Video | लक्षवेधी लागत नसल्याने Vikas Thakre संतप्त, आम्ही मुख्यमंत्र्यांविरोधात पत्रकार परिषद घ्यायची काय?

नागपूर मनपातील स्टेशन घोटाळ्याची लक्षवेधी लागली नाही. पंधरा दिवस पाठपुरावा करून लक्षवेधी लागत नाही. आम्ही फक्त सही करायला सभागृहात येतो का, असंही आमदार विकास ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्षांना विचारलंय. नागपूर मनपातील स्टेशनरी घोटाळ्यात (Nagpur Municipal Station Scam) अनेक बडे मासे अडकण्याची शक्यता आहे.

Video | लक्षवेधी लागत नसल्याने Vikas Thakre संतप्त, आम्ही मुख्यमंत्र्यांविरोधात पत्रकार परिषद घ्यायची काय?
नागपूरचे काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे विधानसभेत बोलताना.
Image Credit source: facebook
| Edited By: | Updated on: Mar 26, 2022 | 11:46 AM

नागपूर : अधिवेशनात प्रश्न मार्गी न लागल्याने महाविकास आघाडीतील आमदारांमध्ये नाराजी आहे. विधानसभेत लक्षवेधी न लागल्याने काँग्रेस आ. विकास ठाकरे (Congress Vikas Thackeray) संतप्त झालेत. तर मुख्यमंत्र्यांच्या विरोधात पत्रकार परिषद घ्यायची का, असा सवाल काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्षांना ( Assembly Speaker) विचारला. मुख्यमंत्र्यांकडे असलेल्या विभागातील घोटाळा आणि नागपूर मनपातील स्टेशन घोटाळ्याची लक्षवेधी लागली नाही. पंधरा दिवस पाठपुरावा करून लक्षवेधी लागत नाही. आम्ही फक्त सही करायला सभागृहात येतो का, असंही आमदार विकास ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्षांना विचारलंय. नागपूर मनपातील स्टेशनरी घोटाळ्यात (Nagpur Municipal Station Scam) अनेक बडे मासे अडकण्याची शक्यता आहे.

काय म्हणाले विकास ठाकरे

स्टेशनरी घोटाळ्यानंतर अजय आंबेकर नावाचा व्यक्ती व्हालंटरी रिटायरमेंट घेऊन फरार झाला आहे. सभापती महोदय तुमच्याकडे मागील पंधरा दिवसांपासून लक्षवेधी लावण्यासाठी येत आहे. कालसुद्धा मी येऊन भेटलो. परंतु, या अत्यंत महत्त्वाच्या मुद्याकडं लक्ष दिलं जात नाही. या घोटाळ्यात शासनाचे पैसे गेले. शासनाचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं आहे. अनेक अधिकारी या घोटाळ्यात लिप्त आहेत. याची लक्षवेधी आपण लावत नाहीत. इथं चाललंय काय, असा सवाल विकास ठाकरे यांनी विचारला.

ट्वीट पाहा


नाशिकच्या आमदारांच्या लक्षवेधी कशा लागतात

आमदार विकास ठाकरे म्हणाले, इथं लक्षवेधी नाशिक जिल्ह्यातील आमदारांच्या किती लक्षवेधी लागल्या. घोटाळ्यात शासनाचं नुकसान झालं आहे. हे महत्त्वाचे मुद्दे आहेत. याकडं लक्ष दिलं जात नाही. अशा लक्षवेधीकडं आपण लक्ष द्यावं. यासंदर्भात आपण आपल्या कक्षात बैठक घ्यावी. संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी विकास ठाकरे यांनी सभागृहात मांडली. यावर या विषयावर बैठक घेतो, असं आश्वासन विधानसभा अध्यक्षांनी दिले.

पाहा व्हिडीओ

Video Nagpur | विदर्भातून शिवसेनेला मंत्रीमंडळात प्रतिनिधीत्त्व मिळणार? शिवसंपर्क अभियानानंतर मुंबईत हालचाली वाढल्या

Nandurbar Accident | कंटेनर-आर्टिका गाडीचा भीषण अपघात, तीन जण ठार, रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानाचा मृत्यू

Nagpur Railways | रेल्वेत आधी मैत्री करून drinks ऑफर करायचा, नंतर गुंगीचे औषध देऊन चोरी करायचा, पोलिसांनी ठोकल्या बेड्या