24 जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या नाशिकच्या ऑक्सिजन गळतीचा ठपका ठेकेदार कंपनीवर, जवळपास 25 लाखाचा दंड

ऑक्सिजन गळती प्रकरणाचा ठपका ठेकेदार कंपनीवर ठेवण्यात आला आहे. निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आलाय. या प्रकरणी महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाला क्लिनचिट देण्यात आली आहे. या प्रकरणात पुण्यातील ताईवो निपॉन आणि नाशिकच्या जाधव ट्रेडर्सला दंड ठोठावण्यात आला आहे.

24 जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या नाशिकच्या ऑक्सिजन गळतीचा ठपका ठेकेदार कंपनीवर, जवळपास 25 लाखाचा दंड
Nashik Oxygen Leakage

नाशिक : 21 एप्रिल रोजी नाशिक महापालिकेच्या झाकीर हुसेन हॉस्पिटलमध्ये झालेल्या ऑक्सिजन गळतीमुळे 24 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला होता. या ऑक्सिजन गळती प्रकरणाचा ठपका ठेकेदार कंपनीवर ठेवण्यात आला आहे. निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आलाय. या प्रकरणी महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाला क्लिनचिट देण्यात आली आहे. या प्रकरणात पुण्यातील ताईवो निपॉन आणि नाशिकच्या जाधव ट्रेडर्सला दंड ठोठावण्यात आला आहे. (Contractor fined Rs 24 lakh for leaking oxygen at Nashik’s Zakir Hussain Hospital)

21 एप्रिलला झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळतीनंतर विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीचा अहवाल राज्य सरकारला सादर करण्यात आलाय. सरकारच्या सूचनेनुसार नाशिक महानगरपालिकेनं पुण्यातील ताईवो निपॉन कंपनीला 22 लाख तर जाधव ट्रेडर्सला 2 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. रुग्णालयात झालेल्या ऑक्सिजन गळतीमुळे एकूण 24 जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेमुळे राज्यभरात मोठी खळबळ उडाली होती.

नेमकं काय घडलं?

नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात 21 एप्रिल दुपारी 12.30 च्या सुमारास ऑक्सिजनची गळती झाल्याचा प्रकार घडला. यानंतर काही तास रुग्णालयात गोंधळ पाहायला मिळाला. रुग्णालयात व्हेंटिलेटवर असलेले अनेक रुग्ण हे ऑक्सिजन अभावी तडफडत होते. तर दुसरीकडे ही गळती थांबवण्यासाठी प्रशासनाकडून अथक प्रयत्न केले जात होते. जवळपास एक दीड तासानंतर ही ऑक्सिजन गळती थांबवण्यात आली. या रुग्णालयात कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरु होते. त्यात 150 लोक व्हेंटिलेटरवर होते. त्यातील 23 जणांचा मृत्यू झाला.

दीड तासांनी गळती रोखण्यात यश

नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळती झाल्यानंतर अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी ऑक्सिजन टाकीतील गळती रोखण्यासाठी अथक प्रयत्न केले. जवळपास एक ते दीड तासानंतर ऑक्सिजन गळती रोखण्यास अग्निशमन दलाला यश आलं होतं. या घटनेमुळे रुग्णालयात ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांचा जीव टांगणीला लागला होता. या हलगर्जीपणामुळे रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागला होता.

पंतप्रधान मोदींकडून दु:ख व्यक्त

ऑक्सिजन गळतीमुळे झालेल्या दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करुन दु:ख व्यक्त केलं होतं. “ऑक्सिजन टँक लीक झाल्यामुळे नाशिकमधील रुग्णालयात घडलेली घटना हृदय पिळवटून टाकणारी आहे. या दुर्घटनेत जीवितहानी झाल्याने मन हेलावलं. दु:खाचा डोंगर कोसळलेल्या नातेवाईकांचं सांत्वन”, अशा शब्दात पंतप्रधान मोदी यांनी नाशिक दुर्घटनेत दगावलेल्या नागरिकांच्याप्रती संवेदना व्यक्त केल्या होत्या.

संबंधित बातम्या :

Nashik Oxygen Tank Leak Video : नाशिकमध्ये ऑक्सिजन गळती, तब्बल 22 जणांचा मृत्यू

‘माझी मम्मी क्लीअर झालेली, ऑक्सिजन संपला, फडफड कोंबडीवाणी मेली ती’, झाकीर रुग्णालयाबाहेर महिलेचा आक्रोश

Contractor fined Rs 24 lakh for leaking oxygen at Nashik’s Zakir Hussain Hospital

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI