आंदोलनातून भाजपचा खरा चेहरा उघड करणार, इंधन दरवाढीवरून Nana Patole यांची केंद्रावर टीका

इंधन दरवाढीवरून नाना पटोले यांनी केंद्रावर टीका केली आहे. आता भाजपचा खरा चेहरा समोर आला आहे. या दरवाढीविरोधात आंदोलन करून भाजपचा खरा चेहरा लोकांना दाखविणार आहोत, असं पटोले म्हणाले. तर, दुसरीकडं घोटाळे बाहेर येण्याची पटोलेंना भीती वाटत असल्याचं आमदार परिणय फुके म्हणाले.

आंदोलनातून भाजपचा खरा चेहरा उघड करणार, इंधन दरवाढीवरून Nana Patole यांची केंद्रावर टीका
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले.Image Credit source: facebook
Follow us
| Updated on: Mar 29, 2022 | 3:24 PM

नागपूर : भाजपच्या केंद्रातील सरकारने या देशातील गरीब आणि सामान्य माणसाचा जगणं मुश्किल करण्याचे ठरवले आहे. अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress state president Nana Patole) यांनी केली आहे. निवडणुकीच्या काळात इंधनाच्या किमती वाढल्या नाही. भाजपवाल्यांनी खोटं किती बोलायचं याच्या सीमा गाठल्या आहेत, असाही खरपूस समाचार पटोले यांनी घेतला. पटोले म्हणाले, काँग्रेसमुळे पेट्रोलचे दर वाढले ( petrol prices increased) असं काँग्रेसची सत्ता असताना भाजपवाले म्हणायचे. खोटं बोलायला यांची जीप कशी धास्तावते, हा मोठा प्रश्न आहे. यांना केंद्रामध्ये सत्ता चालवायची नसेल आणि महागाईमुळे जनतेला संपवायचं असेल तर त्यांनी सांगावं. सत्ता काँग्रेस चांगली चालवू शकतं. आता जनतेची मानसिकता झाली की, काँग्रेसच चांगली होती. तातडीने केंद्रातल्या भाजप सरकारने (BJP government) हा महागाईचा भस्मासुर आता संपवावा, अशी मागणी आम्ही करत आहोत.

31 तारखेपासून आम्ही सप्ताह करणार

नाना पटोले म्हणाले, 31 तारखेपासून आम्ही सप्ताह साजरा करणार आहोत. राज्यभर आणि देशभर या आंदोलनाची सुरुवात करतो आहोत. देशभरातील जनतेसमोर भाजपचा खोटा चेहरा आणणार आहोत. महागाई वाढतच राहील. देश विकणार या पद्धतीचा भाजपनं सांगावं. आदरनीय प्रधानमंत्री जे करत आहेत, ते महागाई वाढवून लोकांना त्रास देणार आहे. लोकांचा रोजगार हिसकावून घेणे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव न देणे असे त्यांच्या खासदारांनी देशांमध्ये जाऊन सांगावं, अशीही टीका त्यांनी केली.

पटोलेंना भीती घोटाळे बाहेर येण्याची

नाना पटोले यांचे घोटाळे बाहेर येणार ही भीती वाटत आहे. त्यामुळं नाना पटोले वारंवार असे बोलत असतात. असा टोला आमदार परिणय फुके यांनी पटोले यांचे नाव न घेता लगावला. भाजपची काळी जादू चालणार नाही. या नाना पटोले यांच्या वक्तव्यावर ते बोलत होते. आम्ही सत्तेत येणार आम्ही कधीच बोललो नाही असे ते म्हणत होते. या तिन्ही पक्षात आपसात भांडण सुरू आहे. तिन्ही पक्षांचे घोटाळे बाहेर येणार आहेत. म्हणून त्यांना भीती वाटत आहे. ते स्वत:ला डिफेंड करत असल्यामुळे असे वक्तव्य सतत करत असल्याचे परखड मत फुके यांनी व्यक्त केले.

भीम जयंतीनिमित्त मिरवणुका काढण्याची परवानगी द्या! Jaideep Kawade यांची मुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी

Bhandara Accident | कारधा पुलावर ट्रेलरची दुचाकीला धडक; काकू-पुतण्या ठार, सून जखमी

Nagpur Crime | प्रेमीयुगुल घरून पळाले, नातेवाईक शोधायला गेले, दोघांनीही विहिरीत उडी मारून संपविले

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.