नालासोपाऱ्यात महिलेची हत्या, होळीच्या रात्री बॅगेत मृतदेह सापडला

रविवारी रात्री 10.30 वाजताच्या सुमारास महिलेचा मृतदेह नालासोपारा पूर्व भागात आढळला. (Nalasopara Lady Murder bag)

नालासोपाऱ्यात महिलेची हत्या, होळीच्या रात्री बॅगेत मृतदेह सापडला
नालासोपाऱ्यात महिलेचा मृतदेह बॅगेत आढळला

नालासोपारा : नालासोपारा पूर्व भागात महिलेची हत्या करुन तिचा बॅगेत भरुन फेकण्यात आला. ऐन होळीच्या रात्री एका काळ्या बॅगेत महिलेचा मृतदेह सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. महिलेची ओळख पटवण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे. तिची हत्या कोणी केली, याचा तपास पोलिस करत आहेत. (Nalasopara Lady Murder Dead body found in bag)

रविवारी रात्री 10.30 वाजताच्या सुमारास महिलेचा मृतदेह नालासोपारा पूर्व भागात आढळला. श्रीरामनगर परिसरात मुख्य रस्त्याजवळ एका काळ्या बॅगेत महिलेचा मृतदेह होता. हत्या केल्यानंतर महिलेचा मृतदेह बॅगेत भरुन फेकल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

तुळींज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. त्यानंतर महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या महिलेची ओळख अजून पटलेली नाही. ही महिला कोण आहे? कुठून आली? तिला ठार कुणी मारलं? याचा शोध आता पोलीस घेत आहेत. मात्र या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

राहत्या घरात पत्नीची हत्या करुन पतीचा पोबारा

नालासोपाऱ्यात पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना मार्च महिन्याच्या सुरुवातीलाही उघडकीस आली होती. पतीने चाकू भोकसून पत्नीची निर्घृण हत्या केली होती. आर्थिक वादातून पत्नीची हत्या झाल्याचा आरोप आहे.

विनिता मोरे असे हत्या झालेल्या पत्नीचे होते. तर रुपेश मोरे असे आरोपी पतीचे नाव आहे. नालासोपारा पूर्व शिर्डी नगर परिसरात ही घटना घडली होती. राहत्या घरात रुपेशने विनिताची हत्या केली होती. त्यानंतर त्याने घटनास्थळावरुन पोबारा केला होता. (Nalasopara Lady Murder Dead body found in bag)

रिक्षा चालकाच्या हत्येने खळबळ

नालासोपाऱ्यात 1 मार्चला दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास किसन सच्छिदानंद शुक्ला (वय 29) नावाच्या रिक्षा चालकाची अज्ञातांकडून हत्या करण्यात आली होती. गौराईपाडा शितला मंदिराजवळ काही अज्ञातांनी धारदार शस्त्रांनी वार करत किसन शुक्ला यांची हत्या केली होती.

संबंधित बातम्या :

वसई-विरार-नालासोपारा, ठाणे, मुंबईतील वाहन चोरणारी टोळी गजाआड, 13 लाखांच्या गाड्या जप्त

आर्थिक वाद टोकाला, नालासोपाऱ्यात चाकू भोसकून पत्नीची हत्या

(Nalasopara Lady Murder Dead body found in bag)