AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ‘स्वाभीमानी’ आक्रमक; आजपासून तुपकरांचे बेमुदत उपोषण

कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न पुन्हा एकदा पेटन्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी  स्वाभिमानी शेतकरी संघटना रिंगणात उतरली आहे. कापूस आणि सोयाबीनला योग्य भाव मिळावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे.

कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर 'स्वाभीमानी' आक्रमक; आजपासून तुपकरांचे बेमुदत उपोषण
| Edited By: | Updated on: Nov 17, 2021 | 12:03 PM
Share

नागपूर – कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न पुन्हा एकदा पेटन्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी  स्वाभिमानी शेतकरी संघटना रिंगणात उतरली आहे. कापूस आणि सोयाबीनला योग्य भाव मिळावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे. आपल्या मागणीसाठी तुपकर हे आजपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात करणार आहेत. ते नागपूरच्या संविधान चौकात उपोषणाला बसणार आहेत.

मराठवाडा, विदर्भातील प्रत्येक गावात प्रभात फेरी 

विदर्भाप्रमाणाचे मराठवाड्यात देखील मोठ्या प्रमाणात कापूस उत्पादन शेतकरी आहेत. खर्चाच्या तुलनेमध्ये कापसाला योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा यासाठी 18 नोव्हेंंबरला स्वाभिमानिच्या वतीने मराठवाडा आणि विदर्भातील प्रत्येक गावांमध्ये प्रभातफेरी काढण्यात येणार आहे. तसेच याच दिवशी धरणे आणि ठिय्या आंदोलनाच्या माध्यमातून संघटनेच्या वतीने जोरदार शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे.

रास्तारोको आंदोलन 

त्यानंतर 19 नोव्हेंबरला आपल्या मागण्यांसाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्यावतीने विदर्भ आणि मराठवाड्यात विविध ठिकाणी रास्तारोको आंदोलन देखील करण्यात येणार आहे. जोपर्यंत सरकार शेतकऱ्यांची दखल घेत नाही. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचे तुपकर यांनी म्हटले आहे.आमचा हा लढा कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी असून, जोपर्यंत मालाला योग्य भाव मिळणार नाही, तोपर्यंत शांत बसणार नसल्याचेही ते म्हणाले आहेत.

तुपकर यांना पोलिसांचे पत्र 

दरम्यान त्रिपुरामध्ये मशिदीवर झालेल्या कथील हल्ल्याचे पडसाद विदर्भात उमटल्याचे पहायला मिळाले होते. अमरावतीमध्ये हिंसाचार उसळला होता, जमावाकडून दगडफेक करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर शहरात संचारबंदी करण्यात आली आहे. संचारबंदी असल्याने तुपकर यांनी आंदोलन कुरू नये असे पोलिसांनी म्हटले आहे. आंदोलनासंदर्भांत पोलिसांनी तुपकर यांना एक पत्र देखील पाठवले आहे. ज्यामध्ये संचारबंदी असल्याने आंदोलन करू नका असे म्हटले आहे.

संबंधित बातम्या 

कोण होतास तू… काय झालास तू…अरे वेड्या असा कसा वाया गेलास तू; फडणवीसांची राऊतांवर जळजळीत टीका!

सुधीर मुनगंटीवार सोनार कधीपासून झाले?, राजकारणी आहात, कॅरेट तपासत बसू नका; अनिल परबांचा टोला

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.