AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik Election | प्रभाग रचना कोर्टात जाणार; महापालिका निवडणुकीपूर्वी इच्छुक आक्रमक, प्रकरण काय?

विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एप्रिल महिन्यात नाशिक महापालिका निवडणूक होण्याची शक्यताय. मात्र, प्रकरण कोर्टात गेले, तर ही निवडणूक लांबूही शिकते.

Nashik Election | प्रभाग रचना कोर्टात जाणार; महापालिका निवडणुकीपूर्वी इच्छुक आक्रमक, प्रकरण काय?
Nashik Municipal Corporation.
| Edited By: | Updated on: Jun 17, 2022 | 5:49 PM
Share

नाशिकः राजकारण वाटते तितके साधे, सरळ, सोपे बिलकुल नसते. नाशिक (Nashik) महापालिकेची प्रभाग रचना करताना (Ward Formation) अनेक प्रभागांची जाणूनबुजून मोडतोड करण्यात आली. कोणी कोणाला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला, तर कोणी कोणाचे घोडे गंगेत कसे न्हाईल हे पाहिले. इतक्या दिवस याची दबक्या आवाजात चर्चा सुरू होती. मात्र, निवडणूक (Election) आयोगाने हरकती मागवल्या. तेव्हा दबक्या आवाजात चर्चा करणारे आता खुल्या मैदानात आलेत. त्यांनी प्रारूप प्रभाग रचनेवर आक्षेपांची अक्षरशः बरसात केलीय. एकट्या शेवटच्या दिवशी तब्बल 131 जणांनी आक्षेप नोंदवले. त्यामुळे ही रचना करणाऱ्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले असून, त्यांच्या मागे नसते झेंगट लागले आहे. आता यावर येत्या 23 फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. त्याकडे समस्त नाशिककरांचे लक्ष लागले आहे.

4 जणांची समिती

महापालिक प्रारूप प्रभाग रचनेबाबत आलेल्या आक्षेपाची सुनावणी करण्यासाठी 4 सदस्यीय समिती नेमली आहे. या समितीवर सिडकोचे सहायक व्यवस्थापकीय संचालक अश्विनकुमार, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महापालिका आयुक्त कैलास जाधव आहेत. प्रभाग क्रमांक 11, 17, 23, 24, 30, 36 सह इतर प्रभागातही हरकती घेण्यात आल्या आहेत. तर काही जणांनी सुनावणीत समाधान झाले नाही, तर थेट कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे आधीच लांबलेल्या महापालिका निवडणुकीत पुन्हा एकदा विघ्न येणार आहे.

एप्रिलमध्ये निवडणूक?

नाशिक महापालिकेत नगरसेवकांची संख्या 122 वरून 133 वर नेण्यात आली. त्यामुळे यंदा रंगत वाढणार आहे. पालिकेची मुदत येत्या 15 मार्च रोजी संपणार आहे. खरे तर तोपर्यंत निवडणुका होऊन महापालिकेला नवे कारभारी मिळायला हवेत. किमान या काळात आचारसंहिता तरी लागलेली असावी. मात्र, तसे नाही झाले तर महापालिकेवर प्रशासकीय राजवट येऊ शकते. सध्या जिल्ह्यातील बाजार समितीच्यांच्या निवडणुकाही या ना त्या कारणाने सतत लांबणीवर पडताना दिसत आहेत. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एप्रिल महिन्यात महापालिका निवडणूक होण्याची शक्यताय. मात्र, प्रकरण कोर्टात गेले, तर ही निवडणूक लांबूही शिकते.

त्रिसदस्यीय पद्धतीने प्रभाग

– आता 133 नगरसेवक

– एकूण प्रभाग 44

– 43 प्रभाग 3 सदस्यीय

– 1 प्रभाग 4 सदस्यीय

पक्षीय बलाबल

– भाजप – 66 (एका नगरसेवकाचे निधन. सध्या 64)

– शिवसेना – 35 (सध्या 33)

– राष्ट्रवादी – 6

– काँग्रेस – 6

– मनसे – 5

– अपक्ष – 4

इतर बातम्याः

Mirza Ghalib | जगण्याचं तत्वज्ञान मलमली भाषेत सांगणाऱ्या असदुल्लाह-ख़ाँ-‘ग़ालिब’ का पता…!

महाराष्ट्राचा महापिता कर्नाटकाच्या मातीत एकाकी, समाधीवर साधे छप्परही नाही; पानिपतकारांच्या डोळ्यांत पाणी, पोटात गोळा!

Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!

29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.