AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रुपाली चाकणकरांच्या अडचणी आणखी वाढल्या, रायगड कनेक्शन उघड, नेमकं प्रकरण काय?

रुपाली चाकणकर यांचे रायगडमधील व्यावसायिक संबंध उघड झाले असून अशोक खरात प्रकरणातील 'शिवनिका' ट्रस्टच्या व्यवहारांमुळे आता एसआयटी चौकशीची टांगती तलवार आहे.

रुपाली चाकणकरांच्या अडचणी आणखी वाढल्या, रायगड कनेक्शन उघड, नेमकं प्रकरण काय?
Rupali Chakankar
| Updated on: Mar 30, 2026 | 8:42 AM
Share

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या रुपाली चाकणकर यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे रुपाली चाकणकरांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा आणि पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर आता रुपाली चाकणकरांबद्दलची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रुपाली चाकणकर यांचे रायगडमधील व्यावसायिक संबंध उघड झाले आहेत. तर दुसरीकडे शिवनिका ट्रस्टच्या व्यवहाराप्रकरणी एसआयटी (SIT) कडून त्यांची चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

रायगडमधील कर्मा कन्स्ट्रक्शन वादाच्या भोऱ्यात

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत सुषमा अंधारे यांनी रुपाली चाकणकर आणि सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. आता या आरोपांना पुष्टी मिळताना दिसत आहे. सुनील तटकरे यांचे बालेकिल्ला असलेल्या रायगडमधील रोहा येथे निलेश चाकणकर आणि आकाश चौधरी हे बांधकाम व्यवसायात भागीदार असल्याची माहिती समोर आली आहे.

कर्मा कन्स्ट्रक्शन LLP च्या माध्यमातून त्यांनी रोह्यातील रोठ खुर्द येथे एक बहुमजली इमारत उभी केली होती. विशेष म्हणजे, या इमारतीचे बांधकाम अनधिकृत आणि नियमबाह्य असल्याचा दावा करत भाजपचे अल्पसंख्यांक सेलचे महाराष्ट्र प्रदेश सचिव बबलू सय्यद यांनी केला होता. याप्रकरणी बबलू सय्यद यांनी माणगाव न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यामुळे चाकणकर आणि चौधरी यांच्या व्यावसायिक युतीवर शिक्कामोर्तब झाले आहे.

आकाश चौधरींचे व्यावसायिक जाळे

त्यासोबतच तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, आकाश चौधरी यांच्या नावावर अनेक मोठ्या कंपन्यांची नोंदणी आहे. यात प्रामुख्याने ओशन पर्ल मेरिटाइम प्रायव्हेट लिमिटेड, कोलाड आणि कर्जत रिव्हर राफ्टिंग, गीता ॲग्रो ॲन्ड इंफ्रा प्रायव्हेट लिमिटेड, FL3 हॉस्पिटॅलिटी आणि रॉक हिल ॲडव्हेंचर रिसॉर्ट यांसारख्या व्यवसायाचा समावेश आहे.

शिवनिका ट्रस्ट आणि एसआयटी चौकशी

तर दुसरीकडे अशोक खरातच्या अघोरी कृत्यांचा आणि आर्थिक व्यवहारांचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने (SIT) आता आपला मोर्चा खरातशी संबंधित शिवनिका या संस्थेकडे वळवला आहे. या संस्थेच्या सर्व व्यवहारांची कसून चौकशी केली जात आहे. त्यामुळे रुपाली चाकणकर यांच्यासह संस्थेच्या आजी-माजी ट्रस्टींना समन्स बजावण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

तसेच खरातशी असलेल्या ओळखीमुळे रुपाली चाकणकर आता पूर्णपणे कायदेशीर कचाट्यात सापडल्या आहेत. या सर्व प्रकरणाचे पडसाद राजकीय वर्तुळात उमट आहे. याच पार्श्वभूमीवर आज पुण्यात सकाळी ११ वाजता गुलाबो गँगकडून रुपाली चाकणकर यांच्या विरोधात आंदोलन केले जाणार आहेत. यावेळी गुलाबो गँग चाकणकरांविरोधात तीव्र निदर्शने करणार आहे.

Follow Us
पदवीपेक्षा कौशल्याला महत्त्व! तरुणांना फडणवीसांचा मोलाचा संदेश; उल्हास
पदवीपेक्षा कौशल्याला महत्त्व! तरुणांना फडणवीसांचा मोलाचा संदेश; उल्हासनगरच्या विकासासाठीही मोठ्या घोषणा
गोव्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर डंका! मांद्रे आणि गाल्जीबागा बीचला...
गोव्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर डंका! मांद्रे आणि गाल्जीबागा बीचला प्रतिष्ठित ब्लू फ्लॅग पुरस्कार
माफी मागा, अन्यथा महाराष्ट्रात फिरू देणार नाही; आनंदराज आंबेडकरांना...
माफी मागा, अन्यथा महाराष्ट्रात फिरू देणार नाही; आनंदराज आंबेडकरांना राष्ट्रवादीचा इशारा!
वाशिममध्ये दुष्काळाचे सावट! 23 गोशाळांमधील चारा-पाणीटंचाईचे संकट
वाशिममध्ये दुष्काळाचे सावट! 23 गोशाळांमधील हजारो जनावरांवर चारा-पाणीटंचाईचे संकट
डिलिमिटेशन विधेयकावर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? एका वाक्यात दिलं...
Supriya Sule : डिलिमिटेशन विधेयकावर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? एका वाक्यात दिलं उत्तर
जळगाव महापालिकेच्या महासभेत राडा! इब्राहीम पटेल यांच्या वक्तव्याने...
जळगाव महापालिकेच्या महासभेत राडा! इब्राहीम पटेल यांच्या वक्तव्याने भाजप-ठाकरे गट आमनेसामने, नगरसेवकांचा सभात्याग
सेन्सॉर बोर्डाच्या अडवणुकीवर दिपाली सय्यद आक्रमक; 'महाराष्ट्र एपस्टाईन
सेन्सॉर बोर्डाच्या अडवणुकीवर दिपाली सय्यद आक्रमक; 'महाराष्ट्र एपस्टाईन फाईल्स'साठी आंदोलनाचा इशारा!
मोठी ऑफर की... 150 कोटींच्या आरोपावर भुजबळांचा संजय राऊतांना उलटसवाल
मोठी ऑफर की... 150 कोटींच्या आरोपावर भुजबळांचा संजय राऊतांना उलटसवाल; थेट...
अजितदादांवरील वक्तव्याने वाद पेटला! आनंदराज आंबेडकरांना विधान भोवलं
अजितदादांवरील वक्तव्याने वाद पेटला! आनंदराज आंबेडकरांना सुरज चव्हाणांचा थेट इशारा
सोनिया गांधींचं पुस्तक फाडणाऱ्यांना आशिष शेलारांचा खणखणीत टोला...
सोनिया गांधींचं पुस्तक फाडणाऱ्यांना आशिष शेलारांचा खणखणीत टोला; संजय राऊतांवरही साधला निशाणा!