AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाशिकमध्ये कोरोनाचा पुन्हा एक बळी; किती आहेत रुग्ण, भीती नेमकी कशाची?

नाशिकमध्ये गेल्या आठवड्यात कोरोनाच्या 33 रुग्णांचा मृत्यू झाला. 6 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी दरम्यान हे बळी गेले. यातले 18 मृत्यू हे नाशिक महापालिका क्षेत्रात तर 16 मृत्यू हे नाशिकच्या ग्रामीण भागात झाले. त्यानंतरही मृत्यू सत्र सुरूच आहे.

नाशिकमध्ये कोरोनाचा पुन्हा एक बळी; किती आहेत रुग्ण, भीती नेमकी कशाची?
Corona testing
| Updated on: Feb 21, 2022 | 4:43 PM
Share

नाशिकः एकीकडे राज्यात कोरोनाची (Corona) तिसरी लाट ओसरली आहे. राज्याचा पॉझिटीव्हीटी रेट हा 35 टक्क्यांवरून थेट 2.2 टक्क्यांवर आल्याची माहिती आरोग्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे देत आहेत. केंद्र सरकारनेही राज्यांना पत्र पाठवून व्यवहार सुरळीत करण्याच्या सूचना दिल्यात. मात्र, दुसरीकडे अजूनही नाशिक (Nashik) जिल्ह्यात कोरोनाचे मृत्यू (Death) सत्र सुरूच आहे. 20 फेब्रुवारी रोजी नाशिक महापालिका क्षेत्रात पुन्हा एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 4 लाख 65 हजार 764 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत 736 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये 110 ने घट झाली आहे. आत्तापर्यंत 8 हजार 887 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

कोठे आहेत रुग्ण?

उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्ये नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक 43, बागलाण 35, चांदवड 34, देवळा 23, दिंडोरी 39, इगतपुरी 15, कळवण 45, मालेगाव 8, नांदगाव 29, निफाड 86, पेठ 13, सिन्नर 45, सुरगाणा 41, त्र्यंबकेश्वर 42, येवला 39 असे एकूण 537 पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 152, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात 11 तर जिल्ह्याबाहेरील 36 रुग्ण असून, असे एकूण 736 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात 4 लाख 75 हजार 387 रुग्ण आढळून आले आहेत.

भीती का आहे?

नाशिकमध्ये गेल्या आठवड्यात कोरोनाच्या 33 रुग्णांचा मृत्यू झाला. 6 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी दरम्यान हे बळी गेले. यातले 18 मृत्यू हे नाशिक महापालिका क्षेत्रात तर 16 मृत्यू हे नाशिकच्या ग्रामीण भागात झाले. त्यानंतरही सोमवारी, 14 फेब्रुवारी रोजी सुद्धा 4, मंगळवारी 15 फेब्रुवारी रोजी 4 जणांचा मृत्यू झाला. बुधवारी, 16 फेब्रुवारी एक, 17 फेब्रुवारी रोजी गुरुवारी एक, 18 फेब्रुवारी रोजी शुक्रवारी पुन्हा एक, 19 फेब्रुवारी एक आणि आता 20 जानेवारी रोजीही एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नाशिकमधील कोरोनाचे मृत्यू तांडव थांबणार कधी, असा सवाल आता निर्माण होत आहे.

जिल्ह्यातील 4 लाख 65 हजार 764 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत 736 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये 110 ने घट झाली आहे. आत्तापर्यंत 8 हजार 887 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

– डॉ. अनंत पवार, जिल्हा नोडल अधिकारी

इतर बातम्याः

Mirza Ghalib | जगण्याचं तत्वज्ञान मलमली भाषेत सांगणाऱ्या असदुल्लाह-ख़ाँ-‘ग़ालिब’ का पता…!

महाराष्ट्राचा महापिता कर्नाटकाच्या मातीत एकाकी, समाधीवर साधे छप्परही नाही; पानिपतकारांच्या डोळ्यांत पाणी, पोटात गोळा!

Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!

मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.