Corona Vaccination | नागपुरात फक्त 188 बालकांचे लसीकरण, पालकांनी पुढाकार घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

Corona Vaccination | नागपुरात फक्त 188 बालकांचे लसीकरण, पालकांनी पुढाकार घेण्याचे प्रशासनाचे आवाहन
नागपुरात बालकांच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा थंड प्रतिसाद मिळाला.
Image Credit source: tv 9

कोरोनाचा संभाव्य धोका टाळता यावा, आपण व आपल्यासह इतरांना सुरक्षित करता यावे यासाठी प्रत्येक पात्र व्यक्तीने लस घेणे आवश्यक आहे. शहरातील प्रत्येक पात्र व्यक्तीने लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.

सुनील ढगे

| Edited By: गोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Mar 18, 2022 | 2:54 PM

नागपूर : नागपुरात कालपासून 12 ते 14 वयोगटातील बालकांच्या लसीकरणाला (Vaccination of children) सुरुवात झाली. मात्र लसीकरणासाठी होळी आणि परीक्षांचा खोडा आला. मुलांच्या परीक्षा असल्याने आणि होळीमध्ये व्यस्त असल्याने पहिल्या दिवशी लसीकरण कमी झाले. जिल्ह्यात फक्त 188 मुलांचं लसीकरण झालं. शहरातील 81 शहरातील तर ग्रामीण भागात 107 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. होळीनंतर लसीकरणाला वेग येण्याची (Speed ​​up vaccination after Holi) शक्यता आहे. मात्र पालकांनी पुढाकार घेण्याचं प्रशासनाच आवाहन (Administration appeals to parents to take initiative) आहे.

कोरोना लसीकरणासाठी पुढाकार घ्या

कोरोना संसर्गाचा धोका होउ नये यादृष्टीने नागपूर महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात येत आहे. 18 वर्षांवरील सर्वांना कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन, 15 ते 18 वयोगटातील मुलांना कोव्हॅक्सिन आणि आता 12 ते 14 वर्ष वयोगटासाठी कोर्बेव्हॅक्स लस देण्यात येत आहे. कोरोनाचा संभाव्य धोका टाळता यावा, आपण व आपल्यासह इतरांना सुरक्षित करता यावे यासाठी प्रत्येक पात्र व्यक्तीने लस घेणे आवश्यक आहे. शहरातील प्रत्येक पात्र व्यक्तीने लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे. शुक्रवार 18 मार्च रोजी रंगपंचमीमुळे आणि रविवारी 20 मार्च रोजी कार्यालयीन सुट्टीमुळे शहरातील सर्व लसीकरण केंद्र बंद राहणार आहेत. शनिवारी 19 मार्च रोजी सर्व केंद्रांवर लसीकरण सुरळीतरित्या सुरू राहील.

शहरातील लसीकरण केंद्रांची यादी

कोर्बेव्हॅक्स (12 ते 14 वर्ष वयोगट)
लक्ष्मीनगर झोन क्र.1 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पोटर्स कॉम्प्लॅक्स दीक्षाभूमी व जयताळा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र. धरमपेठ झोन क्र. 2 : बुटी दवाखाना, सदर रोग निदान केन्द्र व तेलंगखेडी आयुर्वेदिक दवाखाना. हनुमाननगर झोन क्र. 3 : मानेवाडा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र. धंतोली झोन क्र. 4 : आयसोलेशन हॉस्पिटल आणि एम्स हॉस्पिटल. नेहरूनगर झोन क्र. 5 : ताजबाग नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र. गांधीबाग झोन क्र. 6 : राजकुमार गुप्ता समाजभवन. सतरंजीपुरा झोन क्र. 7 : मेंहदीबाग नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र. लकडगंज झोन क्र. 8 : डिप्टी सिग्नल नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि हिवरीनगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र. आशीनगर झोन क्र. 9 : पाचपावली नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल. मंगळवारी झोन क्र. 10 : डिव्हीजनल रेल्वे हॉस्पिटल व इंदोरा प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र.

Chandrapur Crime | मुलाचा राग काढला बापावर, कुऱ्हाडीने पाडला मुडदा, न्यायालयाने सुनावली जन्मठेप

Vijay Vadettiwar | कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला मदत, चंद्रपुरात 132 महिलांना धनादेश

Bhandara Holi | होळी पेटली पण लाकडांची नव्हे कचऱ्याची! भंडाऱ्यातील गवराळ्यात रंग न उधळता भक्तीत रंगणार गाव

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें