AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सत्यजित तांबे यांना समर्थन वाढतेय; नाना पटोले यांना आता नागपुरातूनच शह देण्याचा प्रयत्न

उमेदीच्या नेत्यांना त्रास द्यायचा आणि त्यांना बाहेर जाण्यास भाग पाडायचं. असं काम प्रदेशाध्यक्ष नाना पटोले करत आहेत, असा आरोपही आशिष देशमुख यांनी केला.

सत्यजित तांबे यांना समर्थन वाढतेय; नाना पटोले यांना आता नागपुरातूनच शह देण्याचा प्रयत्न
नाना पटोले
| Edited By: | Updated on: Feb 06, 2023 | 4:42 PM
Share

नागपूर : नाशिकमधील प्रकरणावरून सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांनी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्यावर टीका केली. एबी फार्म माझ्या नावानं दिला नव्हता. मला डावलण्याचा प्रयत्न केला गेला होता, असा आरोप सत्यजित तांबे यांनी केला. त्यानंतर बाळासाहेब थोरात यांचीही काहीसी नाराजी त्यांच्या वक्तव्यातून दिसली. विजय वडेट्टीवार यांनीही काहीसी नाराजी व्यक्त केली.  पक्षातूनच नेते आता नाना पटोले (Nana Patole) यांना शह देण्याचा प्रयत्न करत असल्याचं चित्र आहे.

गेल्या पंधरा-वीस दिवसापूर्वी एक विस्तारित कार्यकारिणीची बैठक झाली होती. तेव्हा देखील मी म्हटलं होतं महाराष्ट्रातील मोठ्या मोठ्या नेत्यांचा आपसात वैमनस्य आहे. ते बंद व्हावं, अशी अपेक्षा आशिष देशमुख यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, मी त्यालाच अनुसरून मल्लिकार्जुन खर्गे यांनासुद्धा पत्र लिहिलं.

पटोले यांचा हाय व्होल्टेज ड्रामा

आता माजी आमदार आशिष देशमुख यांनीसुद्धा नाना पटोले यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. तांबे प्रकरणात नाना पटोले यांचा हाय व्होल्टेज ड्रामा झाला. ते सत्यजित तांबे यांनी सांगितलेल्या बाबीवरून स्पष्ट झालं. उमेदीच्या नेत्यांना त्रास द्यायचा आणि त्यांना बाहेर जाण्यास भाग पाडायचं, असं काम प्रदेशाध्यक्ष नाना पटोले करत आहेत, असा आरोपही आशिष देशमुख यांनी केला.

बाळासाहेब थोरात यांसारखे ज्येष्ठ नेते यांच्यासारख्या नेत्यांना सुद्धा त्रास देण्याचे काम झालं. हे त्यांनी पत्रातून दिल्लीला हाय कमांडकडे कळवलं. काँग्रेसमध्ये दोन गटच नाही तर गटागटात विभागली गेली आहे, असं मी म्हणेन, असंही आशिष देशमुख म्हणाले.

…तर राजीनामा सत्र सुरू होणार

प्रदेशाध्यक्षांच्या नेतृत्वात काम करणे कठीण झालं आहे. विदर्भाच्या 11 जिल्ह्यांतून मला अनेकांचे फोन येत आहेत. त्यांनी नाराजी व्यक्त करत राजीनामाचा सत्र सुरू होणार आहे. या सगळ्या बाबी संदर्भात दहा तारखेला काँग्रेस भवनमध्ये मीटिंग होणार आहे. त्यात नक्कीच नवीन रणनीती ठरणार आहे.

कार्यकारिणी बोलावली आहे. मोठ्या नेत्यांनी जेव्हा नाराजी व्यक्त केली आहे. स्वाभाविकच या ठिकाणी नाना पटोले यांच्या विरोधात वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे दहा तारखेला हाच एकमेव विषय चर्चेला यावा अशी माझी मागणी असल्याचं आशिष देशमुख यांनी म्हंटलं.

१० तारखेची मिटिंग महत्त्वाची

दहा तारखेची मीटिंग ही हाय व्होल्टेज मीटिंग होईल. 440 व्होल्टेजची मिटिंग असेल. प्रदेशाध्यक्ष बदलावा ही मागणी सर्वांचीच आहे. ज्याप्रमाणे काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष निवडणुकीने निवडला त्याप्रमाणे प्रदेशाध्यक्ष सुद्धा निवडणुकीच्या माध्यमातून निवडावा, अशी मागणी आहे. तो अध्यक्ष सगळ्यांना न्याय देणारा असावा, असं मत काँग्रेसचे नेते आशिष देशमुख यांनी व्यक्त केलं आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.