AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डॉक्टर होणाऱ्या मुलीची हत्या करणाऱ्या बापाला आणले घटनास्थळी, शुभांगीची हाडेही सापडली

पोलीस गावात येऊन अनेकांची चौकशी करत आहे. महिपाल पिंपरी गावात दोन गट आहेत. यामुळे या खून प्रकरणाची माहिती पोलिसांना काही जणांनी दिली होती. पोलिसांनी त्या सर्वांची चौकशी केली.

डॉक्टर होणाऱ्या मुलीची हत्या करणाऱ्या बापाला आणले घटनास्थळी, शुभांगीची हाडेही सापडली
शुभांगी जोगदंडImage Credit source: टीव्ही९ नेटवर्क
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jan 30, 2023 | 9:34 AM
Share

नांदेड : नांदेड जिल्ह्यामध्ये (Nanded News) ऑनर किलिंगचा (owner killing) धक्कादायक प्रकार समोर आला होता. जन्मदात्या बापाने २३ वर्षीय मुलीची २२ जानेवारी रोजी हत्या केली होती. हत्या करुन मुलीचा मृतदेह जाळून टाकला. मृतदेहाची राख ओढ्यात फेकून दिली होती. त्यानंतर आपले दैनंदिन उपक्रम त्यांनी सुरु ठेवले होते. त्यामुळे चार दिवस खुनाचा कोणाला संशय आला नाही. परंतु एका निनावी फोनमुळे हा प्रकार उघड झाला. आता या प्रकरणी तपासाला वेग आला आहे. मुलीची हाडे पोलिसांना सापडली आहे.

शुभांगी जोगदंड ही नांदेडच्या आयुर्वेदीक महाविद्यालयात BHMS च्या तिसऱ्या वर्षात शिकत होती. तिचे गावातील एका तरुणासोबत प्रेम होते. परंतु हे प्रेम कुटुंबीयांनी मान्य नव्हते. त्यामुळे तीन महिन्यांपूर्वी तिची सोयरीक दुसरीकडे करुन दिली होती. मुलीने ही सोयरीकी आठ दिवसांत मोडली. त्यानंतर तिची बाप व भावांनी केली. पोलिसांनी शुभांगीचे वडील जनार्दन लिंबाजी जोगदंड, भाऊ कृष्णा जोगदंड, चुलत भाऊ गिरीधारी जोगदंड, शेषराव जोगदंड, गोविंद जोगदंड व मामा केशव शिवाजी कदम यांना अटक केली आहे.

आरोपींना आणले घटनास्थळी

पोलिसांनी रविवारी आरोपींना घटनास्थळी आणले. यावेळी तळणीजवळ कॅनॉलच्या ठिकाणी आणखी काही हाडे सापडली. यापुर्वी जोगदंड यांच्या शेतातून व हिवरा परिसरातून काही हाडे मिळाली होती. ही सर्व हाडे आता न्यायवैद्यक तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत.

गावात अनेकांची चौकशी

पोलीस गावात येऊन अनेकांची चौकशी करत आहे. महिपाल पिंपरी गावात दोन गट आहेत. यामुळे या खून प्रकरणाची माहिती पोलिसांना काही जणांनी दिली होती. पोलिसांनी त्या सर्वांची चौकशी केली. या घटनेमुळे या घटनेची चर्चा गावात सुरु आहे.

असा रचला कट

आपली गावात बदनामी झाली, या कारणामुळे कुटुंबियांनी २२ जानेवारी रोजी तिची हत्या केली. मुलीची हत्या करताना हात थरथरु नये म्हणून आरोपींनी मद्य प्राशन केले असल्याचे सांगण्यात येत आहे. हत्येनंतर तिचा मृतदेह खताच्या गोण्यात टाकून शेतात  नेला. शेतात ज्वारीच्या पिकांत सरण रचून शुभांगीचा मृतदेह जाळून टाकला. रात्री हा प्रकार केल्यानंतर सकाळी मृतदेहाची राख २२ किलो किलोमीटर असलेल्या गोदावरी नदीत जाऊन विसर्जित केली.

कसे फुटले बिंग

हत्येनंतर आरोपी कोणाला संशय येऊ नये म्हणून नियमित कामे करत होती. आई-वडील दुचाकीवर नियमित शेतात जात होते, तर भाऊ नित्यनियमाने ग्रामदैवताच्या दर्शनाला जात होता. परंतु गावात शुभांगी दिसत नव्हती. म्हणून नांदेड जिल्ह्यातील पिंपरी महीपाल या अडीच हजार लोकवस्तीच्या गावात कुजबूज सुरु झाली. एका ग्रामस्थाने पोलिसांना फोन करुन शुभांगीचा खून झाल्याचा संशय व्यक्त केला.

पोलिसांनी शुभांगीचे वडील जनार्दन लिंबाजी जोगदंड, भाऊ कृष्णा जोगदंड, चुलत भाऊ गिरीधारी जोगदंड, शेषराव जोगदंड, गोविंद जोगदंड व मामा केशव शिवाजी कदम यांची चौकशी केली. त्यांना पोलीस खाक्या दाखवताच खुनाची कबुली त्यांनी दिली. या सर्वांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना ३ फेब्रवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.

Follow Us
राजकारण पुन्हा तापलं! गडकरींनी तात्काळ राजीनामा... पुन्हा नव्या मागणी
राजकारण पुन्हा तापलं! गडकरींनी तात्काळ राजीनामा...  पुन्हा नव्या मागणीने मोठी खळबळ
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांशी संवाद, तब्बल
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांशी संवाद, तब्बल 400...
लाडक्या बहिणींना अखेर ती खुशखबर आलीच, आदिती तटकरेंनी थेट घोषणाच केली;
लाडक्या बहिणींना अखेर ती खुशखबर आलीच, आदिती तटकरेंनी थेट घोषणाच केली; लाखो महिलांन होणार फायदा!
मोदींच्या निवासस्थानाबाहेर... इंदिरा गांधींचा उल्लेख करत एकनाथ शिंदें
मोदींच्या निवासस्थानाबाहेर... इंदिरा गांधींचा उल्लेख करत एकनाथ शिंदेंचा मोठा दावा!
आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेची तब्येत खालावली; रुग्णालयातील फोटोंनी
आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेची तब्येत खालावली; रुग्णालयातील फोटोंनी वाढवलं टेन्शन
आम्ही फेस टु फेस वाले, तुम्ही... भर मंचावरून एकनाथ शिंदे काय म्हणाले?
आम्ही फेस टु फेस वाले, तुम्ही... भर मंचावरून एकनाथ शिंदे असं का म्हणाले?
मोठी बातमी! लालू प्रसाद यादव यांच्या मुलाला थेट अटक, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! लालू प्रसाद यादव यांच्या मुलाला थेट अटक, नेमकं काय घडलं?
ठाकरेंच्या सभेत बोलक्या बाहुल्याचाही सरकावर वर हल्लाबोल; थेट म्हणाला,
ठाकरेंच्या सभेत बोलक्या बाहुल्याचाही सरकावर वर हल्लाबोल; थेट म्हणाला, धुरंधर 3 मध्ये पंतप्रधान...
खड्डामंत्री म्हणत मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, एकाच...
खड्डामंत्री म्हणत मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, एकाच शब्दाने उडवली खळबळ
दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर स्वतः मुख्यमंत्री फडणवसीचं स्पष्टीकरण
दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवसीचं स्पष्टीकरण, म्हणाले...