AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur | दिवसा रेकी, संध्याकाळी पागलपंती नि रात्री चोरी; अखेर आला पोलिसांच्या जाळ्यात

तो चोरी करताना एकटाच राहायचा. दिवसभर सायकल रिक्षा घेऊन एखादं दुकान शोधायचं. त्याचा दिवसभर अभ्यास झाला की, त्याचं दुकानासमोर संध्याकाळी पागल बनून बसायचं. रात्री त्याच दुकानात चोरी करायची.

Nagpur | दिवसा रेकी, संध्याकाळी पागलपंती नि रात्री चोरी; अखेर आला पोलिसांच्या जाळ्यात
सक्करदरा पोलिसांनी चोराकडून जप्त केलेले साहित्य व पैसे.
| Edited By: | Updated on: Dec 22, 2021 | 4:24 PM
Share

नागपूर : दिवसा सायकल रिक्षा घेऊन रेकी करायची… संध्याकाळ झाली की पागलाच रूप धारण करायचं… चोरी करण्याच्या ठिकाणी थांबायचं… आणि संधी मिळताच बंद दुकानात घुसून चोरी करायची… अश्या हुशार चोरट्याच्या मुसक्या आवळण्यात सक्करदरा पोलिसांना यश आलंय. त्याच्याकडून चोरीचे साहित्य आणि दीड लाख रुपये सुद्धा जप्त करण्यात आले.

वेगवेगळ्या ठिकाणी करायचा चोऱ्या

हा आरोपी आधी पुणे, नाशिक, चंद्रपूर अश्या वेगवेगळ्या शहरात चोरी करायचा. चोरी केल्यानंतर तो दुसऱ्या शहरात शिफ्ट व्हायचा. त्यामुळं तो काही पोलिसांच्या हातात येत नव्हता. या आरोपीनं नंतर आपला मोर्चा नागपूरकडे वळविला. नागपुरातही त्यानं 3 ठिकाणी चोऱ्या केल्या. मात्र पोलिसांच्या हाती लागला आणि जेलमध्ये पोहोचला.

अशी होती चोरी करण्याची पद्धत

नंदू परदेशी आत्राम असं या आरोपीचं नाव आहे. तो चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथील रहिवासी आहे. मात्र त्याच कार्यक्षेत्र मोठं आहे. तो चोरी करताना एकटाच राहायचा. दिवसभर सायकल रिक्षा घेऊन एखादं दुकान शोधायचं. त्याचा दिवसभर अभ्यास झाला की, त्याचं दुकानासमोर संध्याकाळी पागल बनून बसायचं. रात्री त्याच दुकानात चोरी करायची. अशी त्याची अनोखी पद्धत होती. याच पद्धतीनं त्यानं अनेक शहरात चोरी केल्या.

नागपुरात तीन ठिकाणी चोऱ्या

मात्र नागपुरात त्याचे फासे 3 चोऱ्या केल्यानंतर उलटे पडले आणि पोलिसांच्या हाती लागला, असल्याची माहिती सक्करदऱ्याचे पोलीस निरीक्षक धनराज पाटील यांनी दिली. चोरीची पद्धत त्याची वेगळी होती. अनेक ठिकाणी तो वाचला. मात्र त्याची हुशारी नागपूर पोलिसांच्या समोर चालली नाही आणि जेलमध्ये पोहचला…

Amravati cool | ठंडा ठंडा कुल कुल, चिखलदऱ्यात रेकॉर्डब्रेक थंडी; पारा 6.8 अंशावर

Nagpur | महिन्याभरापासून चर्चा मगरीची! वन विभागाचं मिशन मगर; नाग नदीत लावले पिंजरे, ट्रॅप कॅमेरे

Nagpur RSS | हैदराबादचे भाग्यनगर असं नामकरण? आरएसएसच्या टि्वटर हँडलवर उल्लेख; पाच ते सात जानेवारीला भाजपसोबत बैठक

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.