पोहरादेवीची शपथ घेऊन सांगतो… अमित शाह यांनी… उद्धव ठाकरे यांचा पुन्हा हल्लाबोल

काही झालं तरी आम्ही आमचा मित्र पक्ष शिवसेनेला सोडणार नाही. त्यांना आमच्यासोबतच ठेवू, असं भाजपने शरद पवार यांना सांगितलं होतं. तशी कबुलीच अजित पवार यांनी दिली आहे.

पोहरादेवीची शपथ घेऊन सांगतो... अमित शाह यांनी... उद्धव ठाकरे यांचा पुन्हा हल्लाबोल
uddhav thackerayImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 09, 2023 | 1:41 PM

यवतमाळ : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या गटाची बांधणी करण्यास सुरुवात केली आहे. उद्धव ठाकरे आजपासून दोन दिवसाच्या विदर्भ दौऱ्यावर आले आहेत. आज ते यवतमाळमध्ये आले आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना भाजपवर जोरदार हल्ला चढवला. तसेच भाजपला जुन्या वायद्यांची आठवणही करून दिली. इतकेच नव्हे तर मी युतीतून बाहेर पडलो नाही तर मला भाजपने युतीतून बाहेर ढकललं, असा गंभीर आरोपही उद्धव ठाकरे यांनी केला.

माझ्या आईवडिलांची शपथ घेऊन मी जाहीरपणे आधीच सांगितलं आहे. अमित शाह आणि माझ्यात बंददाराआड काय घडलं ते सांगितलं आहे. आज मी पोहरादेवीला आलोय. इथेही मी पोहरादेवीची शपथ घेऊन सांगतो आमच्यात अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद वाटून घेण्याचं ठरलं होतं. ते वचन शाह यांनी पाळलं असतं तर आज कदाचित भाजप किंवा शिवसेनाच मुख्यमंत्री होऊन गेला असता. आज भाजपला इतर पक्षातून आलेल्यांच्या सतरंज्या उचलाव्या लागल्या नसत्या. तसेच भाजपच्या जुन्या, निष्ठावंत आणि मेहनती कार्यकर्त्याांना बाहेरून आलेल्यांची सरबराई करावी लागली नसती, अशी खोचक टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

हे सुद्धा वाचा

ते मैत्रीचं लक्षण आहे का?

काही झालं तरी आम्ही आमचा मित्र पक्ष शिवसेनेला सोडणार नाही. त्यांना आमच्यासोबतच ठेवू, असं भाजपने शरद पवार यांना सांगितलं होतं. तशी कबुलीच अजित पवार यांनी दिली आहे. त्यामुळे मित्र ओळखण्यात तुमची चूक झालीय असं वाटतं का? असा सवाल उद्धव ठाकरे यांना करण्यात आला. त्यावर त्यांनी थेट उत्तर दिलं. मी चूक केली म्हणत नाही. मैत्री केलीच होती. पण युतीत जे ठरलं ते नाकारलं आणि मला युतीच्या बाहेर ढकललं. आता जी शिवसेना फोडली ते मैत्रीचं लक्षण असू शकतं का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

पक्ष पळवला जातोय

शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्यात आला आहे. त्याकडे तुम्ही कसं बघता? असा सवाल उद्धव ठाकरे यांना करण्यात आला. जसं दिसतं तसं बघतो. आणखी वेगळं कसं बघायचं? शिवसेना फोडण्यात आली. पूर्वी एक होतं, राजकारणात फोडाफोडी होत होती. आता पक्ष पळवला जात आहे. पक्ष पळवूनही जनतेच्या मनात प्रतिसाद आहे. त्याचं प्रत्यंतर सभेतपाहायला मिळालं. लोकं भेटत आहेत. जे घडलं ते चुकीचं आहे असं सांगत आहेत. आम्हाला पाठबळ देत आहे. आशीर्वाद देत आहेत, असं त्यांनी सांगितलं.

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.