नाशिकच्या वीज कामांसाठी 7 कोटी मिळाले; कोठे अन् कधी सुरू होणार काम?

नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदवार्ता. जिल्ह्यात आता कृषी पंप वीज धोरण योजनेतून 7 कोटी रुपये खर्चून दोन नवीन विद्युत उपकेंद्र आणि एका उपकेंद्रांच्या क्षमतेत वाढ केली जाणार आहे.

नाशिकच्या वीज कामांसाठी 7 कोटी मिळाले; कोठे अन् कधी सुरू होणार काम?
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Feb 15, 2022 | 3:25 PM

नाशिकः नाशिक (Nashik) जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदवार्ता. जिल्ह्यात आता कृषी पंप (Agricultural Pump) वीज धोरण योजनेतून 7 कोटी रुपये खर्चून दोन नवीन विद्युत उपकेंद्र आणि एका उपकेंद्रांच्या क्षमतेत वाढ केली जाणार आहे. त्यात येवला मतदारसंघातील नगरसूल उपकेंद्रांत 5 एमव्हीएचे अतिरिक्त रोहित्र तर अंगुलगाव व वडगाव बल्हे येथे 33 केव्हीचे नवीन विद्युत उपकेंद्र मंजूर झाले आहे. या तिन्ही विद्युत उपकेंद्रांच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. येवला मतदारसंघातील विजेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या विशेष प्रयत्नांतून विविध योजना राबविण्यात येत आहेत. त्यातूनच हे काम मार्गी लागले आहे.

जागेचा प्रश्नही मार्गी

नव्याने मंजूर झालेल्या 33 केव्ही विद्युत उपकेंद्रामध्ये अंगुलगाव येथे 33 के. व्ही. नवीन विद्युत उपकेंद्र कृषी पंप वीज धोरण योजनेमधुन मंजूर झाले आहे. त्यासाठी 3 कोटी 41 लाख खर्च येणार आहे. यासाठी असलेला जागेचा प्रश्न देखील मार्गी लागला असून महावितरणकडे जागा हस्तांतरीत करण्यात आली आहे. या उपकेंद्रांची निविदा प्रक्रिया सुरू झाली असून या कामाला सुरुवात होणार आहे.

येथील वीजप्रश्न सुटणार

नगरसूल सबस्टेशन मध्ये 5 MVA चे अतिरिक्त रोहित्र बसवणे हे काम कृषी पंप वीज धोरणमधून मंजूर झाले आहे. त्यासाठी 1 कोटी 35 लाख खर्च येणार आहे. या कामाचा प्रस्ताव तांत्रिक मान्यतेसाठी पाठविण्यात आला असून लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कामाला सुरुवात होणार आहे. या उपकेंद्रातील अतिरिक्त रोहित्रामुळे चांदगाव, नायगव्हाण, अनकाई या गावांच्या वीजेचा प्रश्न यामुळे सुटणार आहे.

येथील शेतकऱ्यांना फायदा

वडगाव बल्हे येथे 33 के.व्ही. नवीन विद्युत उपकेंद्र कृषी पंप वीज धोरणमधून मंजूर झाले असून लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कामाला सुरुवात होणार आहे. यासाठी 2 कोटी 17 लाख निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. येवला मतदारसंघातील नगरसूल उपकेंद्रांत झालेली 5 MVA च्या अतिरिक्त रोहित्रांची वाढ तसेच अंगुलगाव व वडगाव बल्हे येथे नवीन उपकेंद्र मंजूर झाल्याने परिसरातील गावांचा वीजेचा प्रश्न सुटणार आहे. प्रामुख्याने शेतकऱ्यांना याचा अधिक फायदा होणार आहे.

इतर बातम्याः

Mirza Ghalib | जगण्याचं तत्वज्ञान मलमली भाषेत सांगणाऱ्या असदुल्लाह-ख़ाँ-‘ग़ालिब’ का पता…!

महाराष्ट्राचा महापिता कर्नाटकाच्या मातीत एकाकी, समाधीवर साधे छप्परही नाही; पानिपतकारांच्या डोळ्यांत पाणी, पोटात गोळा!

Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.