडे दिली आहे. नवीन नळजोडणी घ्यावी, असे ओसीडब्ल्यूचं म्हणण आहे. यासाठी प्रत्येकी सहा हजार रुपये नागरिकांना भरावे लागणार आहेत. ही रक्कम एकावेळी देणे काही नागरिकांना शक्य नाही. त्यामुळे इन्स्टॉलमेंटवर रक्कम कशी देता येईल, यासंदर्भात मनपाशी बोलणे सुरू होते. दरम्यान, ओसीडब्ल्यूनं नळजोडणी कापली असल्याचा आरोप नगरसेविका स्नेहा निकोसे यांनी केला.

पालकमंत्र्यांनी घेतली आंदोलकांची भेट

पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी जलत्याग आंदोलन करणाऱ्यांना भेट दिली. 24 तासांत पाणीपुरवठा सुरू करण्याचे आदेश दिले. शिवाय तीन इन्स्टॉलमेंटमध्ये सहा हजार रुपयांची रक्कम ग्राहकांना देता येणार आहे. 30 नोव्हेंबरपर्यंत नवीन नळजोडणी करण्यात येणार आहे.

जलकुंभ स्वच्छता मोहीम सुरू

महापालिका आणि ऑरेंज सिटी वॉटर प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून दरवर्षी जलकुंभ स्वच्छता मोहीम राबविली जाते. यंदा ही मोहीम लकडगंज झोनमध्ये 15 ते 19 नोव्हेंबरदरम्यान राबविण्यात येणार आहे. त्यामुळं या भागातील पाणीपुरवठा पुढील चार दिवस बंद राहणार आहे. सोमवारी सुभाननगर जलकुंभावरून होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. मंगळवारी लकडगंज जलकुंभ एकवरून होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. बुधवारी भांडेवाडी जलकुंभावरून होणार पाणीपुरवठा बंद राहणार आहे. गुरुवारी मिनीमातानगर जलकुंभावरून होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शुक्रवारी लकडगंज जलकुंभ दोनवरून होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

इतर बातम्या :

VIDEO: फडणवीस म्हणाले, शिवसेनेला अडीच वर्षासाठी मुख्यमंत्रीपद दिलं नाही ही चूक होती; विक्रम गोखलेंच्या दाव्याने खळबळ

नागपुरातली 16 ठिकाणं धोकादायक, प्रदूषणात झपाट्यानं वाढ, फुफ्फुसांच्या आजारांचा धोका वाढला?

Non Stop LIVE Update
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.