AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur | दोन ज्येष्ठांच्या अवयवदानातून सहा जणांना नव’जीवन’; मुलींच्या पुढाकारातून वडिलांचे अवयवदान

अवयवदानासाठी डॉ. तपन बोदेले यांनी अंजनकर यांचा मुलगा शुभम, अभिषेक, पत्नी माया व मुलगी प्रगती यांच्याशी संवाद साधला. त्यांना अवयवदानाचे महत्त्व पटवून दिले. त्यानंतर कुटुंबीयांनी अवयवदानासाठी होकार दर्शविला.

Nagpur | दोन ज्येष्ठांच्या अवयवदानातून सहा जणांना नव'जीवन'; मुलींच्या पुढाकारातून वडिलांचे अवयवदान
organ donation
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Dec 18, 2021 | 10:41 AM
Share

नागपूर : दोन मेंदूपेशी मृत झालेल्या वृद्ध व्यक्तींच्या अवयवदानातून सहा जणांना जीवनदान मिळाले. तर नेत्रदानातून दोन दृष्टिहिनांना नव्यानं जग बघता येईल. अमरावतीतील तीन मुलींनी पुढाकार घेतल्यानं त्यांच्या वडिलांचं अवयवदान झालं. नांदगाव पेठच्या कडू कुटुंबीयांनी यासाठी पुढाकार घेतला.

ग्रीन कॉरिडोरच्या मदतीनं 190 किमीचा प्रवास

अमरावतीच्या नांदगाव पेठचे गजानन पंजाबराव कडू (65) यांची प्रकृती खराब झाली. त्यांना 16 डिसेंबरला परतवाड्यातील भंसाली मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यांना त्याचदिवशी सायंकाळी डॉक्टरांनी तपासून मेंदूमृत घोषित केले. त्यानंतर मेंदू मृत समितीचे सदस्य डॉ. आशिष भंसाली यांनी कडू यांच्या मुली मीनल काळे, जावई प्रफुल्ल काळे, माधुरी वानखेडे, प्रियंका लायस्कर यांचे अवयवदानाबाबत समुपदेशन केले. मुलींनी अवयवदानास होकार दर्शविला. 35 ते 40 वाहतूक पोलिसांच्या मदतीने ‘ग्रीन कॉरिडोअर’द्वारे गजानन कडू यांचे दोन मुत्रपिंड, एक यकृत हे नागपूरला आणण्यात आले. परतवाडा ते नागपूर हे 190 किमीचे अंतर कापण्यासाठी चार तासांचा वेळ लागतो. ग्रीन कॉरिडोअरच्या मदतीनं अडीच तासांत प्रवास पूर्ण करण्यात आला. यातील एक मूत्रपिंड किंग्सवे हॉस्पिटलमधील 47 वर्षीय पुरुषावर दुसरे मुत्रपिंड मेडिट्रिना हॉस्पिटलमधील 47 वर्षीय महिलेवर तसेच यकृत हे न्यू ईरा हॉस्पिटल येथील 55 वर्षीय पुरुषावर यशस्वीरित्या प्रत्यारोपित करण्यात आले. डॉ. विभावरी दाणी व डॉ. संजय कोलते यांच्या मार्गदर्शनात वीना वाठोडे यांनी अवयवदानाची प्रक्रिया पूर्ण केली.

अंजनकर कुटुंबीयांनी घेतला अवयवदानाचा निर्णय

नागपूरच्या जरीपटका येथील हुडको कॉलनीतील 60 वर्षीय शेखर खुशाला अंजनकर यांची 13 डिसेंबरला अचानक प्रकृती खालावली. त्यांना सकाळी 9.30 वाजता मेडिट्रिना हॉस्पिटल येथे भरती करण्यात आले. त्यांच्या चाचण्या केल्या असता त्यांचा रक्तस्त्राव झाल्याचे निदान झाले. दरम्यान, डॉक्टरांकडून त्यांच्यावर उचार करूनही ते प्रतिसाद देत नव्हते. 15 डिसेंबरला येथील डॉक्टरांनी मेंदूमृत्यूची तपासणी केली असता ब्रेन डेड असल्याचे घोषित करण्यात आले. अवयवदानासाठी डॉ. तपन बोदेले यांनी अंजनकर यांचा मुलगा शुभम, अभिषेक, पत्नी माया व मुलगी प्रगती यांच्याशी संवाद साधला. त्यांना अवयवदानाचे महत्त्व पटवून दिले. त्यानंतर कुटुंबीयांनी अवयवदानासाठी होकार दर्शविला.

दोन्ही किडन्या आल्या कामी

डॉ. बोदेले यांनी अवयवदानाच्या प्रतीक्षेत असलेली यादी तपासणी. त्यानुसार शेखर अंजनकर यांचे यकृत हे मेडिट्रिना हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या ६४ वर्षीय पुरुषावर प्रत्यारोपित करण्यात आले. तसेच एक किडनी ही मेडिट्रिना हॉस्पिटलमधीलच ४७ वर्षीय महिलेवर तर दुसरी किडनी ही केअर हॉस्पिटल येथील ३८ वर्षीय महिलेवर प्रत्यारोपित करण्यात आली. त्यांचे हृदय व दोन्ही फुफ्फूस हे त्यांचे वय जास्त असल्यामुळे प्रत्यारोपण करण्यास योग्य नव्हते, अशी माहिती झोनल ट्रासप्लांट कॉर्डिनेशन सेंटरचे सचिव डॉ. संजय कोलते यांनी दिली.

Nagpur | एम्सच्या संचालकांची बनावट इंस्टाग्राम आयडी!, सायबर गुन्हेगारानं लढवली शक्कल, वाचा काय आहे प्रकरण?

Nagpur| विद्यार्थ्याला कोरोनाची लागण; शाळा आठवड्याभरासाठी बंद

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा