रेमडेसिव्हीरसाठी तडफडणाऱ्या महाराष्ट्राला दिलासा देणारी बातमी, वर्धा येथील कंपनी उत्पादन सुरु करणार

वर्धा येथील जेनेटिक लाईफ सायन्सेस कंपनीला रेमडेसिव्हीर निर्मिती करण्याची परवानगी मिळाली आहे. ( Wardha Remdesivir Company)

रेमडेसिव्हीरसाठी तडफडणाऱ्या महाराष्ट्राला दिलासा देणारी बातमी, वर्धा येथील कंपनी उत्पादन सुरु करणार
जेनेटिक लाईफ सायन्स कंपनी रेमडेसिव्हीर बनवणार
Follow us
| Updated on: Apr 18, 2021 | 5:13 PM

वर्धा: महाराष्ट्रात शनिवारी 67 हजार कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. राज्यातील आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणावर ताण आलाय. रेमडेसिव्हीर आणि ऑक्सिजनचा तुटवडा राज्यात जाणवत आहे. राज्यातील परिस्थिती गंभीर असताना महाराष्ट्रासाठी एक दिलासादायक बातमी आहे. वर्धा जिल्ह्यातील जेनेटिक लाईफ सायन्सेस या कंपनीला रेमडेसिव्हीर उत्पादनाची परवानगी मिळाली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत प्रयत्न केले होते. (Wardha based Genetic Life Sciences company got permission for production of Remdesivir)

आता महाराष्ट्रातचं रेमडेसिव्हीर निर्मिती

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या संख्येत दररोज भर पडतं आहे. त्यामुळं रेमडेसिव्हीर इंजेक्शनची मागणीही वाढली आहे. त्याचा सर्वत्र तुटवडा निर्माण झाला आहे. आता वर्ध्यातील औद्योगिक वसाहतीतील जेनेटिक लाइफ सायन्सेस ही कंपनीही रेमडेसिव्हीर इंजेक्शनचे उत्पादन करणार आहे.

रेमडेसिव्हीर बनवणाऱ्या मोजक्याच कंपन्या

देशभरात रेमडेसिविर हे औषध तयार करणाऱ्या मोजक्याच कंपन्या आहेत. यात वर्ध्यातील आणखी एका कंपनीचा समावेश होणार आहेय. जेनेटिक सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून हे उत्पादन करण्यात येणार आहे. कंपनीला उत्पादनासाठी परवानगी मिळणे वर्धा जिल्हावासियंसाठी आनंदाची बाब ठरणार आहे.

नितीन गडकरी यांचा पुढाकार

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यासाठी पुढाकार घेतला. या कंपनीला रेमडेसिव्हीर उत्पादन निर्मितीस परवानगी मिळावी यासाठी गडकरी यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. जेनेटिक लाइफ सायन्सेस प्रा. लि. या कंपनीचे प्रमुख संशोधक आणि वैज्ञानिक डॉ. एम. डी. क्षीरसागर हे आहेत. कंपनीत लाइफ सेव्हिंग ड्रग्ज क्रिटिकल केअर इंजेक्शन्स, अँजिओग्राफीमध्ये वापरली जाणारी उत्पादने, सीटी स्कॅन, एमआरआय आणि आणीबाणीच्या वापरासाठीची उत्पादने बनवली जातात.

या कंपनीत लवकरच रेमडेसिव्हीरचं उत्पादन सुरू होणार आहे. रोज 30 हजार व्हायल तयार करण्याचा दावा केला जात आहे. ही बाब सर्वांनाच दिलासा देणारी ठरणार आहे. संकटाच्या काळात महात्मा गांधी यांच्या विचाराला मानणाऱ्या जिल्ह्यात होणारी औषध निर्मितीसाठी महत्वाची ठरणारी आहे. रेमडीसीवर उत्पादनात देशाला याचा फायदा होणार आहे. यामुळे रुग्णाचे जीव वाचण्यास मदत होणार आहे.

संबंधित बातम्या:

कोरोनाची तिसरी लाट कधीही उसळेल, कायमस्वरुपी नियोजन करा, उद्धव ठाकरेंचं उद्योगांना आवाहन

महाविकासआघाडीच्या नेत्यांनीही रेमडेसिव्हीरचा साठा करुन ठेवलाय; मनसेच्या नेत्याचा आरोप

(Wardha based Genetic Life Sciences company got permission for production of Remdesivir)

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.