AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Government Hostel : नागपूर विभागातील 70 शासकीय वसतिगृहात प्रवेशाची संधी, अर्ज सादर करण्याचे समाज कल्याण विभागाचे आवाहन

अधिक माहितीसाठी संबंधित शासकीय वसतिगृह तसेच संबंधित जिल्ह्याचे सहायक आयुक्त कार्यालय, समाज कल्याण येथे संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड यांनी केले आहे.

Government Hostel : नागपूर विभागातील 70 शासकीय वसतिगृहात प्रवेशाची संधी, अर्ज सादर करण्याचे समाज कल्याण विभागाचे आवाहन
समाज कल्याण विभागाचे आवाहन
| Updated on: Jul 03, 2022 | 6:46 PM
Share

नागपूर : ग्रामीण भागातील गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची संधी आहे. शहरात मोफत शिक्षणासाठी राहण्याची आणि खाण्यापिण्याची सोय शासकीय वसतिगृहात (Government Hostel) केली जाते. नागपूर विभागात सुमारे ७० अशी वसतिगृह आहेत. या ठिकाणी प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाच्या वतीनं करण्यात आलंय. समाज कल्याण विभागाच्या (Department of Social Welfare) शासकीय वसतीगृहामध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. नागपूर विभागातील 6 जिल्ह्यातील एकूण 70 शासकीय वसतिगृहासाठी ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. 2022-23 या शैक्षणिक वर्षाकरिता शालेय विद्यार्थ्यानी 15 जुलैपर्यंत तर व्यावसायिक अभ्यासक्रमास (Vocational Courses) प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यानी 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत. नागपूर विभागातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्हयातील शैक्षणिक संस्थामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही सुविधा आहे.

आठवी, अकरावी किंवा पदवीच्या विद्यार्थ्यांना संधी

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील शालेय विद्यार्थी, इयत्ता दहावी व अकरावी उत्तीर्ण विद्यार्थी यांना या संधीचा लाभ घेता येईल. तसेच वरिष्ठ महाविद्यालयातील इतर शैक्षणिक, व्यावसायिक अभ्यासक्रमातील प्रथम व व्दितीय वर्षांच्या प्रवेशीत विद्यार्थ्यांना समाज कल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश घेता येईल. तालुका स्तरावर मुलांमुलींचे शासकीय वसतिगृह येथे इयत्ता आठवीपासून ते पुढील अभ्यासक्रमांकरिता प्रवेश अर्ज वाटपाबाबतची प्रक्रिया सुरु झालेली आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी 15 जुलै, इयत्ता दहावी व अकरावी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेले विद्यार्थीसाठी 30 जुलै, बी.ए., बी.कॉम, बी.एस.सी अशा बारावीनंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्यांना या संधीचा लाभ घेतला येईल. तसेच पदविका, पदवी आणि एम.ए, एम.कॉम., एम.एस.सी असे पदवी नंतरचे पदव्युत्तर पदवी, पदविका इत्यादी अभ्यासक्रम (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) विद्यार्थी यांच्यासाठी अर्ज करण्याची मुदत ही 24 ऑगस्टपर्यंत आहे.

सहाय्यक आयुक्त कार्यालयात साधावा संपर्क

व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यानी 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करता येणार आहे. प्रवेशित विद्यार्थ्यांना शासनाकडून नाश्ता, भोजन, निवासाची सोय, शैक्षणिक साहित्य तसेच निर्वाह भत्ता देण्यात येतो. विद्यार्थ्यांना ज्या वसतिगृहात प्रवेश घ्यायचा असेल तेथून अर्ज प्राप्त करावा. नमूद दिनांकापर्यंत आवश्यक त्या कागदपत्रांसह सादर करावेत. विद्यार्थ्यांनी गैरसोय टाळण्यासाठी आपले अर्ज विहीत वेळेत समक्ष परिपूर्ण माहितीसह सबंधित वसतिगृहातच सादर करावेत. अधिक माहितीसाठी संबंधित शासकीय वसतिगृह तसेच संबंधित जिल्ह्याचे सहायक आयुक्त कार्यालय, समाज कल्याण येथे संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड यांनी केले आहे.

पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.