AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ashok Kharat : भोंदूबाबा खरातची ‘ती’ डायरी, गंभीर आरोप करत महिला म्हणाली, ‘माझ्यावर बलात्कार, व्हिडीओ आणि…’

Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात याच्या विरोधात पोलिसांना 50 कॉल्स... पापांची यादी संपता संपेना... 35 वर्षीय पीडित महिला म्हणाली, 'माझ्यावर बलात्कार, व्हिडीओ आणि...', धक्कादायक सत्य समोर

Ashok Kharat : भोंदूबाबा खरातची 'ती' डायरी, गंभीर आरोप करत महिला म्हणाली, 'माझ्यावर बलात्कार, व्हिडीओ आणि...'
Ashok Kharat
| Updated on: Mar 29, 2026 | 9:27 AM
Share

Ashok Kharat : स्वतःला गॅडमॅन म्हणवणाऱ्या ‘कॅप्टन खरात’ याच्या पापांची यादी संपता संपत नाहीये… रोज या भोंदूबाबावर अनेक गंभीर आरोप करण्यात येत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, भोंदूबाबा प्रकरणी तपास करण्यासाठी विशेष तपास पथक तयार करण्यात आलं असून रोज त्यांच्याकडे नवीन तक्रारी येत आहे… ज्यामुळे प्रकरण अधिक तापलं आहे. यामध्ये अनेक राजकारणी व्यक्ती देखील असल्यामुळे वादग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे… गेल्या 5 दिवसांत पोलिसांना तब्बल 50 पेक्षा अधिक लोकांनी फोन करत तक्रारी दाखल केल्या आहे. फोन कॉल करत लोकांनी खरातविरुद्ध विविध माहिती दिली असून कथित गुन्ह्यांच्या तक्रारी दाखल केल्या आहेत.

बलात्कार, खंडणी आणि अश्लील कंटेंट

एजेन्सीने दिलेल्या माहितीनुसार, सारकार द्वारे स्थापन करण्यात आलेल्या SIT ने काही दिवसांपूर्वी अधिक माहिती मिळवण्यासाठी दोन फोन नंबर जारी केलेले. या नंबरवर जवळपास 15 ते 20 कॉल्स रोज येत अशतात. पोलिसांना फोन करत महिलांच्यावर झालेले अत्याचार, खंडणी आणि अश्लील कंटेंटबद्दल आरोप करत आहे. सध्या तपास पथक योग्य माहिती गोळा करून तपास करत आहे…

महिलेने केले सतत बलात्कार केल्याचे आरोप…

नाशिकच्या सिन्नर भागात मंदिर ट्रस्ट चालवणाऱ्या अशोक खरातला 18 मार्च रोजी अटक करण्यात आली. एका 35 वर्षीय महिलेने खरात याच्यावर तीन वर्षांच्या कालावधीत वारंवार बलात्कार केल्याचा आरोप केला. त्याच्या अटकेनंतर, इतर अनेक महिला अशाच प्रकारचे आरोप घेऊन पुढे आल्या, ज्यामुळे पोलिसांनी आतापर्यंत एकूण आठ एफआयआर नोंदवले आहेत.

खरात याच्या ऑफिसमधून मिळाली डायरी…

तपास सुरु असताना SIT ने शुक्रवारी नाशिक येथे असलेल्या खरात कार्यालयाची झडती घेतली. यावेळी फॉरेंसिक टीम देखील त्यांच्यासोबत होती… टीमने कार्यालयातून अनेक महत्त्वाची कागदपत्रे, फायली आणि एक डायरी हस्तगत केली असून, ती तपासासाठी जप्त करण्यात आली आहेत. अधिकाऱ्यांचा असा विश्वास आहे की, या कागदपत्रांमुळे या प्रकरणात नवीन खुलासे होऊ शकतात.

एवढंच नाही तर, जिल्ह्या प्रशासनाने सक्त कारवाई करत खरात याचा शस्त्र परवाना निलंबित करण्यात केला आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, त्याच्यावर दाखल झालेल्या अनेक गंभीर प्रकरणांमुळे, तो पीडितांना धमकावण्यासाठी शस्त्रांचा वापर करू शकतो अशी भीती होती. मिळालेल्या माहितीनुसार, खरातने 2012 मध्ये रिव्हॉल्वरचा परवाना मिळवला होता, ज्याचं नुकताच 2024 मध्ये नूतनीकरण करण्यात आलं होतं आणि तो 2028 पर्यंत वैध होता. आता याप्रकरणी पुढे काय होणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...