लोकसभा निवडणूक संपताच भाजपला मोठा धक्का; माजी केंद्रीय मंत्र्याचा भाजपला रामराम
Suryakanta Patil Resignation From BJP : माजी केंद्रीय मंत्र्याने भाजपला रामराम केला आहे. या महिला नेत्याने प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र लिहित आपला राजीनामा सुपूर्द केला आहे. कोण आहेत या महिला नेत्या? त्यांनी राजिनाम्याच्या पत्रात काय म्हटलंय? वाचा सविस्तर...

लोकसभा निवडणुकीआधी भाजपमे 400 पारचा नारा दिला. पण भाजपला स्वबळावर बहुमताचा आकडाही गाठता आला नाही. केंद्रात एनडीए सरकार सत्तेत आलं. आता या सगळ्याचा परिणाम महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत दिसणार आहे. पण लोकसभा निवडणूक संपताच भाजपला मोठा धक्का बसला आहे. एका महिला नेत्याने पक्षाला रामराम केला आहे. या नेत्या केंद्रात मंत्री देखील राहिल्या आहेत. या महिला नेत्याने राजीनामा दिल्याने भाजपसाठी हा मोठा धक्का असेल. माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांत पाटील यांनी भाजपला रामराम केला आहे. त्यामुळे नांदेड भाजपसाठी हा मोठा धक्का आहे.
माजी केंद्रीय मंत्र्याचा भाजपाल रामराम
माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांत पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर आता भाजप पक्षासाठी हा मोठा धक्का आहे. सूर्यकांत पाटील विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. 2014 मध्ये सूर्यकांता पाटील यांनी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता दशकपूर्तीनंतर सूर्यकांता पाटलांनी दहा वर्षातील भाजपाचा प्रवास थांबवला आहे.
टीव्ही 9 मराठीसोबत बोलताना सूर्यकांता पाटील यांनी शरद पवार यांचं तोंड भरून कौतुक केलं होतं अखेर माजी मंत्री सूर्यकांता पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले यांच्याकडे भाजपच्या प्रथम सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. माझ्या मनात कोणती कटूता नाही. मी भारतीय जनता पार्टीची आभारी आहे. मी आपला निरोप घेत आहे, असं म्हणत सूर्यकांता पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे.
राजीनाम्याच्या पत्रात काय?
मी माझ्या प्राथमिक सदस्यत्वाचा तथा माझ्या 84 हदगावच्या संयोजकपदाचा राजीनामा देत आहे. आपल्यासोबत गेल्या 10 वर्षांपासून खूप काही शिकता आलं. तालुक्यात बुथ कमिटीपर्यंत काम केलं. आपण दिलेल्या संधीसाठी मी आपली आणि भाजपची अत्यंत आभारी आहे. मी आपला निरोप घेते. प्रत्यक्ष भेटीचा प्रयत्न केला. पण आपल्या व्यस्ततेमुळे ते शक्य झालं नाही. कोणतीही कटूता मनात न ठेवता मी आपला राजीनामा देत आहे. तो आपण स्विकारावा, ही विनंती, असं म्हणत सूर्यकांता पाटील यांनी आपला राजीनामा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सोपवला आहे.
सूर्यकांता पाटील कोण आहेत?
भाजपला सोडचिठ्ठी देणाऱ्या सूर्यकांता पाटील कोण आहेत? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर सूर्यकांता पाटील या माजी केंद्रीय मंत्री राहिल्या आहेत. त्या भाजपच्या नेत्या होत्या. याआधी त्या राष्ट्रवादी पक्षात होत्या. हिंगोली नांदेड मतदारसंघांचं त्यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे. 2014 ला त्यांनी डॉ. माधवराव किन्हाळकर यांच्या भाजपमध्ये प्रवेश केला. आता त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे.
