AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज साहेब नाही, आम्ही फक्त उद्धव ठाकरेंबद्दलच बोलणार, शिंदेंच्या जवळच्या माणसानं सांगितलं कारण

शिवसेनेकडून पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे, निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ठाकरे यांनी भाषण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

राज साहेब नाही, आम्ही फक्त उद्धव ठाकरेंबद्दलच बोलणार, शिंदेंच्या जवळच्या माणसानं सांगितलं कारण
| Updated on: Jul 07, 2025 | 4:53 PM
Share

सरकारने त्रिभाषा सूत्राचे दोन्ही जीआर रद्द केल्यानंतर शनिवारी मुंबईत विजयी मेळावा पार पडला, या मेळाव्याला दोन्ही ठाकरे बंधू शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांची उपस्थिती होती. या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गट आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. त्यानंतर आता शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश मस्के यांनी उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

नेमकं काय म्हणाले मस्के? 

राज साहेब ठाकरे यांच्यावर किंवा त्यांच्या विरोधात बोलण्याचा विषय काय येतो? ना कुठला पक्ष, ना कुठला झेंडा अशी त्यांची भूमिका होती. मात्र उद्धव ठाकरे यांनी हिंदी सक्ती, मराठी भाषा सोडून खालच्या पातळीची टीका केली. मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन त्यांनी भाषण केलं. उद्धव ठाकरे हे हारलेले दिसून आले. राज ठाकरे आमच्याबद्दल काही बोलले नाहीत म्हणून, आम्ही त्यांच्याबद्दल काही बोलणार नाही.  मात्र उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आम्ही बोलत राहू, असं मस्के यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी अतिशय गलिच्छ पद्धतीने भाषण करुन उसन आवसान आणलं. उध्दव ठाकरे यांनी पालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाषण केलं. महाराष्ट्र, मराठी माणसांवर अन्याय असं भासवून त्यांचा निवडणूक लढण्याचा प्रयत्न आहे. मराठी माणसांना भडकावून त्यांची मत मिळवणे हाच त्यांचा उद्देश होता, असं मस्के यांनी म्हटलं आहे.

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी संजय राऊत यांच्यावर देखील निशाणा साधला.  राऊत यांनी उद्धव ठाकरे यांचं वाटोळं केल आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत नेऊन काय वाटोळं झालं हे सर्वांनाच माहिती आहे, असं मस्के यांनी यावेळी म्हटलं, दरम्यान आता त्यांना काँग्रेस सोबत राहायचं आहे का? आणि काँग्रेसला यांच्यासोबत राहायचं आहे का? असा सवालही यावेळी नरेश मस्के यांनी केला आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?