इंस्टाग्राम चॅटिंगवरून वाद झाला, त्यानंतर जे घडलं ते भयानक

आता अल्पवयीन मुलं हेसुद्धा सोशल मीडियाचा वापर करतात. त्यातून निर्माण होणाऱ्या वादातून टोकाची भूमिका घेतात. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर सांभाळून करणे गरजेचे झाले आहे.

इंस्टाग्राम चॅटिंगवरून वाद झाला, त्यानंतर जे घडलं ते भयानक
Follow us
| Updated on: Jul 01, 2023 | 7:55 PM

नागपूर : सोशल मीडियाचा वापर वाढला. फेसबूक, युट्यूब, इंस्टाचा वापर जास्त केला जातो. व्हॉट्सअप गृपवरून वाद सुरू असतात. असाचं इंस्टावरून वाद निर्माण झाला. या वादातून थेट खून झाल्याचं प्रकरण घडलं. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली. त्यात दोन अल्पवयीन असल्याचं समोर आलं. याचा अर्थ आता अल्पवयीन व्यक्ती हेसुद्धा सोशल मीडियाचा वापर करतात. त्यातून निर्माण होणाऱ्या वादातून टोकाची भूमिका घेतात. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर सांभाळून करणे गरजेचे झाले आहे.

आरोपीत दोन अल्पवयीन मुलांचा सहभाग

इंस्टाग्राम चँटिंगवरून जरीपटका पोलीस स्टेशन हद्दीत काल खून झाला होता. त्या खुनाचा पर्दाफाश करण्यात जरीपटका पोलिसांना यश आलं. या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली. यात दोन अल्पवयीन मुलांचा सुद्धा सहभाग असल्याचं पुढे आलं. एक आरोपी अजूनही फरार आहे.

खून करून आरोपी झाले होते फरार

जरीपटका पोलिस स्टेशन हद्दीमध्ये काल दुपारी एका युवकाचा खून करून आरोपी फरार झाले होते. त्या फरार आरोपींना शोधण्यात जरीपटका पोलिसांना यश आलं. खुनाचा उलगडासुद्धा झाला. इंस्टाग्रामवरून झालेल्या वादातून श्रेयस पाटील नावाच्या युवकाचा खून झाला होता. आरोपी फरार झाले होते.

तीन आरोपींना अटक

मात्र हे आरोपी पोलिसांपासून जास्त वेळ दूर राहू शकले नाही. पोलिसांनी तपास करत तीन आरोपींना अटक केली. त्यातील दोन हे अल्पवयीन असल्याचं पुढे आलं. एक आरोपी अजूनही फरार आहे. त्याचाही शोध पोलीस घेत आहे. अशी माहिती जरीपटका ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोरख कुंभार यांनी दिली.

शुल्लक कारणावरून झालेल्या या हत्येचा छडा पोलिसांनी लावला. मात्र नागपुरात एवढ्या शुल्लक कारणावरून हत्या होत असल्याने अनेक प्रश्न उपस्थित होताना दिसत आहेत.

Non Stop LIVE Update
48 तासात उत्तर द्या, अन्यथा... निवडणूक अधिकाऱ्याकडून पुन्हा नोटीस
48 तासात उत्तर द्या, अन्यथा... निवडणूक अधिकाऱ्याकडून पुन्हा नोटीस.
भांडूपमध्ये मध्यरात्री कोट्यवधींची रोकड सापडली, भरारी पथकाची कारवाई
भांडूपमध्ये मध्यरात्री कोट्यवधींची रोकड सापडली, भरारी पथकाची कारवाई.
मला शरम वाटली असती, असे म्हणत अजितदादांकडून सुप्रिया सुळेंची मिमिक्री
मला शरम वाटली असती, असे म्हणत अजितदादांकडून सुप्रिया सुळेंची मिमिक्री.
उत्तर मध्य मुंबईत भाजपनं उमेदवार बदलला, पूनम महाजनांचा पत्ता कट
उत्तर मध्य मुंबईत भाजपनं उमेदवार बदलला, पूनम महाजनांचा पत्ता कट.
गडी आपल्यात आला पाहिजे, नाहीतर घाबरून...,सदाभाऊंचं ईडीसंदर्भातील विधान
गडी आपल्यात आला पाहिजे, नाहीतर घाबरून...,सदाभाऊंचं ईडीसंदर्भातील विधान.
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.