AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NEET चा गोंधळ संपता संपेना! नागपूरच्या विद्यार्थ्याला परीक्षेसाठी थेट अबुधाबीतील केंद्र… NTA च्या कारभारावर प्रश्नचिन्ह

NEET Nagpur Students assigned Abu Dhabi Exam Center: नीट परीक्षेतील गोंधळ अजूनही संपलेला नाही. नागपूरमधील एक विद्यार्थ्याच्या प्रवेश पत्रावर अबुधाबी हे परीक्षा केंद्र देण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि त्याच्या पालकांची भांबेरी उडाली. उद्या परीक्षा असताना आणि पासपोर्ट नसताना अबुधाबीला परीक्षा कशी द्यायची असा प्रश्न त्यांना पडला आहे.

NEET चा गोंधळ संपता संपेना! नागपूरच्या विद्यार्थ्याला परीक्षेसाठी थेट अबुधाबीतील केंद्र... NTA च्या कारभारावर प्रश्नचिन्ह
नीट परीक्षा केंद्र, एनटीएचा गोंधळ कायम
| Edited By: | Updated on: Jun 20, 2026 | 11:06 AM
Share

NEET Nagpur Students assigned Abu Dhabi Exam Center: प्रश्नपत्रिका फुटीनंतरही नॅशनल टेस्टिंग एजन्सीचा (NTA) कारभार सुधारला नसल्याचे समोर येत आहे. नीट पेपर लीकवरून वातावरण तापले. पालक, विद्यार्थ्यांनी परीक्षा एजन्सीविरोधात संताप व्यक्त केला. त्यानंतर 21 जून रोजी आता री-नीट परीक्षा होत आहे. पण गोंधल थांबलेला नाही. एजन्सीने नागपूरमधील अब्दुल्लाह नावाच्या एका विद्यार्थ्याला 21 जून रोजी होणाऱ्या NEET पुनर्परिक्षेसाठी थेट संयुक्त अरब अमिरात या देशातील अबुधाबी येथील परीक्षा केंद्र दिले आहे. NTA परदेशातील विद्यार्थ्यांसाठी परदेशी केंद्र देते. पण देशातील विद्यार्थ्याला थेट परदेशातील परीक्षा केंद्र दिल्याने पालक आणि विद्यार्थ्याची भांबेरी उडाली आहे.

22 लाख विद्यार्थी नीट देणार

देशभरात उद्या, रविवारी 22 लाख विद्यार्थी नीटची फेर परीक्षा देणार आहे. यापूर्वी पेपरफुटीमुळे त्यावेळी घेतलेली परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तर नगापूरमधील अब्दुल्ला मोहम्मद या विद्यार्थ्याला जे परीक्षा प्रवेश पत्र देण्यात आले. त्यात संयुक्त अरब अमिरातमधील अबुधाबी हे परीक्षा केंद्र देण्यात आले. त्यामुळे राष्ट्रीय परीक्षा एजन्सीच्या निष्काळजीपणावर संताप व्यक्त केल्या जात आहे. आता उद्या परीक्षा असताना आणि पासपोर्ट नसताना अबुधाबीच्या परीक्षा केंद्रावर कसं जाणार असा प्रश्न पालक आणि विद्यार्थ्याला पडला आहे.

विद्यार्थी-पालकांची NTA कडे तक्रार

अब्दुल्ला मोहम्मद याने नागपूर, वर्धा आणि भंडारा असे परीक्षा केंद्र म्हणून पर्याय दिला होता. पण एनटीएने त्याला थेट युएईतील अबुधाबी हे परीक्षा केंद्र दिले होते. या गोंधळानंतर विद्यार्थ्याने एनटीएच्या हेल्पलाईनवर तक्रार केली. परीक्षा केंद्र बदलून देण्याची मागणी केली. एनटीएच्या अधिकाराने या तक्रारीची दखल घेतली आहे. त्यांनी चूक मान्य केली आहे. तर या विद्यार्थ्याला आता नागपूरमधील परीक्षा केंद्र मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण ऐन परीक्षा तोंडावर अशी चूक केल्याने एनटीएवर संताप व्यक्त करण्यात येत आहे. जर आता लवकर परीक्षा केंद्राबाबत बदल झाला नाहीतर या विद्यार्थ्याला परीक्षेपासून वंचित राहावे लागू शकते. तर परीक्षा तोंडावर असताना परीक्षा केंद्रावरून गोंधळ घालून या विद्यार्थ्यांला एनटीएने नाहक मनस्ताप दिल्याचे समोर येत आहे.

नीटसाठी 2 लाख कर्मचारी तैनात

उद्या होणाऱ्या नीटच्या पुनर्परीक्षेसाठी अभूतपूर्व तयारी करण्यात आली आहे. आज देशभरात सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत मॉक ड्रिल होणार आहे. या परीक्षेसाठी देशभरात 22.79 लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. तर त्यासाठी 2 लाख कर्मचारी तैनात असतील. साडे 5 हजाराहून अधिक केंद्रांवर नीटची पुनर्परीक्षा होणार आहे.

अमरावतीत 4 हजार 648 विद्यार्थी देणार नीटची परीक्षा

अमरावती जिल्ह्यात जवळपास 4 हजार 648 विद्यार्थी देणार नीटची  परीक्षा देतील. उद्या रविवारी 21 जून रोजी होणाऱ्या नीट (यूजी) पुनर्परीक्षेसाठी अमरावती जिल्हा प्रशासन पूर्णपणे तयार आहेत. सकाळी 11 वाजता अमरावती शहरातील भारतीय स्टेट बँक कॅम्प शाखा येथून मॉक ड्रिलची सुरुवात होणार आहे गोपनीय परीक्षा साहित्याच्या सुरक्षित वाहतुकीची जबाबदारी जिल्हा प्रशासन, पोलीस दल आणि एस्कॉर्ट टीम्सवर सोपवण्यात आली आहे.

ही पुनर्परीक्षा दुपारी 2 ते सायंकाळी 5.15 या वेळेत लेखी स्वरूपात घेतली जाईल. देशभरातील 551 शहरांमध्ये आणि परदेशातील 14 शहरांमध्ये 22 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. शहर पातळीवरील व्यवस्थेवर देखरेख ठेवण्यासाठी 674 शहर समन्वयकांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर परीक्षा केंद्रांवर स्वतंत्र देखरेखीसाठी 6 हजार 669 पर्यवेक्षक तैनात करण्यात आले आहेत..फेरपरीक्षा सुरळीत आणि निष्पक्षपणे पार पडावी यासाठी पोलीस आणि जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसह दोन लाखांहून अधिक कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी