VIDEO | 15-20 सांबरांच्या कळपावर वाघिणीचा हल्ला, शिकारीचे अनेक प्रयत्न, पण…

पेंच व्याघ्र प्रकल्पात एक वाघिण सांबराची शिकार करण्यासाठी झेप घेतानाचा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

VIDEO | 15-20 सांबरांच्या कळपावर वाघिणीचा हल्ला, शिकारीचे अनेक प्रयत्न, पण...
Tigress
Follow us
| Updated on: Jun 29, 2021 | 6:07 PM

नागपूर : पेंच व्याघ्र प्रकल्पात एक वाघिण सांबराची शिकार करण्यासाठी झेप घेतानाचा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मध्य प्रदेशातल्या पेंच व्याघ्र प्रकल्पातील लंगडी नावाच्या वाघिणीचा हा व्हीडिओ आहे. (tigress attack on 15 to 20 Sambar deer, several attempts for hunting, but failed everytime, Video viral)

लंगडी वाघिणीने सांबराच्या एका कळपावर झेप घेतली. शिकार करण्यासाठी ही वाघिण 15 ते 20 सांबराच्या कळपावर धावून गेली. मात्र 15 ते 20 सांबरांपैकी एकही शिकार तिच्या हाती लागली नाही. लंगडी वाघिणीचा सांबराची शिकार करण्याचा प्रयत्न करत असतानाचा 22 सेकंदाचा व्हिडिओ पुण्यातील वन्यजीवप्रेमी आणि पर्यटक रोहित दामले यांनी सफारीदरम्यान चित्रीत केला आहे.

व्हिडीओ पाहा

मांस फस्त करण्यासाठी वाघांची धडपड, हवेत झेप घेताच थेट पाण्यात पडले

सोशल मीडियावर रोजच हजारो व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओ हे प्राणी तर काही व्हिडीओ पक्ष्यांचे असतात. प्राणी आणि पक्ष्यांचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पाहिले जात असल्यामुळे ते चर्चेचाही विषय ठरतात. सध्या वाघांचा एक जबरदस्त व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मांसाच्या हव्यासापोटी वाघांची चांगलीच फजिती झाल्याचे दिसते आहे.

व्हिडीओमध्ये काय आहे?

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ काही वाघ दिसत आहेत. हे वाघ जिथे उभे आहेत त्या परिसरात पाणी दिसते आहे. तसेच सर्व वाघांच्या समोर हवेत मांसाचा एक तुकडासुद्धा लटकतो आहे. समोर लुसलुशीत मांस दिसत असल्यामुळे सर्व वाघांची भूक चाळवली गेली आहे. हे सर्व वाघ लटकलेले मास फस्त करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी ते थेट हवेत झेप घेताना दिसतायत.

मांस फस्त करण्यासाठी वाघांची हवेत उडी

व्हिडीओमध्ये चार वाघांनी एकापाठोपाठ एक मांसाच्या तुकड्यावर झेप घेतली आहे. मात्र, झेप घेताच लटकलेला मांसाचा तुकडा वर जाताना दिसतोय. तसेच हवेत उडी घेतल्यानंतर ते लगेच पाण्यात पडत आहेत. नंतर पुन्हा हे वाघ पाण्याच्या वर येऊन पुन्हा लटकलेल्या मांसाला पकडण्यासाठी हवेत झेप घेत आहेत. मात्र वाघांचे एवढे सारे प्रयत्न फोल ठऱत आहेत. तसेच मोठी झेप घेऊनसुद्धा या वाघांना मांस खायला मिळत नाही.

पाहा व्हिडीओ

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

दरम्यान, हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबत नेमकी माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, त्याला आयपीएस ऑफिसर रुपीन शर्मा यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहे. लोक हा व्हिडीओ पाहून खूश झाले असून मजेदार कमेंट्स करत आहेत.

इतर बातम्या :

Video | रस्ता ओलांडण्यासाठी मुलांची धडपड, मध्येच ट्रक आला अन् घोळ झाला, पाहा नेमकं काय घडलं ?

Video : पावसात भरधाव ऑडीची रिक्षाला जबरदस्त धडक, काळजाचा ठोका चुकवणारा अपघात कॅमेरात कैद

Video | मालकीन डान्स करताना कुत्राही थिरकला, मजेदार व्हिडीओ एकदा पाहाच

(tigress attack on 15 to 20 Sambar deer, several attempts for hunting, but failed everytime, Video viral)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.