Vedio भीती कोरोनाची, निर्बंध लावण्याचा विचार नाही, विजय वडेट्टीवार यांचे स्पष्टीकरण

शाळाही बंद होणार नाही. पण शाळेत कोविडचे नियम पाळणे गरजेचं आहे, असं आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले. देशातून येणाऱ्या प्रवाशांना विलीगीकरण अनिवार्य असल्याचंही त्यांनी सांगितलं.

Vedio भीती कोरोनाची, निर्बंध लावण्याचा विचार नाही, विजय वडेट्टीवार यांचे स्पष्टीकरण
आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार

नागपूर : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा धसका बहुतेकांनी घेतलाय. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिलीय. पण, राज्यात कोणत्याही प्रकारचे निर्बंध लावण्याचा सध्या तरी विचार नसल्याचं त्यांनी सांगितलं. टीव्ही ९ मराठीशी ते बोलत होते.

विजय वडेट्टीवार म्हणाले, सध्या महाराष्ट्रात कुठलेही निर्बंध लावण्याचा विचार नाही. मुंबई लोकलवर निर्बंध लादल्याने अनेकांच्या नोकऱ्यावर गदा येतील. मुंबईत लोकलशिवाय पर्याय नाही. त्यामुळं लोकलवर निर्बंध लादण्याचा सध्या विचार नाही, असंही वडेट्टीवार म्हणाले.
शाळाही बंद होणार नाही. पण शाळेत कोविडचे नियम पाळणे गरजेचं आहे, असं आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले. देशातून येणाऱ्या प्रवाशांना विलीगीकरण अनिवार्य असल्याचंही त्यांनी सांगितलं.

जनतेनं भयभित होऊ नये

तिसरी लाट अपेक्षित धरून प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. ज्या-ज्या गोष्टींची आवश्यकता असेल, तशी तयारी करीत आहोत. मुख्यमंत्र्यांनी व्हीसी घेऊन तशा सूचना दिल्या आहेत. जनतेनं भयभित होण्याची गरज नाही, असं मत विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलं.

भविष्याचा विचार करून निर्णय

शाळा सुरू केल्या आहेत. शाळा बंद करण्याचा सध्यातरी विचार नाही. दोन वर्षांनी पिढी मागे गेले आहेत. काही गोष्टी अनिवार्य कराव्या लागतील. मुलांनी मास्क शाळेत काढू नये. भविष्यातील विचार करूनच निर्णय घेतले जातील, असंही वडेट्टीवार म्हणाले.

प्रत्येकाला विलगीकरणात ठेवणे अशक्य

विदेशातून रोज देशात १८ हजार लोक येतात. येवढ्या लोकांना विलगीकरणात ठेवणे सध्या तरी शक्य नाही. कारण हॉटेल्स सुरू झालेले आहेत. मग, येवढ्या लोकांना कुठे आणि कसे ठेवणार. त्यामुळं काळजी घेणं, हे आपल्या हातात आहे, असंही वडेट्टीवार यांनी सांगितलं.

Nagpur काय म्हणता, कॅमेरा रोखणार आग! वाचा कसा आहे अल्ट्रा सॅानिक कॅमेरा

Nagpur Crime गिट्टीखदानमध्ये चोरांची दहशत, वृद्ध महिलेचे हातपाय बांधले, दागिने घेऊन पळाले

 

Published On - 4:45 pm, Sat, 4 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI