AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

त्याच ठिकाणी त्याला ठेचून मारा… नरसापूर घटनेतील आरोपीची बायको संतप्त, tv9 च्या कॅमेऱ्यासमोर पहिल्यांदाच प्रतिक्रिया

पुण्यातील नरसापूर चिमुरडी हत्या प्रकरणी आरोपीच्या कुटुंबीयांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. आरोपीच्या पत्नी व मुलाने त्याला त्याच ठिकाणी ठेचून मारण्याची मागणी केली. त्यांनी आरोपीच्या मागील १० वर्षांपासूनच्या गैरकृत्यांचा व क्रूर अत्याचारांचा पाढा वाचला. यात पुतणीवर अत्याचार, इतरांना चाकूचा धाक दाखवून लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले. कुटुंबीयांनी पीडितेला न्याय मिळवून देण्याची मागणी केली.

त्याच ठिकाणी त्याला ठेचून मारा... नरसापूर घटनेतील आरोपीची बायको संतप्त, tv9 च्या कॅमेऱ्यासमोर पहिल्यांदाच प्रतिक्रिया
pune bhor news
| Updated on: May 04, 2026 | 2:51 PM
Share

पुण्याच्या भोर तालुक्यातील नसरापूर गावात चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून हत्या केल्याची घटना घडल्यानंतर या घटनेतील आरोपीचे कुटुंबीय पहिल्यांदाच tv9 च्या कॅमेऱ्यासमोर आलेत. गेल्या दोन दिवस सुरू असलेल्या बातम्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी त्यांची भूमिका मांडण्यासाठी टीव्ही 9 च्या प्रतिनिधीशी संपर्क केला. त्यानंतर आरोपीला मारून टाका, त्याला त्याच ठिकाणी ठेचून मारा, असे म्हणत आरोपीच्या कुटुंबीयांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे.

ज्या ठिकाणी चिमुरडीवर अत्याचार झाला आहे. त्याचं ठिकाणी त्याला ठेचून मारलं पाहिजे अशी प्रतिक्रिया देत आरोपीची पत्नी ढसाढसा रडली. तर तो माझा बाप आहे हीच माझी चुकी आहे. त्याला लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी त्याच्या मुलानी केली.

आरोपीची पत्नी म्हणाली की, ज्या ठिकाणी घटना घडली, त्याच ठिकाणी त्याला ठेचून मारलं पाहिजे. मला अकरा नातवंड आहेत. घटना घडल्यापासून मी अन्नपाणी घेत नाही. त्या बाळाचा आत्मा काय म्हणाला असेल? त्या बाळाच्या घरच्यांना, तिच्या आईला काय वाटत असेल? मी पण कुणाची तरी आईच आहे. आमचा आरोपीशी 10 वर्षापासून त्याचा संपर्क नाही. तो घरी राहत नाही. आम्ही दोघेच मायलेकरं राहतो. 10 वर्षात त्याला आम्ही घरी बोलावण्याचा प्रयत्न केला. पण तो म्हणाला तुझं तू बघ, असं आरोपीची पत्नी म्हणाली.

चाकूचा धाक दाखवून बलात्कार

त्याने 65 वर्षाच्या महिलेवर अत्याचार केले तेव्हा हा मुलगा माझ्या पोटात होता. याआधी त्याच्यावर झालेले अत्याचाराचे आरोप- घटना मला माहिती आहेत. मान्य आहेत. तो मोलमजुरी करून खात होता. तो गावातील इतर महिलांच्या घरात लपून बसून, घरात कुणी नसल्याचं पाहून चाकूचा धाक दाखवून महिलांवर लैंगिक अत्याचार करायचा. या गावकऱ्यांच्या आरोपाबद्दल मला माहिती नाही. तो तसं करत असेल तर मला माहिती नाही. कुठल्या महिलेने सुद्धा माझ्यापर्यंत हे पोहोचवलं नाही, असंही त्यांनी सांगितलं.

