AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Global Leader : ॲड. दीपक चटप ब्रिटिश सरकारचा चेव्हनिंग ग्लोबल लीडर, 45 लाखांची शिष्यवृत्ती मिळवणारा देशातील पहिला तरुण वकील

कोरोना काळात सामाजिक संस्थांना सोबत घेऊन जवळपास 1300 कोलाम कुटुंबांना रेशन किट्स वितरण तर चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गम भागातील कुपोषित बालकांना पोषण आहार किट्स देवून नवसंजीवनी दिली.

Global Leader : ॲड. दीपक चटप ब्रिटिश सरकारचा चेव्हनिंग ग्लोबल लीडर, 45 लाखांची शिष्यवृत्ती मिळवणारा देशातील पहिला तरुण वकील
ॲड. दीपक चटप ब्रिटिश सरकारचा चेव्हनिंग ग्लोबल लीडर
| Edited By: | Updated on: Jul 03, 2022 | 4:06 PM
Share

चंद्रपूर : दुर्गम भागातील शेतकरी कुटुंबातील ॲड. दीपक यादवराव चटप (Adv. Deepak Chatap) हा तरुण वकील ब्रिटिश सरकारचा चेव्हनिंग ग्लोबल लिडर (Chevening Global Leader) ठरला. ब्रिटीश सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या चेव्हेनिंग या जागतिक प्रतिष्ठेच्या 45 लाख रुपयांच्या शिष्यवृत्तीचा मानकरी झाला. 24 व्या वर्षी ही शिष्यवृत्ती मिळवणारा देशातील तो पहिला तरुण वकील ठरला. सामाजिक नेतृत्व करू इच्छिणाऱ्या जगभरातील युवकांना ब्रिटिश सरकारची ही शिष्यवृत्ती देते. लंडनच्या सोएस या जगातील सर्वोत्तम विद्यापीठात उच्चशिक्षणासाठी दीपकची निवड झाली. त्याच्या कामाची दखल घेत शिक्षणाच्या संपूर्ण खर्चाची जबाबदारी ब्रिटीश सरकारने (British Government) घेतली आहे. दीपक कोरपना तालुक्यातील लखमापूर येथील रहिवासी आहे. दीपक पाथ या सामाजिक संस्थेचा संस्थापक आहे. या माध्यमातून राज्यातील दुर्बल घटकांच्या मूलभूत प्रश्नांना कायद्याने वाचा फोडण्याचे विधायक काम करत आहे. शेतकरी नेते ॲड. वामनराव चटप, पद्मश्री डॉ. अभय बंग, विधिज्ञ असीम सरोदे व तत्कालीन मंत्री जयंत पाटील यांच्यासमवेत सामाजिक व विधिविषयक केलेले दीपकचे काम दखलपात्र ठरले.

मानवाधिकार आयोगात तक्रारी

दीपक हा यादवराव व हेमलता चटप या शेतकरी दाम्पत्याचा मुलगा. दीपकचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत व माध्यमिक शिक्षण गडचांदुर येथे पूर्ण केले. पुणे येथील नामांकित आयएलएस विधी महाविद्यालयातून कायद्याची पदविका प्रथम श्रेणीत मिळवली. शिक्षण घेताना मुंबई येथील अरबी समुद्रातील प्रदूषणाची याचिका राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात दाखल केली. शेतकरी आत्महत्येविषयक मानवाधिकार आयोगात तक्रारी दिल्या. विधीमंडळ अधिवेशन काळात लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून दुर्गम भागातील प्रश्न सभागृहात मांडले. शेती व विधीविषयक चळवळीत सक्रिय सहभाग नोंदविला. लंडन स्कूल ऑफ इकॉनमिक्सला शिक्षण घेणारा मित्र प्रवीण निकम, लंडन विद्यापिठातील सोहेल भट्ट, भाऊ डॉ. जयदीप चटप यांनी दीपकला प्रेरणा दिली. राजू केंद्रे, अविनाश पोईनकर, बोधी रामटेके, वैष्णव इंगोले आदी मित्रांनी साथ दिली.

जागतिक पातळीवर दखल घेण्याचं कारण काय

लढण्याची वेळ आलीय, हा काव्यसंग्रह वयाच्या 18 व्या वर्षी तर कृषी कायदे : चिकित्सा व न्यायाधिकरणाची गरज, हे दीपकने लिहिलेले पुस्तक चर्चेत राहिले. गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील आदिम कोलाम व माडिया समाजाच्या मूलभूत प्रश्नांवर मानवाधिकार आयोग व उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. संविधानिक नैतिकता हा ऑनलाईन कोर्स तयार करून राज्यातील 1200 विद्यार्थ्यांना संविधानविषयक प्रशिक्षण दिले. कोरोना काळात सामाजिक संस्थांना सोबत घेऊन जवळपास 1300 कोलाम कुटुंबांना रेशन किट्स वितरण तर चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गम भागातील कुपोषित बालकांना पोषण आहार किट्स देवून नवसंजीवनी दिली. कृषी न्यायाधिकरण कायद्याचे अशासकीय विधेयक तत्कालीन खासदार राजीव सातव यांनी 2018 ला लोकसभेत मांडले. या विधेयकाचा मसुदा तयार करण्यात दीपकची महत्वाची भूमिका पार पाडली. कोरो इंडिया फेलोशिपच्या माध्यमातून तळागळात मूलभूत संविधानिक हक्कांवर काम केलं.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.