‘गिरीश महाजन सध्या फार लहान, त्यांच्या वक्तव्यावर बोलण्याची गरज नाही,’ नाना पटोलेंची खोचक टीका

भाजप नेते गिरीश महाजन हे सध्या लहान आहेत. त्यांच्या वक्तव्यावर बोलण्याची गरज नाही," असा खोचक टोला नाना पटोले यांनी लगावला.

'गिरीश महाजन सध्या फार लहान, त्यांच्या वक्तव्यावर बोलण्याची गरज नाही,' नाना पटोलेंची खोचक टीका
नाना पटोले
Follow us
| Updated on: Feb 22, 2021 | 4:17 PM

भंडारा : “भाजप नेते गिरीश महाजन हे सध्या लहान आहेत. त्यांच्या वक्तव्यावर बोलण्याची गरज नाही,” असा खोचक टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना लगावला. (Nana Patole criticizes Girish Mahajan on Amitabh Bachchan and Akshay Kumar shooting issue)

दिग्गज अभिनेते अभिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि अक्षय कुमार (Akshay Kumar) यांच्या चित्रपटांचे चित्रीकरण होऊ देणार नाही, अशी रोखठोक भूमिका नाना पटोले यांनी घेतली होती. त्यांच्या या भूमिकेनंतर गिरीश महाजन यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली होती. या राज्यात मोगलाई चालू आहे का?, असा खोचक सवाल त्यांनी केला होता. त्यानंतर नाना पटोले यांनी वरील प्रतिक्रिया दिली. ते भंडाऱ्यात ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते.

यावेळी बोलताना “भारतमातेच्या नावावर भाजप पक्ष मोठा झाला. त्याच भारतमातेला विकण्याची सुरुवात भाजपने केली आहे. गिरीज महाजन हे सध्या लहान आहेत. त्यांच्या वक्तव्यावर काही बोलण्याची गरज नाही,” असे नाना पटोले म्हणाले.

मी मीझी भूमिका बदलेली नाही

मागील काही दिवसांपासून इंधन दरवाढ, शेकऱ्यांचे प्रश्न यावरुन काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. याच मुद्द्यांना घेऊन “मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या काळात सिने अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार ट्विटरच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बाजूने बोलत होते. मात्र आता त्यांनाही विसर पडल्याने भविष्यात काँग्रेस अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या चित्रपटांचे चित्रिकरण महाराष्ट्रात होऊ देणार नाही तसेच त्यांचे सिनेमे प्रदर्शितही होऊ देणार नाही,” असे वक्तव्य नाना पटोले यांनी  केले होते.

त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यात चांगलीच खळबळ उडाली होती. पटोले यांच्या या भूमिकेचा भाजपणे निषेध केला होता. त्यावर बोलताना मी माझी भूमिका अजूनही बदलली नसल्याचे नाना पटोले यांनी म्हटलंय. “जिथे अमिताभ आणि अक्षय यांचा चित्रपट सुरु असेल, तिथे काँग्रेस काळे झेंडे दाखवेल, असे नाना पटोले म्हणाले.

इतर बातम्या :

…तर अमिताभ बच्चन-अक्षयकुमारच्या सिनेमांचं शूटिंग-प्रदर्शन महाराष्ट्रात होऊ देणार नाही : नाना पटोले

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.