Nagpur Agrovision | मध्य भारतातील सर्वात मोठं कृषी प्रदर्शन बघायचंय, चला तर मग जाणून घ्या?

याशिवाय अॅग्रीकल्चर ड्रोनही या कृषी प्रदर्शनाचे आकर्षण ठरणार असल्याचं अॅग्रोव्हिजनचे मुख्य प्रवर्तक व केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं.

Nagpur Agrovision | मध्य भारतातील सर्वात मोठं कृषी प्रदर्शन बघायचंय, चला तर मग जाणून घ्या?
Follow us
| Updated on: Dec 10, 2021 | 2:40 PM

नागपूर : अॅग्रोव्हिजन फाऊंडेशनद्वारे २४ ते २७ डिसेंबरदरम्यान मध्य भारतातील सर्वात मोठ्या कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत आहे. यंदा अॅग्रोव्हिजनची मुख्य संकल्पना समृध्द शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान अशी आहे. याला अनुसरुन अनेक कृषी क्षेत्रातील अनेक नवीन तंत्रज्ञान येथे पहायला मिळणार आहे.

डिझेलच्या वाढत्या किमती व त्यामुळं निर्माण होणारे प्रदूषण हा काळजीचा मुद्दा आहे. हे टाळण्यासाठी बायोसीएनजीवर चालणारा ट्रॅक्टर वरदान ठरणार आहे. याचे प्रात्यक्षिक यंदाच्या अॅग्रोव्हिजनमध्ये पहायला मिळणार आहे. याशिवाय अॅग्रीकल्चर ड्रोनही या कृषी प्रदर्शनाचे आकर्षण ठरणार असल्याचं अॅग्रोव्हिजनचे मुख्य प्रवर्तक व केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं.

बायोसीएनजीवरील ट्रॅक्टर आकर्षण ठरणार

अॅग्रोव्हिजन प्रदर्शनाच्या यानिमित्ताने कृषी क्षेत्रातील निर्माते, डिलर्स, डिस्ट्रीब्यूटर्स गडकरी यांनी मार्गदर्शन केलं. गडकरींनी सांगितले की, गेल्या काही वर्षांपूर्वी इथेनॉलवर चालणारी ग्रीनबस अॅग्रोव्हिजनमध्ये ठेवण्यात आली होती. इंधनाच्या क्षेत्रातील इनोव्हेशनचे फलित असणार्‍या बायोसीएनजीवरील ट्रॅक्टर आता येथील आकर्षण ठरणार आहे. डिझेलपेक्षा बायोसीएनजीची किंमत तर कमी आहेच. शिवाय यातून धूर निघत नसल्याने प्रदूषण मोठ्या प्रमाणावर टाळता येणार आहे.

नवीन कल्पना सूचवा

कीटकनाशकांची फवारणी करणे हे जोखमीचे काम आहे. ती कमी करण्यासाठी ड्रोनचा वापर फायदेशीर ठरणार आहे. यामुळे कमी द्रावणात मोठ्या भागावर सुरक्षित फवारणी करणे शक्य होणार आहे. याचे प्रात्यक्षिकही अॅग्रोव्हिजनमध्ये पहायला मिळणार आहे. पिकांना पाणी देण्यासाठी सेंसर टेक्नॉलॉजी विकसित करण्यात आली आहे. त्याचेही प्रात्यक्षिक येथे बघायला मिळणार आहे. कृषी क्षेत्रातील निर्माते, डिलर्स, डिस्ट्रीब्यूटर्स, उद्योजक आणि शेतकरी यांनी अशाप्रकारे कोणतीही नवकल्पना त्यांच्याकडे असल्यास ती अॅग्रोव्हिजनच्या बॅंक ऑफ आयडियाज अॅण्ड इनोव्हेशनकडे पाठवावी, अशी सूचनाही गडकरींनी केली आहे.

गोड्या पाण्यातील मत्स्यशेती

आयटी क्षेत्रात कृषीसाठी अनेक इनोव्हेशन्स होत आहेत. येथे स्टार्टअपसची संख्या मोठी आहे. या अॅग्रोव्हिजनमध्ये त्यांचाही समावेश राहणार असल्याचे अॅग्रोव्हिजनचे आयोजन सचिव रवी बोरटकर यांनी सांगितलं. अॅग्रोव्हिजनचे सल्लागार समिती अध्यक्ष डॉ. सी. डी. मायी यांनी सांगितले की, यंदा अॅग्रोव्हिजनमध्ये शेतकर्‍यांसाठी उपयुक्त अशा अनेक विषयांवर कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत. यंदा ३ परिषदांचे आयोजन करण्यात आले आहे. विदर्भाच्या डेअरी उद्योगाला चालना देण्यासाठी विदर्भातील दूध व्यवसायाच्या संधी या विषयावर एक दिवसीय परिषद आयोजित करण्यात येणार आहे. याशिवाय विदर्भातील शेतमाल निर्यातीच्या संधी व गोड्यापाण्यातील मत्स्य शेतीच्या संधी या विषयावरही परिषदा आयोजित करण्यात आल्या आहेत.

कृषी क्षेत्रातील नामवंत कंपन्या

यावेळी वेदचे अध्यक्ष शिवकुमार राव, कृषी क्षेत्रातील नामवंत कंपन्यांचे अधिकारी, डिलर्स, डिस्ट्रिब्युटर्स आदी उपस्थित होते. यात प्रामुख्याने अँग्रोव्हिजनचे मुख्य प्रायोजक ए.एस. अँग्री अँण्ड अँक्वा कंपनीचे नवनीत तुली व हिरेन पटेल, रासी सिड्स, आयटीसी, पी.आय. इंडस्ट्रीज, अंकुर सिड्स, महिंद्रा ट्रॅक्टर्स, यावलकर पेस्टीसाइड्स, वेलसी कॅटलफिल्ड येथील प्रतिनिधीही सामिल होते.

Nagpur ZP | सरपंच भवनाजवळील लॉनवर खर्च केले लाखो रुपये; पण गेल्या दोन वर्षांत एकही बुकिंग नाही, कारण काय?

Nagpur accident | बांधकामाच्या ठिकाणी वर्षभराच्या चिमुकलीला ठेवले, सिमेंटच्या ट्रकनं केला तिचा चेंदामेंदा!

Non Stop LIVE Update
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.