AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी, भोंदूबाबा अशोक खरातच्या HIV टेस्टचा रिपोर्ट समोर

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातची HIV चाचणीचा रिपोर्ट समोर आला आहे. त्याने १५० हून अधिक महिलांवर अत्याचार केल्याचे तपासात उघड झाले आहे. न्यायालयाने त्याला २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

मोठी बातमी, भोंदूबाबा अशोक खरातच्या HIV टेस्टचा रिपोर्ट समोर
ashok kharat
| Updated on: Mar 27, 2026 | 8:13 AM
Share

अध्यात्म आणि भोंदूगिरीच्या नावाखाली महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या अशोक खरात प्रकरणी नवनवीन अपडेट सुरु आहेत. अशोक खरात प्रकरणाने महाराष्ट्राच्या सामाजिक आणि पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाने (SIT) आता आपला तपासाचा वेग आणखी वाढवला आहे. आता अशोक खरातचे वैद्यकीय अहवाल समोर आले आहेत. त्यामुळे तपासाला नवीन दिशा मिळाली आहे.

HIV टेस्टचा रिपोर्ट काय?

अशोक खरातने शेकडो महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या कृत्यामुळे पीडित महिलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. तांत्रिक पुरावा गोळा करणे आणि पीडितांच्या सुरक्षिततेचा विचार करून पोलिसांनी अशोक खरातची ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली होती. यावेळी त्याच्या काही टेस्टही करण्यात आल्या होत्या. यात एचआयव्ही टेस्टचाही समावेश होता.

आता अशोक खरातच्या एचआयव्ही टेस्टचा रिपोर्ट समोर आला आहे. अशोक खरातच्या HIV चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्याने वैद्यकीयदृष्ट्या तपासातील एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. त्यातच आता अशोक खरातच्या एसआयटीची चौकशी सुरु आहे. या चौकशीत अशोक खरातच्या गुन्हेगारी पद्धतीची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अशोक खरात हा महिलांना भविष्य सांगण्याच्या बहाण्याने किंवा त्यांच्या घरातील दोष दूर करण्याच्या नावाखाली जाळ्यात ओढत असे. याप्रकरणी अनेक महिलांनी तक्रार केली आहे की, तो संमोहित करून किंवा घरातील व्यक्तीचा मृत्यू होईल अशी भीती घालून त्यांचे शारीरिक शोषण करत असे.

अशोक खरातला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी

आतापर्यंतच्या तपासात अशोक खरातने १५० हून अधिक महिलांवर अत्याचार केल्याचा संशय आहे. यातील अनेक महिला भीतीपोटी समोर येण्यास कचरत आहेत. न्यायालयाने अशोक खरातच्या गुन्ह्याचे स्वरूप अत्यंत गंभीर मानले आहे. तपासासाठी पुरेसा वेळ मिळावा आणि जास्तीत जास्त पीडितांना न्याय मिळावा, यासाठी न्यायालयाने त्याला २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. एसआयटी सध्या या प्रकरणातील आर्थिक व्यवहार त्याला मदत करणारे हस्तक आणि गुन्ह्यात वापरलेली ठिकाणे यांचा शोध घेत आहे.

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?