“एकनाथ शिंदे यांचा भूखंड घोटाळा लवंगी फटाका आहे का?, देवेंद्रजी, तुमच्याकडून ही अपेक्षा नाही”

| Updated on: Dec 27, 2022 | 11:29 AM

एक-दोन नव्हे तर अख्खं मंत्रिमंडळ अडचणीत येणार आहे, असं म्हणत खासदार संजय राऊत यांनी नागपुरातून शिंदे सरकारवर हल्लाबोल केलाय.

एकनाथ शिंदे यांचा भूखंड घोटाळा लवंगी फटाका आहे का?, देवेंद्रजी, तुमच्याकडून ही अपेक्षा नाही
Follow us on

नागपूर : एकनाथ शिंदे यांनी केलेला भूखंड घोटाळा बॉम्ब नाही तर काय आहे? देवेंद्र फडणवीस यांना या घोटाळा वाटत नाही? हे गंभीर आहे. हे योग्य नाही. देवेंद्र फडणवीसजी, तुमच्याकडून आम्हाला या अपेक्षा नाहीत, असं म्हणत ठाकरेगटाचे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या विधानाला प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊत (Sanjay Raut) आज नागपुरात आहेत. तिथे माध्यमांशी बोलताना राऊतांनी फडणवीस यांच्या विधानाला प्रत्युत्तर दिलंय.

विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सध्या सुरु आहे. अधिवेशनात विविध मुद्द्यांवर चर्चा होतेय. याच दरम्यान शिवसेना ठाकरे गट आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात बॉम्ब वॉर सुरु आहे. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी आपल्याकडे बॉम्ब असल्याचं म्हटलं आणि हे बॉम्ब आपण लवकरच फोडणार असल्याचं म्हटलं. त्यावर ठाकरे गटाकडे बॉम्ब नव्हे तर लवंगी फटाके असल्याचं म्हटलं. याला आता संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे.

फडणवीस काय म्हणाले?

शूट अॅण्ड स्कूट अशी ही निती आहे. कुठलंही प्रकरण उकरून काढायचं. त्यावरून गोंधळ घालायचा. मग आम्ही उद्दर देत असू तर ते घ्यायचं नाही. अशा प्रकारचा ठाकरेगटाचा प्रयत्न दिसतोय. आतापर्यंत तरी ते जे बॉम्ब म्हणत आहेत. ते लवंगी फटाके देखील नाहीयेत. आमच्याकडे खूप बॉम्ब आहेत. कधी काढायचे ते ठरवू. पण सध्या यांचे लवंगी फटाके काय आहेत ते आम्ही बघू, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत.

विरोधी पक्षात असताना भ्रष्टाचाराची प्रकरणं अत्यंत समर्थपणे लावून धरणारे देवेंद्र फडणवीसा आता शांत का आहेत? भ्रष्टाचारी मंत्र्यांची पाठराखण का करत आहेत. हे पाहून त्यांची सहानुभूती वाटतेय, असंही संजय राऊतही राऊत म्हणालेत.

एक-दोन नव्हे तर अख्खं मंत्रिमंडळ अडचणीत येणार आहे, असं म्हणत खासदार संजय राऊत यांनी नागपुरातून शिंदे सरकारवर हल्लाबोल केलाय.