AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मध्यरात्री चंदन घराबाहेर पडला, सकाळी त्याचा मृतदेहच सापडला, नेमकं काय घडलं?

चंदन बेशुद्ध अवस्थेत एका पडक्या घरात सापडला. याची माहिती त्याच्या वडिलांना देण्यात आली. वडिलांनी त्याला घरी आणले. पण, चंदनच्या गळ्यात दोर टांगलेला होता.

मध्यरात्री चंदन घराबाहेर पडला, सकाळी त्याचा मृतदेहच सापडला, नेमकं काय घडलं?
| Edited By: | Updated on: Apr 03, 2023 | 7:49 AM
Share

नागपूर : गुलमोहरनगराली चंदन लहरे हा टाईल्स फिटिंगचे काम करत होता. चंदनचे वडीलही खासगी काम करतात. चंदनला लहान भाऊ आहे. शनिवारी मध्यरात्री चंदन अचानक बाहेर निघून गेला. घरी त्याने कुणालाही काही सांगितले नव्हते. रविवारी सकाळी अघटित घटना समोर आली. चंदन बेशुद्ध अवस्थेत एका पडक्या घरात सापडला. याची माहिती त्याच्या वडिलांना देण्यात आली. वडिलांनी त्याला घरी आणले. पण, चंदनच्या गळ्यात दोर टांगलेला होता. यावरून त्यांना चंदनचा खून करण्यात आला असावा, अशी शंका निर्माण झाली. त्यामुळे त्यांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी मेडिकल रुग्णालयात पाठवला.

चंदनची हत्या केल्याचा संशय

कळमन्यातील १७ वर्षीय मुलाचा मृतदेह सापडला. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पण, मुलाच्या गळ्याभोवती फास आढळा. त्यामुळे त्यांची गळा आवळून हत्या करण्यात आल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. शवविच्छेदन अहवालानंतर नेमकं या मुलाच्या बाबतीत काय घडलं हे समोर येईल.

शवविच्छेदन अहवालानंतर होणार स्पष्ट

कळमना पोलीस हद्दीत १७ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. चंदन कन्हय्या लहरे असे या मृतक मुलाचे नाव आहे. २ एप्रिल रोजी गुलमोहरनगर येथे राहणारा चंदन लहरे हा कळमना येथे बेशुद्ध अवस्थेत सापडला. पोलिसांनी त्याला उपचारासाठी मेडिकल रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी कन्हय्या लहरे यांनी दिलेल्या सूचनेवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.

मृत्यूबाबत संशय कायम

कळमनाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद पाटील पोलिसांच्या ताफ्यासह घटनास्थळी पोहचले. मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला. चंदनचा खून झाला की त्यानं स्वतःला संपवले हे शवविच्छेदन अहवालानंतर समोर येईल. सध्या पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

चंदनला त्याच्या आईवडिलांनी लहानाचे मोठे केले. नुकताच तो कामधंद्याला लागला होता. कमाई करणे सुरू केले होते. आता आपल्याला आधार होईल, असं वडिलांना वाटत होते. पण, चंदनच्या अकाली निधनाने त्याचे वडील खचून गेलेत.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.