Nashik | गाडगेबाबांच्या धर्मशाळेत 85 वर्षांपासून अविरत अन्नछत्र; वंचिताचा अनोखा आधारवड!

नाशिकमध्ये संत गाडगेबाबांनी सुरू केलेल्या धर्मशाळेत अनोख्या पद्धतीने त्यांची 146 वी जंयती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. विशेष म्हणजे येथे गेल्या 85 वर्षांपासून अविरत अन्नछत्र सुरू आहे. जयंती दिनीही अपंग, वंचितांना जवळ करत त्यांना आधार देण्यात आला.

Nashik | गाडगेबाबांच्या धर्मशाळेत 85 वर्षांपासून अविरत अन्नछत्र; वंचिताचा अनोखा आधारवड!
नाशिकमध्ये गाडगेबाबांनी सुरू केलेल्या धर्मशाळेत अविरत अन्नछत्र सुरू आहे.
Follow us
| Updated on: Mar 02, 2022 | 5:47 PM

नाशिकः संत गाडगेबाबा (Gadge Baba). समाजच्या कल्याणासाठी शेवटच्या श्वासापर्यंत ते झिजले. साऱ्यांना परोपकाराचा संदेश दिला. त्याच संदेशाची जाण ठेवत नाशिकमध्ये (Nashik) गाडगेबाबांनी सुरू केलेल्या धर्मशाळेत अनोख्या पद्धतीने त्यांची 146 वी जंयती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. विशेष म्हणजे येथे गेल्या 85 वर्षांपासून अविरत अन्नछत्र सुरू आहे. जयंती दिनीही अपंग, वंचितांना जवळ करत त्यांना आधार देण्यात आला. या कार्यक्रमाला पोलीस (Police) अधीक्षक सचिन पाटील उपस्थित होते. यावेळी पाटील म्हणाले की, श्री संत गाडगेमहाराज यांनी समाजाप्रती केलेले कार्य निश्चितपणे वाखण्याजोगे असून, त्यांच्या विचारांची दिशा आजही समाजातील प्रत्येक व्यक्तीसाठी तितकीच प्रेरणादायी आहे. हे सेवाव्रत प्रत्येकाने मनात जपून, मानवसेवा या सर्वश्रेष्ठ संकल्पनेच्या माध्यमातून सामाजिक उन्नती घडावी, असे आवाहन त्यांनी केले.

अनोखी जयंती साजरी…

श्री संत गाडगे महाराज धर्मशाळा ट्रस्ट वतीने श्री संत गाडगे महाराज यांच्या जयंती निमित्तही अंध, अपंग व वंचित बांधवांसाठी अन्नदान उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी रणजितसिंह राजपूत, सेवानिवृत्त जिल्हा क्रीडा अधिकारी शैलाताई सानप, ज्येष्ठ पत्रकार चंदूलाल शाह, हितेश शाह, श्री संत गाडगे महाराज धर्मशाळेचे संचालक कुणाल देशमुख, मंडेलचा परिवारातील सदस्य उपस्थित होते.

1936 ला धर्मशाळा सुरू…

कार्यक्रमात जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील म्हणाले की, स्वार्थ हा मानवी स्वभावाचा स्थायी गुणधर्म असला तरी प्रत्येकाने स्वार्थातून परमार्थ साधला पाहिजे. संत गाडगे महाराजांनी लोकसेवेचे व्रत हाती घेवून लोकांना स्वच्छतेचे धडे तर दिलेच, त्याचसोबत समाजातील रूढी, परंपरा, अंधश्रद्धा दूर करण्यासाठी व व्यसनमुक्तीसाठी किर्तनातून सदैव लोकप्रबोधन केले. श्री संत गाडगे महाराज धर्मशाळेची मूहर्तमेढ 1936 पासून गाडगे महाराजांनी केली होती. गेली 85 वर्षांपासून येथे नित्याने अंध, अपंग व वंचितांसाठी येथे अन्नछत्र अविरत सुरू आहे. समाज पुढे घेवून चालण्याची जबाबदारी ही कोण्या एकट्याची नसून सर्वांची आहे, यास आपण सर्वांचाच हातभार लागला तर हे श्रेष्ठदान ठरेल, असे विचारही यावेळी पाटील यांनी मांडले.

माणसाने माणसाला ओळखावे…

जिल्हा माहिती अधिकारी रणजितसिंह राजपूत म्हणाले की, कोरोना महामारीचे संकट दूर होत असताना, आज युद्धाचे सावट जगात आहे. या काळात अन्न हे पूर्णब्रम्ह आहे. याची जाणीव जिवंत ठेवून श्री संत गाडगे महाराज धर्मशाळा ट्रस्ट गेली 85 वर्षापासून अव्याहतपणे काम करत आहे. माणसाने माणुसकी जपावी आण‍ि माणसाने माणसाला ओळखावे हा मूळ गाभा संत गाडगे महाराज यांचा कार्याचा होता. माणसाने आत्मशुद्धी केली पाहिजे, हा विचार ठेवून गेल्या 100 वर्षापूर्वी स्वच्छतेचे महत्व संत गाडगे महाराजांनी समाजाला सांगितले. त्याचेच अनुकरण आज आपण शासनाच्या माध्यमातून स्वच्छता अभियानाद्वारे करीत आहोत. संतांची व महात्म्यांची शिकवण सदैव समाजासाठी मोलाचीच ठरली आहे. आजही आपण ही शिकवण व त्यांचे विचार वजा करून आपण आपले सण साजरे करू शकत नाही, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री संत गाडगे महाराज धर्मशाळेचे संचालक कुणाल देशमुख यांनी केले, तर चंदूलाल शाह यांनी आभार व्यक्त केले.

इतर बातम्याः

कोट्यवधींची उड्डाणे घेणाऱ्या साहित्य संमेलनाचा हिशेब द्या; नाशिकमध्ये निमंत्रकांना घरचा आहेर

Nashik Corona | कोरोना संपलाय म्हणता ना, पण नाशिकमध्ये पुन्हा 10 मृत्यू!

ट्रकच्या टक्करने पिकअप व्हॅनचा चुराडा; नाशिकचे 3 तरुण गतप्राण, दोघे गंभीर 

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.