AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

साईबाबा विषयीचा निर्णय टेक्निकल ग्राउंडवर, देवेंद्र फडणवीस म्हणाले, आम्ही सर्वोच्च…

प्रो. जी. एन. साईबाबा व पाच माओवाद्यांना मे 2014 मध्ये अटक केली होती.

साईबाबा विषयीचा निर्णय टेक्निकल ग्राउंडवर, देवेंद्र फडणवीस म्हणाले, आम्ही सर्वोच्च...
साईबाबा विषयीचा निर्णय टेक्निकल ग्राउंडवरImage Credit source: tv 9
Govinda Hatwar
Govinda Hatwar | Updated on: Oct 14, 2022 | 10:00 PM
Share

सुनील ढगे, TV9 मराठी, प्रतिनिधी, नागपूर : प्रो. साईबाबाची उच्च न्यायालयानं आठ वर्षांनंतर निर्दोष मुक्तता केली. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, साईबाबा (Prof. Saibaba) विषयीचा निर्णय हा टेक्निकल ग्राउंडवर (Technical Ground) झालेला आहे.खरं म्हणजे हा निर्णय आम्हाला धक्कादायक आहे. विशेषता जे पोलीस नक्षलवाद्यांशी लढतात. ज्यांना आपला जीव गमवावा लागतो. त्यांच्या विरुद्ध माईंन लावून त्यांची वाहन उडवली जातात, अशा पोलिसांकरिता, त्यांच्या कुटुंबाकरिता सर्वाधिक धक्कादायक असा निकाल आहे. त्यामुळे या निकालाविरुद्ध आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलो आहे.

प्रो. जी. एन. साईबाबा व पाच माओवाद्यांना मे 2014 मध्ये अटक केली होती. त्यानंतर 2017 मध्ये गडचिरोली कोर्टाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. आज मुंबई हाय कोर्टाच्या नागपूर खंडपीठाने (Nagpur Bench) साईबाबाची निर्दोष मुक्तता केली आहे.

ज्या व्यक्तीविरुद्ध एवढे पुरावे आहेत. त्याला सोडून देणे हा त्या शहिदांवर अन्याय आहे. त्यामुळे आम्ही हे सगळं सर्वोच्च न्यायालयात योग्य प्रकारे मांडू आणि न्याय मिळवण्याचा प्रयत्न करू, असं आश्वासन फडणवीस यांनी दिलं.

पुणे घटनेवर फडणवीस म्हणाले, पुण्यातील मुलीला फरफटत नेण्याची घटना ही गंभीर आहे. त्यावर कारवाई केली जाईल. मात्र सगळे ऑटो रिक्षावाल्यांना दोषी मानणे योग्य होणार नाही. चूक केली असेल त्याच्यावर कारवाई होईल. अंधेरी पोटनिवडणुकीविषयी स्ट्रॅटेजी काय विचारलं असता त्यांनी ठरवू असं सांगितलं.

साईबाबा यांच्यावर देशात अराजकता माजविण्याचा तसेच गद्दारीचा आरोप ठेवला होता. कोर्टानं त्यांना दोषी ठरविलं होतं. त्याविरोधात साईबाबा यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणी कोर्टानं आज साईबाबा यांची निर्दोष मुक्तता केली.

Follow Us
अभिनेता टायगर श्रॉफ प्रकरणी खळबळजनक ऑडिओ क्लिप समोर, घटनेचा तपास...
अभिनेता टायगर श्रॉफ प्रकरणी खळबळजनक ऑडिओ क्लिप समोर, घटनेच्या तपासाला वेगळेच वळण
टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळ्या झाडल्या, बॉलिवूडची झोप उडवणारं कारण समोर
टायगर श्रॉफच्या गाडीवर धाडधाड गोळ्या झाडल्या, पण कारण काय? बॉलिवूडची झोप उडवणारं कारण समोर!
लडाखमधील सर्व खटले आता एकाच दिवशी? भारताच्या सर्वोच्च न्यायालयात...
लडाखमधील सर्व खटले आता एकाच दिवशी? सर्वोच्च न्यायालयात... नेमका निर्णय काय?
भिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा थरारक व्हिडीओ समोर; अचानक बाईकवरून..
Tiger shroff Video : अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा पहिला थरारक व्हिडीओ समोर; अचानक बाईकवरून आलेले तिघं...
अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार, 3 अज्ञातांकडून... पोलिसांची माहिती काय?
Latest Update : अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार, 3 अज्ञातांकडून... पोलिसांची माहिती काय?
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सिंचन प्रकल्पांवरील अनावश्यक खर्च टाळा,
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सिंचन प्रकल्पांवरील अनावश्यक खर्च टाळा, इतर योजनांमधील निधी...
राहुल गांधींचा मोदी-शाहांना इशारा! ‘व्होट चोरी’चा हिशेब चुकता करणार,
राहुल गांधींचा मोदी-शाहांना इशारा! ‘व्होट चोरी’चा हिशेब चुकता करणार, म्हणाले एक्सपायरी डेट जवळ आली
वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर वाद; राजकीय प्रतिक्रियांना...
वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर वाद; राजकीय प्रतिक्रियांना उधाण
पदवीधर निवडणुकीत विजयाचा विश्वास! कैलास पाटील म्हणाले, ठाकरे गट...
पदवीधर निवडणुकीत विजयाचा विश्वास! कैलास पाटील म्हणाले, ठाकरे गट...
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड...
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड सहभागी,