Nashik Corona | मोठा दिलासा…नाशिक जिल्ह्यात फक्त 390 कोरोना रुग्णांवरच उपचार सुरू!

Nashik Corona | मोठा दिलासा…नाशिक जिल्ह्यात फक्त 390 कोरोना रुग्णांवरच उपचार सुरू!
प्रातिनिधिक छायाचित्र

नाशिक शहरसह ग्रामीण भागातही कोरोना चाचण्या वाढवण्यात आल्या आहेत. दक्षतेचा उपाय म्हणून जिल्ह्यात सोळा कोविड केअर सेंटर पुन्हा एकदा सुरू करण्यात आले आहेत.

चंदन पुजाधिकारी

| Edited By: मनोज कुलकर्णी

Jan 22, 2022 | 11:16 AM

नाशिकः नाशिककरांसाठी एक आनंददायी बातमी. शहरात कोरोना (Corona) रुग्णांची संख्या तब्बल पंधरा हजारांच्या पुढे गेली आहे. मात्र, त्यातील फक्त 390 रुग्णांवरच उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे त्यातील फक्त 20 जण व्हेंटिलटवर आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे जिल्ह्यात ऑक्सिजन ते बेड्सपर्यंत सारी तयारी चोख ठेवण्यात आली आहे. मात्र, नागरिकांनी जास्तीत जास्त कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

कोविड केअर सेंटर सुरू

ओमिक्रॉनची आलेली साथ, त्यात कोरोनाचे झपाट्याने वाढणारे रुग्ण पाहता राज्य टास्क फोर्स आणि मुख्य सचिवांनी आढावा घेतला होता. त्यात कोरोना रुग्णांची संख्या दीडपट वाढण्याची भीत व्यक्त केली होती. नाशिक जिल्ह्यात तो अंदाज खरा ठरताना दिसला. ग्रामीण भागातही कोरोना चाचण्या वाढवण्यात आल्या आहेत. दक्षतेचा उपाय म्हणून नाशिक जिल्ह्यात सोळा कोविड केअर सेंटर पुन्हा एकदा सुरू करण्यात आले आहेत. त्यात नाशिक जिल्हा रुग्णालय, मालेगाव जिल्हा रुग्णालय, पिंपळगाव रुग्णालयासोबतच कळवण, नांदगाव, येवला, इगतपुरी, वणी, सुरगाणा, पेठ येथे कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहेत. या ठिकाणी तब्बल अठराशे खाटांची संख्या उपलब्ध आहे. शिवाय ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची सुविधा आहे. मात्र, रुग्ण वाढूनही त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची गरज भासत नाही. आतापर्यंत केवळ 390 जणांवरच रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा मोठा दिलासा आहे.

निर्बंधही कठोर

कोरोनाचे झपाट्याने वाढणारे रुग्ण पाहता आता या खुल्या पर्यटनावर बंदी घालण्यात आली आहे. सोबतच आता या विधींना किती लोकांनी उपस्थित रहावे, याची मर्यादा निश्चित केली जाणार असल्याचे समजते. शहरातील सर्व पर्यटन स्थळांवरील गर्दी तातडीने कमी व्हावी, अशा सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश काढले असून, आता अंजनेरी गढ, ब्रह्मगिरी, पांडवलेणी, चांभर लेणी, रामशेज, पहिने, भावली धरण या ठिकाणी बंदी असणार आहे. नाशिकमध्ये सध्या या काही पर्यटन स्थळांची नावे बंदी म्हणून सांगण्यात येत आहेत. मात्र, या यादीमध्ये वाढही होऊ शकते. दुसरीकडे महापालिकेच्या आरोग्य विभागाने सर्व मेडिकल दुकानदारांना कोणत्याही ग्राहकाला कोरोना टेस्ट किटची विक्री केली, तर त्याची सारी माहिती ठेवावी असे आदेश दिले आहेत.

इतर बातम्याः

Nashik Election: जानेवारीअखेरीस प्रारूप प्रभाग रचनेला लागणार मुहूर्त; कुठे रखडली प्रक्रिया?

Nashik | महापालिकेच्या आरोग्य विभागात 348 पदे भरणार, पण महापौरच अंधारात, प्रशासनाची खेळी काय?

Malegaon | 30 वर्षांपासून बंद असलेली खोली उघडली अन् मानवी कवटी, हाडे सापडली; मालेगावमध्ये खळबळ!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें