AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video – शिवसेनेचे आमदार म्हणतात, आत्मचिंतन करण्याची गरज; विदर्भात पक्षाला का मिळालं नाही योग्य स्थान?

राज्यात शिवसेनेचं सरकार आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचे आहेत. असं असताना विदर्भात मात्र पक्ष चौथ्या स्थानावर घसरला. यामागचे कारण काय याचे आत्मचिंतन करण्याची गरज आहे, असं पक्षाचेच आमदार सांगतात.

Video - शिवसेनेचे आमदार म्हणतात, आत्मचिंतन करण्याची गरज; विदर्भात पक्षाला का मिळालं नाही योग्य स्थान?
शिवसेनेचे आमदार आशिष जयस्वाल
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Jan 20, 2022 | 2:34 PM
Share

नागपूर : राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना विदर्भातील अनेक नगरपंचायतीत शिवसेनेचं पानीपत झालंय. विदर्भात शिवसेना चौथ्या क्रमांकावर गेलाय. विदर्भात काल आलेल्या निकालात नगरपंचायतीच्या 494 जागांपैकी 48 जागा शिवसेनेला मिळाल्यात. विदर्भात शिवसेना पक्षाला योग्य ते स्थान मिळालं नाही. निवडणूक कोणतीही असो. शिवसेनेला फारसे काही मिळत नाही. लोकसभेत रामटेकचे खासदार शिवसेनेचे आहेत. पण, विधानसभेतंही शिवसेनेला फारसे काही मिळत नाही. जिल्हा परिषदेत शिवसेनेचे उमेदवार निवडूण येत नाही. नगर परिषदेतंही निकाल येत नाही. पक्षाने याची योग्य ती काळजी घ्यावी, ती काळजी घेतल्याशिवाय चांगले निकाल येणार नाही, यावर पक्षाने आत्मचिंतन करण्याची गरज आहे, असा घरचा आहेर राज्यमंत्री दर्जा असलेले शिवसेना आमदार आशिष जैसवाल यांनी दिलाय.

हिंगण्यात भाजपचा विजय, तर कुहीत काँग्रेसची सत्ता

नागपूर जिल्ह्यातील हिंगणा नगरपंचायत निवडणुकीत भाजपाने दमदार विजय मिळविला. तर कुही नगरपंचायतीत अपक्ष उमेदवाराच्या बळावर काँग्रेसचा सत्तेचा मार्ग सुकर झाला आहे. कुही नगरपंचायतची निवडणूक ओबीसी आरक्षणामुळे चार प्रभागाला स्थगिती देऊन मागील बुधवारी तहसील कार्यालयात सर्व प्रभागांची मतमोजणी करण्यात आली. पाच फेर्‍या करून 17 प्रभागातील मतमोजणी करण्यात आली. हिंगणा नगरपंचायत समितीत एकूण 17 उमेदवार निवडूण आले. त्यामध्ये भाजपा – 9 राष्ट्रवादी कॉंग्रेस – 5, शिवसेना – 1, अपक्ष – 2 अशी स्थिती आहे. कुही नगरपंचायतीत एकूण 17 उमेदवार निवडूण आले. कॉंग्रेस – 8, राष्ट्रवादी – 4, भाजपा – 4, अपक्ष – 1 असे उमेदवारांचा समावेश आहे.

हे उमेदवार आलेत निवडूण

जयश्री धांडे (राष्ट्रवादी), निखिल येळणे (भाजप), विद्या लेंडे (अपक्ष), शीतल येळणे (काँग्रेस), रुपेश मेश्राम (काँग्रेस), मयूर तळेकर (काँग्रेस), वैशाली सोमनाथे (राष्ट्रवादी), विनोद हरडे (राष्ट्रवादी), निशा घुमरे (काँग्रेस), सरीन शंभरकर- (काँग्रेस), अमित ठवकर- (काँग्रेस), नेहा मनसारे (भाजप), हर्षा इंदोरकर (काँग्रेस), वर्षा धनजोडे (भाजप), नरेंद्र झुरमुरे (भाजप), सुषमा देशमुख (राष्ट्रवादी काँग्रेस), शारदा दुधपचारे- (काँग्रेस) हे उमेदवार निवडून आलेत.

NMC Election | नागपूर भाजपात कोण करतंय गुलाम बनविण्याचा प्रयत्न; अविनाश ठाकरे यांच्या पोस्टने खळबळ, पोस्ट नेमकी काय?

Gondia ZP Election | प्रफुल्ल पटेलांच्या जिल्ह्यात भाजपचे वर्चस्व; काँग्रेसच्या नाना पटोले यांनाही धक्का!

Bhandara ZP Election | भंडाऱ्यात 21 जागांसह काँग्रेस मोठा पक्ष, सत्तेच्या समीकरणासाठी काय करावं लागणार?

Follow Us
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल