AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik Corona | नाशिकमध्ये खुल्या पर्यटनावर बंदी; धार्मिक स्थळांबाबत काय होणार?

पालकमंत्री भुजबळ म्हणाले, तिसऱ्या लाटेतील लक्षणे सौम्य असल्याने विलगीकरणाचा कालावधी देखील कमी झालेला आहे. वाढणारी रुग्णसंख्या चिंताजनक असली तरी राज्यपातळीवर नाशिक जिल्ह्यात उपाययोजनांच्या अनुषंगाने यंत्रणांमार्फत चांगली कामगिरी होत आहे.

Nashik Corona | नाशिकमध्ये खुल्या पर्यटनावर बंदी; धार्मिक स्थळांबाबत काय होणार?
Guardian Minister Chhagan Bhujbal held a review meeting of Corona at Nashik District Collector's Office.
| Edited By: मनोज कुलकर्णी | Updated on: Jan 15, 2022 | 9:54 AM
Share

नाशिकः नाशिकमध्ये अतिशय झपाट्याने वाढणारे कोरोना रुग्ण पाहता प्रशासनाला धडकी भरली आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी याबाबत जिल्हाधिकारी सभागृहात कोरोना आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी शहरातील रामकुंड, पंचवटी भागात होणाऱ्या गर्दीला आळा घालण्याच्या सूचना पोलीस आयुक्तांना दिल्या. सोबतच खुल्या पर्यटनावर बंदी घालण्याचे आदेश दिले. धार्मिक स्थळांबाबतही लवकर निर्णय घेऊ, असे संकेतही त्यांनी दिले आहेत.

अधिकाऱ्यांसोबत मंथन

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या ऑनलाईन कोरोना आढावा बैठकीला पालकमंत्री भुजबळ यांच्यासह जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पांडेय, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील, अपर जिल्हाधिकारी भीमराज दराडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कप‍िल आहेर, जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी, उपजिल्हाधिकारी नितिन मुंडावरे, ज्योती कावरे, निलेश श्रींगी यांच्यासह संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

का होतेय गर्दी?

नाशिक पर्यटनासाठी तर प्रसिद्ध आहेच. सोबत अनेक धार्मिक विधीसाठी देशभरातील नागरिक नाशिक गाठतात. रामकुंड आणि गोदातीरावरील परिसरात त्यांची गर्दी होते. नदीकाठावर विविध धार्मिक विधी सुरू असतात. मात्र, कोरोनाचे झपाट्याने वाढणारे रुग्ण पाहता खुल्या पर्यटनावर तर बंदी घालण्याचे आदेश दिलेच आहेत. सोबतच आता या विधींना किती लोकांनी उपस्थित रहावे, याची मर्यादा निश्चित केली जाणार असल्याचे समजते. शहरातील सर्व पर्यटन स्थळांवरील गर्दी तातडीने कमी व्हावी, अशा सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांना दिल्या आहेत.

मार्गदर्शक सूचना पाळा

पालकमंत्री भुजबळ म्हणाले, तिसऱ्या लाटेतील लक्षणे सौम्य असल्याने विलगीकरणाचा कालावधी देखील कमी झालेला आहे. वाढणारी रुग्णसंख्या चिंताजनक असली तरी राज्यपातळीवर नाशिक जिल्ह्यात उपाययोजनांच्या अनुषंगाने यंत्रणांमार्फत चांगली कामगिरी होत आहे. त्याचप्रमाणे खुल्या जागेतील पर्यटन व धार्मिक स्थळांवर गर्दी होणार नाही व कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन होण्यासाठी पोलीस यंत्रणा व महानगरपालिका यांनी नियोजन करावे. तसेच कोरोना कालावधीत राज्य शासनामार्फत येणाऱ्या मार्गदर्शक सूचनांची सर्व यंत्रणांनी व्यवस्थितरीत्या अंमलबजावणी करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

इतर बातम्याः

Devyani Farande| 2 टर्म आमदारकी, महापालिकेतही छाप; परखड नेतृत्व देवयानी फरांदेंच्या वाटचालीवर वाढदिवसानिमित्त नजर …

Nashik Corona|नाशिकमध्ये आदिवासी महिलांचे लसीकरण कौतुकास्पद, राज्यभर अंमलबजावणी व्हावी, उपसभापतींची थाप…!

Nashik Oxygen|राज्यातला सर्वात मोठा ऑक्सिजन प्लांट नाशिकमध्ये; उत्तर महाराष्ट्राचीही चिंता मिटली

Follow Us
एक-एक टक्का देतो, आधी 40... शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; खळबळ
एक-एक टक्का देतो, आधी 40...  शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; एकच खळबळ
श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुला
Omraje Nimbalkar | श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले....
ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस
Omraje Nimbalakar | ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस... मोठा गोंधळ
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेम
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेमकं काय म्हणाले?
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच पोलिसांना...
तर नोकरी सोडून राजकारणात या, विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर
तर नोकरी सोडून राजकारणात या, IPS विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर राज ठाकरेंचा थेट हल्लबोल!
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय देशमुखांनी थेट हे काय सांगितलं?
ठरलं तर मग! पुढचे 3 वर्षे हाच कार्यक्रम; शिवसेनेत... उद्धव ठाकरेंनी
ठरलं तर मग! पुढचे 3 वर्षे हाच कार्यक्रम; शिवसेनेत... उद्धव ठाकरेंनी सांगितला मास्टर प्लॅन
शिंदेंनी शब्द पाळला! आणखी एका खासदाराला दिलं सर्वात मोठं गिफ्ट? तब्बल
शिंदेंनी शब्द पाळला! आणखी एका खासदाराला दिलं सर्वात मोठं गिफ्ट? तब्बल...
पुन्हा पेपरफुटी! TET परीक्षेचा पेपर फुटला, पुन्हा परिक्षा कधी होणार?
पुन्हा पेपरफुटी! TET परीक्षेचा पेपर फुटला, पुन्हा परिक्षा कधी होणार?