Nashik Corona | भय इथले संपत नाही, नाशिकमध्ये कोरोनामुळे पुन्हा तिघांचा मृत्यू; काय आहे आजचा अहवाल?

नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 4 लाख 60 हजार 593 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Nashik Corona | भय इथले संपत नाही, नाशिकमध्ये कोरोनामुळे पुन्हा तिघांचा मृत्यू; काय आहे आजचा अहवाल?
प्रातिनिधिक छायाचित्र Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Feb 09, 2022 | 11:25 AM

नाशिकः नाशिकमध्ये (Nashik) कोरोनाचे (Corona) भय काही केल्या संपत नाही. ओमिक्रॉन (Omicron) विषाणूमुळे रुग्णालयात भरती होण्याचे प्रमाण कमी झाले. मात्र, गेल्या काही दिवसांत मृत्यूचे प्रमाण झपाट्याने वाढल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात 8 फेब्रुवारी रोजी पुन्हा एकदा कोरोनाने तिघांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यातील दोन रुग्ण नाशिक महापालिका क्षेत्रातील असून, एक रुग्ण नाशिक ग्रामीणमधील आहे. दुसरीकडे सध्या नाशिक, निफाड, सिन्नर येथे रुग्ण संख्या जास्त आढळत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 4 लाख 60 हजार 593 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत 3 हजार 730 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये 574 ने घट झाली आहे. आत्तापर्यंत 8 हजार 853 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

कोठे आहेत रुग्ण?

उपचार घेत असलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक 123, बागलाण 112, चांदवड 99, देवळा 116, दिंडोरी 110, इगतपुरी 32, कळवण 146, मालेगाव 46, नांदगाव 124, निफाड 295, पेठ 86, सिन्नर 286, सुरगाणा 120, त्र्यंबकेश्वर 69, येवला 110 असे एकूण 1 हजार 874 पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 1 हजार 707, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात 64 तर जिल्ह्याबाहेरील 85 रुग्ण असून असे एकूण 3 हजार 730 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात 4 लाख 73 हजार 176 रुग्ण आढळून आले आहेत.नाशिक ग्रामीणमध्ये काल आढळून आलेल्या बाधित रुग्णांमध्ये नाशिक 25, बागलाण 6, चांदवड 13, देवळा 14, दिंडोरी 7, इगतपुरी 7, कळवण 8, मालेगाव 6, नांदगाव 26, निफाड 40, पेठ 5, सिन्नर 18, सुरगाणा 24, त्र्यंबकेश्वर 12, येवला 25 असे एकूण 236 पॉझिटीव्ह रुग्ण ग्रामीण भागात आढळून आले आहेत.

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीणमध्ये 96.49 टक्के, नाशिक शहरात 97.87 टक्के, मालेगावमध्ये 96.11 टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 97.43 टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण 97.34 इतके आहे. आतापर्यंत कोरोनामुळे नाशिक ग्रामीणमध्ये 4 हजार 281 जणांचा मृत्यू झाला आहेच. नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून 4 हजार 82, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रातून 364 व जिल्हा बाहेरील 126 अशा एकूण 8 हजार 853 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

8 फेब्रुवारी रोजी 3 मृत्यू

– नाशिक मनपा – 02

– मालेगाव मनपा – 00

– नाशिक ग्रामीण – 01

– जिल्हा बाह्य – 00

जिल्ह्याचे आजचे चित्र

– एकूण कोरोना बाधित 4 लाख 73 हजार 176.

– 4 लाख 60 हजार 593 रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने डिस्चार्ज.

– सध्या जिल्ह्यात उपचार 3 हजार 730 पॉझिटिव्ह रुग्ण.

– जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण 97.34 टक्के.

इतर बातम्याः

भोगी विषयांचा सोहळा; घोरपडीचे गुप्तांग, साळिंदराच्या काट्याची पूजा भांडारात विक्री, राज्यव्यापी कनेक्शन

Nashik | महापालिकेच्या कोषागार विभागात घोटाळा, नियमित भरण्यावरच डल्ला, नेमके प्रकरण काय?

Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.