नाणार जमीन व्यवहाराची चौकशी सुरू, जमिनी परत देण्याच्या हालचालीही सुरू

नाणार रिफायनरी प्रकल्प सुरू करण्याची विरोधकांनी मागणी लावून धरलेली असतानाच या प्रकल्पासाठी करण्यात आलेल्या जमिन व्यवहाराची चौकशी सुरू झाली आहे. (Nanar refinery project investigation start)

नाणार जमीन व्यवहाराची चौकशी सुरू, जमिनी परत देण्याच्या हालचालीही सुरू
नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्प
Follow us
| Updated on: Mar 15, 2021 | 10:20 AM

रत्नागिरी: नाणार रिफायनरी प्रकल्प सुरू करण्याची विरोधकांनी मागणी लावून धरलेली असतानाच या प्रकल्पासाठी करण्यात आलेल्या जमिन व्यवहाराची चौकशी सुरू झाली आहे. तसेच रिफायनरीसाठी घेतलेल्या जमिनी परत देण्याच्या हालचालीही सुरू झाल्या आहेत. (Nanar refinery project investigation start)

नाणार रिफायनरी प्रकल्पाची चौकशी करण्यासाठी राजापूर प्रांत कार्यालयासह तलाठी कार्यालयात कक्ष स्थापन करण्यात आले आहे. तारळ, कुळवंडे, नाणार, साखर, सागवे, वाडापाल्ये, उपळे, विल्ये, डोंगर, कात्रादेवी या गावांमध्ये तक्रार स्विकृती कक्ष स्थापन केले जाणार आहे. या कक्षांमध्ये तक्रार स्वीकारली जाणार आहे. 31 मार्चपर्यंत भूमिपुत्रांकडून निवेदन आणि तक्रारी स्वीकारल्या जाणार आहेत. नाणारसह 14 गावांमध्ये जमीन विक्रीचे कोट्यावधींचे व्यवहार झाले होते. यावेळी परप्रांतीयांनी कवडीमोल भावाने जमिनी खरेदी केल्या होत्या. त्यामुळे भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांनी या जमीन खरेदी व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी केली होती. तत्कालीन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनीही काही महिन्यापूर्वी जमीन खरेदी विक्री प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते.

दोन जागांचा पर्याय

एमआयडीसीने या प्रकल्पासाठी रायगड आणि रत्नागिरीत दोन जागांची पाहणी केली असून त्याचा अहवाल लवकरच मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार आहे. रायगड तालुक्यातील तळा आणि रत्नागिरी तालुक्यातील जयगड या त्या दोन जागा आहे. दोन्ही जागा 9 हजार एकर आहेत. त्यामुळे हा रिफायनरी प्रकल्प कोकणातच होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

जमिनी खरेदी-विक्रीचे व्यवहार रद्द होणार

नाणार रिफायनरी प्रकल्पासाठी ज्या जमिनींचे खरेदी व्यवहार झाले होते, ते सर्व व्यवहार रद्द करण्यात येणार असल्याचे यापूर्वी खासदार विनायक राऊत यांनी सांगितले होते. “नाणार प्रकल्पासाठी शेतकऱ्यांनी 7 लाख रुपये एकराने त्यांच्या जमिनी विकल्या. हा प्रकल्प झाला तर त्याचे मूल्य 90 लाख एकरी होणार आहे. दलालांनी जमिनी लाटून शेतकऱ्यांची लुबाडणूक केली आहे. 224 गुजराती आणि मारवाडी लोकांनी या जमिनी विकत घेतल्या आहेत. त्यामुळे हे सर्व व्यवहार रद्द करण्यात येईल,” असं राऊत म्हणाले होते. त्यांच्या या विधानानंतर रिफायनरी प्रकल्प रद्द करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तविली जात होती.

नाणार रिफायनरी प्रकल्प नेमका काय होता?

कोकणातील निसर्गसंपन्न अशा रत्नागिरी-सिंधुदुर्गाच्या सीमेवर नाणार तेलशुद्धीकरण (रिफायनरी) प्रकल्प प्रस्तावित होता. रत्नागिरीतील राजापूर तालुक्यातील 14 गावं आणि सिंधुदुर्गातील देवगड तालुक्यातील 2 गावांमध्ये प्रकल्पाचा विस्तार होणार होता. 13000 एकरावर हा प्रकल्प उभारला जाणार होता. नागरिकांचा विरोध असतानाही, या गावांमधील क्षेत्र 18 मे 2017 रोजी आद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आलं. हिंदुस्थान पेट्रोलियम, इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम या तीन सरकारी कंपन्या नाणार रिफायनरी प्रकल्प उभारत असून, त्यांची संयुक्तपणे रत्नागिरी रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल लिमिटेड म्हणजेच RRPCL कंपनी 22 सप्टेंबर 2017 रोजी स्थापन करण्यात आली.

काही महिन्यांपूर्वीच सौदी अरेबियाच्या अरामको कंपनीशी नाणार रिफायनरीबाबत करार झाला. नाणार रिफायनरीच्या उभारणीला तीन लाख कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. आशियातील सर्वात मोठा रिफायनरी प्रकल्प असल्याचे सांगण्यात येत असून, 2023 पर्यंत हा प्रकल्प कार्यन्वित करण्याचा सरकारचा विचार आहे. आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे, प्रस्तावित नाणार रिफायनरी प्रकल्पापासून अवघ्या 15-16 किलोमीटरच्या अंतरावर जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प आहे. (Nanar refinery project investigation start)

संबंधित बातम्या:

‘त्या’ प्रकल्पाला नाणार म्हणू नका, रिफायनरी म्हणा; नाणार रिफायनरीला उद्धव ठाकरेंचा विरोध कायम

नाणार प्रकल्प अखेर रद्द, मुख्यमंत्र्यांची फाईलवर अखेरची सही   

एकच जिद्द रिफायनरी रद्द, नाणारवासियांचा निर्धार 

(Nanar refinery project investigation start)

Non Stop LIVE Update
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?.
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ.
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात.
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश.
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप.
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.