माझ्या मुलीवर अत्याचार करत नव्हता

गावकऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे जर त्यानी माझ्या मुलीवर अत्याचार केला असता, तर त्याची तक्रार मी स्वतः केली असती. माझ्या पोरींवर असं झालं असतं तर मी गप बसली असते का? मला सात पोरी आहेत. मी स्वतः गप बसले नसते. मला या गोष्टीचा खूप राग आहे. माझ्या पोरी मोलमजुरी करून पोट भरत होत्या. माझ्या पोरींवर तो अत्याचार करायचा हे गावकऱ्यांचे आरोप चुकीचे आहेत. ते आमची बदनामी करत आहेत. अशी घटना झाली असती तर हे कुठल्या आईला सहन होईल? असा सवाल त्यांनी केला.

मला वेदना होत आहेत…

बाहेर तो काय करायचा याबद्दल मला माहिती नाही. पण त्याने घरात माझ्या मुलींसोबत काहीही केलेलं नव्हतं. मुलींवर अत्याचार करायचा आहे आरोप खोटे आहेत. जमीन जुमला विकायचा होता म्हणून त्याच्या थोरल्या भावानं पैसे देऊन त्याला जेलमधून बाहेर काढला. ज्या जागी ह्या चिमुरडीवर अत्याचार झालेला आहे, त्याच ठिकाणी त्याला ठेचून मारलं पाहिजे, असं म्हणतं त्या ढसा ढसा रडल्या. मला वेदना होत आहे. अंगाचा लटपट उडतोय नाव ऐकलं तरी, असंही त्या म्हणाल्या.

लोकांकडे द्या, ठेचून मारा

आरोपीच्या मुलानेही प्रतिक्रिया व्यक्त केली. तो माझा बाप आहे हीच माझी चुकी आहे. त्याने चिमूरड्यावर केलेल्या अत्याचाराचा मी जाहीर निषेध करतो. त्याला लवकरात लवकर फाशीची शिक्षा करा, असे मी सरकारला आवाहन करतो. मी त्याचा मुलगा आहे हे माझं मोठं दुर्दैव आहे. त्या चिमुरडीला जेवढ्या वेदना झाल्या तेवढ्या वेदना ह्याला झाल्या पाहिजेत. याला लोकांच्या हवाली केले पाहिजे आणि ठेचून मारला पाहिजे, असं आरोपीच्या मुलाने म्हटलंय.

तो माझा बाप नाहीच

त्याने स्वतःच्या पुतणीवर अत्याचार केला तेव्हा मी नववीत होतो. तेव्हा मला समज होती. तेव्हा आम्हाला घरदार सोडून जावं लागलं होतं. त्यानंतर मला बाप म्हणजे काय माहितीच नाही. त्याच्यासोबत संबंध संपवला होता. आज माझ्या सात बहिणी आहेत, आई आहे. आम्ही न्याय कुणाला मागायचा? जे कृत्य माझ्या वडिलांनी केलंय त्याचा दोष कुटुंबाला देणं चुकीचं. सरकारला विनंती आहे की, चिमुरडीला लवकरात लवकर न्याय मिळावा. चिमुरडीला इतक्या क्रूरतेने मारलं. हा माझा बाप नव्हताच, असं मला म्हणावं वाटतंय, असंही तो म्हणाला.

Follow Us
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक...
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक विधानाचा अर्थ काय?
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू-बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले, आम्ही बदनाम...
शेतकऱ्यांची पिकं दुष्काळामुळे करपली अन् आढावा बैठकीत नेत्यांचा बदामावर
शेतकऱ्यांची पिकं दुष्काळामुळे करपली अन् आढावा बैठकीत नेत्यांचा काजु-बदामावर ताव
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तप
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला वरंवार पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तपासणी
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांचां दावा
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांच्या मोठ्या दाव्याने खळबळ
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्री...
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्र्यांना तातडीचे आदेश
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान...
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान थेट वकीलांसह 'मातोश्री'ला जाणार
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, बंगाल...
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, नेमकं प्रकरण काय?
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठवताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट.... बंगालमध्ये राजकीय हालाचाली वाढल्या?