AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nana Patekar passed away : नाना पाटेकर यांचे आयुष्यात फक्त दोनच गुरु होते, कधीच विसरले नाहीत

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन झालं आहे. गोव्यामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नाना पाटेकर यांनी आपल्या आयुष्यात फक्त दोघांनाच आपलं गुरू मानलं होतं. त्यांनी एका कार्यक्रमामध्ये बोलताना त्याबद्दल माहिती दिली होती.

Nana Patekar passed away : नाना पाटेकर यांचे आयुष्यात फक्त दोनच गुरु होते, कधीच विसरले नाहीत
Nana PatekarImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 08, 2026 | 8:55 PM
Share

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं आज निधन झालं आहे. वयाच्या 75 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गोव्यामध्ये नाना पाटेकर यांचं निधन झालं. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण सिनेसृष्टीवर आणि महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. नाना पाटेकर हे केवळ एक कलाकारच नव्हते, तर त्यांनी नाम फांउडेशनच्या माध्यमातून राज्याच्या दुष्काळी भागात अनेक मोठी समाजोपयोगी कामं केली होती. नाना पाटेकर हे एक उत्तम कलाकार होते, त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर अनेक चित्रपट अजरामर केले. नाना पाटेकर एकदा बोलताना म्हणाले होते की, माझे फक्त दोनच गुरू आहेत, एक भूक आणि दुसरा गुरू म्हणजे अपमान.

नाना पाटेकर यांनी ज्या -ज्या चित्रपटांमध्ये गरिबी राग आणि संघर्ष साकारणार्‍या भूमिका केल्या, त्या चित्रपटांमध्ये ते भूमिका साकारण्यासाठी कधीही केवळ अभिनयाच्या तंत्रांवर अवलंबून राहिले नाहीत तर त्या पात्रामध्ये जी अस्वस्थता दिसून आली, ती अस्वस्थता नाना पाटेकर यांच्या वैयक्तिक आयुष्यातून आलेली होती. ज्यामध्ये आपल्याला परिंदा, अंकुश, क्रांतीवीर यासारख्या काही चित्रपटांची उदाहरणं देता येतील.हे सर्व चित्रपट नाना पाटेकर यांच्या अभिनयाने सुपहीट ठरले.

नाना पाटेकर सुरुवातील फक्त नाटकांमध्येच भूमिका करायचे. परंतु अभिनेत्री स्मिता पाटील या नाना पाटेकर यांच्या चांगल्या मैत्रिण होत्या. नाना पाटेकर यांना फक्त नाटकांमध्येच भूमिका करायला आवडायचं, परंतु स्मिता पाटील यांची अशी इच्छा होती की, नाना पाटेकर यांनी चित्रपटांमध्ये देखील काम करावं. एका दैनिकाच्या रिपोर्टनुसार स्मिता पाटील या कायम नाना पाटेकर यांनी चित्रपटात काम करावं यासाठी प्रयत्न करायच्या. चित्रपटाच्या माध्यमातून तुम्ही एकाचवेळी अनेक लोकांपर्यंत पोहचू शकता, असं स्मिता पाटील त्यांना नेहमी सांगायच्या. त्यांनी नाना यांना चित्रपटात काम मिळावं यासाठी प्रयत्न केला, त्यांनी एका भूमिकेसाठी नाना यांचं नाव निर्माते रवी चोपडा यांना सूचवलं होतं. परंतु सुरुवातीला नाना पाटेकर यांना रवी चोपडा यांच्या चित्रपटात भूमिका करण्यास नकार दिला होता.

Follow Us
उद्धव ठाकरे-शिंदे वादावर सुप्रीम कोर्टात मोठी सुनावणी; शिंदे गटाच्या..
Shivsena Supreme Court Hearing : उद्धव ठाकरे-शिंदे वादावर सुप्रीम कोर्टात मोठी सुनावणी; शिंदे गटाच्या वकिलांनी पक्षाच्या घटनेवरच उपस्थित केला सवाल, म्हणाले...
पुणे पदवीधरवरून राष्ट्रवादीत अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर; पक्षांतर्गत...
Pune Vidhan Parishad Election : पुणे पदवीधरवरून राष्ट्रवादीत अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर; पक्षांतर्गत चर्चा व्हायला हवी होती... प्रफुल पटेल यांचा रोख नेमका कोणाकडे?
MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् मोठी घडामोड; पोलिसांचा आंदोलनस्थळ....
MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् मोठी घडामोड; पोलिसांचा आंदोलनस्थळ सोडण्याचा इशारा, नेमकं काय घडलं?
'नटसम्राट' काळाच्या पडद्याआड, नानांच्या निधनाआधी मध्यरात्री काय घडलं?
Nana Patekar Passes Away : 'नटसम्राट' काळाच्या पडद्याआड, नाना पाटेकर यांच्या निधनाआधी मध्यरात्री काय घडलं?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; आरोपी निखिल यादव अन्....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; आरोपी निखिल यादव अन् नितेश पवारांना....
नानांची अखेरची इच्छा पूर्ण होणार; डोंजेतील स्वतःच्या शेतजमिनीवर....
Nana Patekar Funeral : नानांची अखेरची इच्छा पूर्ण होणार; डोंजेतील स्वतःच्या शेतजमिनीवर होणार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
नाना पाटेकर यांचं पार्थिव गोव्यातील घरी अत्यंदर्शनासाठी ठेवलं
Nana Patekar Passes Away : नाना पाटेकर यांचं पार्थिव गोव्यातील घरी अत्यंदर्शनासाठी ठेवलं
दोन दिवस पोलिसांनी रोखलं, तरी इंडिया आघाडी पुन्हा मैदानात; राहुल गांधी
Rahul Gandhi : दोन दिवस पोलिसांनी रोखलं, तरी इंडिया आघाडी पुन्हा मैदानात; राहुल गांधींसह, खरगेंची राजघाटकडे कूच
MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् पोलिसांचा मोठा इशारा; आंदोलनस्थळ रिकामं..
MPSC Protest : MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् पोलिसांचा मोठा इशारा; आंदोलनस्थळ रिकामं करण्याच्या दिल्या सूचना, मात्र रुपाली पाटील म्हणाल्या...
सत्ताधाऱ्यांना सद्बुद्धी मिळावी म्हणून राजघाटावर जाणार; खरगे आक्रमक...
Mallikarjun kharge : सत्ताधाऱ्यांना सद्बुद्धी मिळावी म्हणून राजघाटावर जाणार; खरगे आक्रमक, मत चोरीवरून केंद्र सरकारवर गंभीर आरोप